Monday, April 26, 2021

1 हजार 247 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 873 व्यक्ती कोरोना बाधित 24 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

 

 1 हजार 247 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 873 व्यक्ती कोरोना बाधित

 24 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 564 अहवालापैकी 873 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 744 तर अँटिजेन तपासणीद्वारे 129 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 76  हजार 55 एवढी झाली असून यातील 62  हजार  418 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 12  हजार  795 रुग्ण उपचार घेत असून 249 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 24 ते 26 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 454 एवढी झाली आहे. दिनांक 24 एप्रिल रोजी मुखेड कोविड रुग्णालय मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील 50 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील निवघा येथील 65 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील शिंगारवाडी येथील 45 वर्षाची महिला, दिनांक 25 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे सुनिल नगर नांदेड येथील 32 वर्षाचा पुरुष, कंधार तालुक्यातील गुंडा येथील 52 वर्षाची महिला, छत्रपती चौक नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष, पाठक गल्ली नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, कंधार येथील येथील 75 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे विष्णू नगर नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील गोळेगाव येथील 75 वर्षाचा पुरुष, श्रीनगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, मालेगाव रोड नांदेड येथील 59 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील पारडी येथील 50 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, कौठा नांदेड येथील 32 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 50 वर्षाची महिला,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील 65 वर्षाचा पुरुष, हिमायतनगर नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील नागझरी येथील 70 वर्षाचा पुरुष, ठक्करवाड रुग्णालय येथे विशाल नगर नांदेड येथील 78 वर्षाचा पुरुष, सहयोग रुग्णालय मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील 74 वर्षाचा पुरुष, नांदेड क्रिटिकल केअर रुग्णालय येथे अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील 70 वर्षाची महिला, दिनांक 26 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल बाफना रोड नांदेड येथील 57 वर्षाचा पुरुष, आश्विनी रुग्णालय लोकमित्रनगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.13 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 307, बिलोली 61, हिमायतनगर 2, माहूर 5, उमरी 57, परभणी 6,नांदेड ग्रामीण 15, देगलूर 27, कंधार 6, मुदखेड 36, हिंगोली 5, कोल्हापूर 1, अर्धापूर 21, धर्माबाद 4, किनवट 1, मुखेड 48, यवतमाळ 3, भोकर 30, हदगाव 8, लोहा 66, नायगाव 34, नाशिक 1 असे एकूण 744 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 30, बिलोली 1, हिमायतनगर 2, माहूर 2, उमरी 2, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 2, कंधार 2, मुदखेड 44, हिंगोली 6, अर्धापूर 9, धर्माबाद 2, किनवट 5, मुखेड 5, परभणी 1, भोकर 1, हदगाव 2, लोहा 4, नायगाव 2, सांगली 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 129 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 247 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 15, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 592, धमार्बाद तालुक्यातंर्गत 21, देगलूर कोविड रुग्णालय 8, अर्धापूर तालुक्यातंर्गत 1, उमरी तालुक्यातंर्गत 10, माहूर तालुक्यातंर्गत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 49, मुखेड कोविड रुग्णालय 73, बिलोली तालुक्यातंर्गत 32, किनवट कोविड रुग्णालय 74, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 93, बारड कोविड केअर सेंटर 3, मुदखेड 17, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 10, हदगाव कोविड रुग्णालय 33, कंधार तालुक्यातंर्गत 4, नायगाव तालुक्यातंर्गत 6, लोहा तालुक्यातंर्गत 34, मांडवी कोविड केअर सेंटर 13, खाजगी रुग्णालय 150 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 12 हजार 795 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 200, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 177, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 105, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 88, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 128, देगलूर कोविड रुग्णालय 54, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 55, बिलोली कोविड केअर सेंटर 66, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11,

नायगाव कोविड केअर सेंटर 32, उमरी कोविड केअर सेंटर 49, माहूर कोविड केअर सेंटर 34, भोकर कोविड केअर सेंटर 10, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 56, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 81, कंधार कोविड केअर सेंटर 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर 86 , मुदखेड कोविड केअर सेंटर 18, अर्धापूर कोविड केअर सेंटर 10, बारड कोविड केअर सेंटर 15, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 9, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 55, एनआरआय कोविड केअर सेंटर 75, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 77 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5 हजार 937, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 945 , खाजगी रुग्णालय 2 हजार 317, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 13 हजार 193 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 25 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 46 हजार 832

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 60 हजार 958

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 76 हजार 928

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 62 हजार 418

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 454

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.13 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-28

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-378

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 12 हजार 795

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-249

00000

 

 

हरवलेला मुलगा आढळ्यास मनाठा पोलीस स्टेशनला माहिती कळवावी

 

हरवलेला मुलगा आढळ्यास मनाठा पोलीस स्टेशनला माहिती कळवावी

नांदेड (जिमाका) दि. 26:-  हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील फिर्यादी नामे बबन पि. दत्ता डोके यांनी 10 मार्च 2021 रोजी पालीस स्टेशन मनाठा येथे दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा नामे खंडू पि. बबन डोके वय-17 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. उंचाडा, ता. हदगाव (सध्या वय 21 वर्षे असावे) कