Saturday, February 17, 2024

     वृत्त क्र. 618

'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन

            मुंबई दि. १७ :  संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सुक्ष्मलघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुणे येथे 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' आयोजन  करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सुक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.  

            संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने जलस्थल आणि वायू या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. यात दोनशेहून अधिक सुक्ष्मलघु व मध्यम उद्योगस्टार्ट-अप आणि २० हजारहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन  ज्ञानाची देवाण-घेवाण करतील.

            भारताचे औद्योगिक बलस्थान म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र हे आत्मनिर्भर भारताचे संवर्धन करण्यात आघाडीवर असलेले राज्य आहे. राज्यात ३९.८८ लाख  एमएसएमईचे मजबूत जाळे आहे. ज्यात उद्यम पोर्टलवर १०८.६७ लाख रोजगार आहेत. एमएसएमई डिफेन्स एक्स्पो अशा उद्योगांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संरक्षण उद्योगातील प्रमुख भागधारकांशी जोडण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ प्रदान करेल.

एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४ ची ठळक वैशिष्ट्ये :

या एक्स्पोमध्ये २०० हून अधिक एमएसएमई प्रदर्शक त्यांची संरक्षण- संबंधित उत्पादनेतंत्रज्ञान आणि सेवांचे विविध क्षेत्र जसे की एरोस्पेसशस्त्रास्त्रेइलेक्ट्रॉनिक्सदळणवळण आणि लॉजिस्टिक्स याचे प्रदर्शन करतील.

एमएसएमई आणि प्रमुख संरक्षण खरेदी संस्थाउद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रे होतील.

नॉलेज सेमिनार :  प्रख्यात तज्ञ आणि विचारवंत नेतेसंरक्षण क्षेत्रातील नवीनतम ट्रेंडसंधी आणि आव्हाने यावर दृष्टीक्षेप टाकतील

कौशल्य विकास कार्यशाळा : संरक्षण उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमएसएमई कर्मचाऱ्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने परस्परसंवादी सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

सरकारी सहाय्य उपक्रम : संरक्षण उत्पादनात एमएसएमईंना समर्थन देण्यासाठी विविध सरकारी योजनाधोरणे आणि आर्थिक सहाय्य पर्याय प्रदर्शित करण्यात येतील.

धोरणात्मक भागीदारी : संरक्षण क्षेत्रात एमएसएमईना  व्यवसाय वाढवण्यासाठी संभाव्य खरेदीदारसहयोगी गुंतवणूकदारांशी संपर्क साधता येईल.

तज्ञांचे  सेमिनार आणि कार्यशाळांद्वारे संरक्षण उद्योगातील नवीनतम घडामोडी आणि ट्रेंड्सवर अपडेट मिळू शकतील.

आर्थिक सहाय्य : संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी उपलब्ध होतील.

            या एक्स्पोद्वारे एमएसएमईंना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. यामध्ये उद्योग जोडणी सुलभ करणेतांत्रिक सहाय्य ऑफर करणे आणि नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करणे समाविष्ट आहे. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये  त्यांना सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम करतील. एमएसएमईं डिफेन्स एक्स्पो २०२४ मध्ये एमएसएमईं, संरक्षण अधिकारीउद्योग प्रतिनिधीगुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील २ हजारहून अधिक  संस्था सहभागी  होतील, असेही त्यांनी सांगितले.

            एल ॲण्ड टी. डिफेन्समहिंद्राटाटाडीआरडीओसोलारभारत फोर्ज आणि  सार्वजनिक सरंक्षण क्षेत्रातील उपक्रम (PSU) सारख्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी केलेल्या नाविण्यपूर्ण संरक्षण उत्पादनामुळे  महाराष्ट्राची संरक्षण क्षेत्रात प्रमुख उत्पादक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.  यात सहभागींना  फायदेशीर व्यावसायिक संधीशेकडो कोटींचे संभाव्य करार आणि संरक्षण तंत्रज्ञान निर्यात क्षेत्रातील एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससाठी लाभदायक ठरेल.

            "हा एक्स्पो आपल्या राज्याच्या संरक्षण क्षमता बळकट करण्याची शासनाची बांधिलकी अधोरेखित करतो. नावीन्य आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करूनहा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो.  आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आत्मनिर्भरतेकडेसंरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारा आहे , अशा भावना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या."

            "आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरंक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण एमएसएमई तयार झाल्या आहेत. तिन्ही सैन्य दलाचा सहभाग यात असणार आहे. आज देशात मोठया प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण होत असताना महाराष्ट्रात १० ऑर्डंनंस फॅक्टरी आणि ५ डिफेन्स पी एस यु आहेत. याची राज्यात इकोसिस्टिम तयार झाली आहे. टाटाभारत फोर्जसोलारएल ॲण्ड टीअशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात उपादने तयार करतात.  यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योजक येतील, गुंतवणूक वाढेल. मुख्य म्हणजे उत्पादन करणारे आणि खरेदीदार आर्म्ड फोर्स असे दोन्ही एका ठिकाणी एकत्र असतील. उद्योग विभागाने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. आजपर्यंत झालेल्या एक्स्पोमधील सर्वात मोठा एक्स्पो महाराष्ट्रात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

            "महाराष्ट्रातील एमएसएमईच्या संरक्षण उत्पादनातील अफाट क्षमतेचा उपयोग करण्यासाठी हा एक्स्पो एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक नवकल्पना वाढवून आणि देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या प्रधानमंत्री यांच्या दृष्टीकोनाशी  सुसंगत असल्याच्या भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.

*****

वृत्त क्र. 143

 महासंस्कृती महोत्सवात 'आदि माया आदि शक्ती'नी केला कलेचा जागर 

• सुप्रसिद्ध सिने व नाट्य कलावंताच्या बहारदार कार्यक्रमाने वेधले उपस्थितांचे लक्ष

• स्थानिक कलावंताच्या गायन, वादन, नृत्य सादरीकरणाने रसिकांना केले मंत्रमुग्ध 

• रविवारी जल्लोष कार्यक्रमात अंशुमन विचारे व किशोरी अंबिये यांचे होणार सादरीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- महासंस्कृती महोत्सवात काल महाराष्ट्राचा लोकोत्सवात विविध बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर आज 'आदि माया आदि शक्तीचा' जागर या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात  शास्त्रीय गायन, व्हायोलिन, बासरीवादन, भुलाबाई, धिरो धिरो पारंपारिक आदिवासी नृत्य, ताल संकिर्तन या कार्यक्रमात प्रथितयश कलाकार व स्थानिक कलाकारांच्या जागराने उपस्थित रसिकांची मने मंत्रमुग्ध केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मैदानावर हा सोहळा होत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिक उर्त्स्फूत प्रतिसाद देत आहेत.

 

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती महोत्सव 15 फेब्रुवारी पासून सुरु झाला आहे. 16 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा येथे भव्य प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. काल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या या मेजवानीचे थाटात उद्घाटन केले.

 

आज या कार्यक्रमात नांदेड प्रथितयश कलाकारांच्या सादरीकरणाने सुरुवात झाली. यामध्ये स्वप्नील आळंदीकर शास्त्रीय गायन सादर केले, गुंजन पंकज शिरभाते व पंकज शिरभाते यांच्या चमुने व्हायोलिनचे सादरीकरण केले, एैनोद्दिन वारसी यांनी व त्यांच्या चमुने बासरी वादन सादर केले. त्यांच्या बासरी वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. इंद्रधनू सखी ग्रुप अनघा जोशी त्यांच्या चमुने भुलाबाई या आगळ्या वेगळ्या कला प्रकाराचे सादरीकरण केले. किनवट तालुक्यातील मथुरा लमाण समूह डोंगरगाव तांडा यांनी धिरो धिरो पारंपारिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. प्रशांत गाजरे व संच यांनी ताल संकिर्तन सादर केले. यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते. अशा विविध कलाकारांनी आप-आपल्या उत्कृष्ट कला सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.

 

त्यानंतर 'आदि माया आदि शक्ती ' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. शुशांत शेलार या सिने कलाकारांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनात पूर्वी भावे, कौस्तूभ दिवाण यांच्या निवेदनात प्रसिद्ध आनंदी जोशी यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रसिद्ध कलाकार प्रार्थना बेहेरे, अस्मिता सुर्वे, राजेश्वरी खरात, अंजली जाधव, श्वेता खरात आणि संच यांच्यासह इतर कलाकारांनी 'आदि माया आदि शक्ती' चा नृत्याच्या माध्यमातून जागर केला. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी परिवारासह उपस्थित होते.

 

बचत गटांना भेटी द्या

या कार्यक्रम स्थळी विविध विभागांनी तसेच बचतगटांनी आकर्षक विविध वस्तु व पदार्थाचे स्टॉल लावले आहेत. नागरिकांनी या स्टॉलला भेट देवून पाहणी व खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

प्रवेश निःशुल्क, सर्वांसाठी खुला

जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणसाने बघावा यासाठी आयोजित केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवेशिका किंवा पासेसची या ठिकाणी आवश्यकता नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

आजचे कार्यक्रम

महासंस्कृती महोत्सवात 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यत जल्लोष या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने व नाटय कलावंताचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. यात नृत्य, स्कीट, गायन तसेच नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित प्रथितयश कलावंतासह अंशुमन विचारे व किशोरी अंबिये यांचेही सादरीकरण होणार आहे. तरी नागरिकांनी सहपरिवार या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000





























 वृत्त क्र. 142

 

महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्यात

98 महिला उमेदवारांची अंतिम निवड  

 

·   273 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील बेरोजगार युवतींना नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन आज 17 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या मेळाव्यात प्रमुख पाहुणे प्रकाश निहलानी यांनी युवतींना करिअर विषयक मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला. एकूण 13 कंपन्यांनी या मेळाव्यात आपला सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये एकुण 379 महिलांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 273 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड तर 98 महिला उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.  

 

या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी सतीश चव्हाण, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे प्रतिनिधी विशाल चव्हाण, स्वाती तुपेकर, शिवाजी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती स्मिता नायर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

00000








 वृत्त क्र. 141


महासंस्कृती मेळाव्यात समृद्ध वारशांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे नंदगिरी किल्ल्यावर प्रदर्शन

• जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

• जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळजीवनशैलीनिसर्गस्थापत्यकलापर्यटन इ. छायाचित्रांचे प्रदर्शन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- गोदावरी तीराच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीत पराक्रमाच्या गड किल्ल्यांपासून आस्थेच्या मंदिरांपर्यंत आणि आपल्या चालीरीतींपर्यंत समृद्ध वारसा नांदेड परिसराला लाभला आहे. या समृद्ध वारशांचे जीवंत चित्रण असणारे प्रदर्शन आजपासून दोन दिवस महासंस्कृती महोत्सवात सुरू झाले आहे. त्याचा लाभ घेण्याचे  आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महासंस्कृती महोत्सवानिमित्त नांदेड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  नांदेड येथील नंदगिरी किल्ल्यावर आज दोन दिवशीय भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपविभागीय अधिकारी विकास मानेनायब तहसिलदार मकरंद दिवाकरपत्रकार शंतनू डोईफोडेसुरेश जोंधळे आदींची उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  नांदेडच्या होळी परिसरातील नंदगिरी किल्ला येथे हे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. जगदंब ढोल ताशा पथक, नांदेड यांच्यावतीने  ढोल ताशाच्या गजरात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दिनांक 17 व 18 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळजीवनशैलीनिसर्गस्थापत्यकलापर्यटन इत्यादी विषयावर छायाचित्र प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेषतः शाळकरी मुले महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासक छायाचित्रकार कलाप्रेमींनी आपल्या या वारशांच्या संदर्भात जाणून घ्यावेअसे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

0000









  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...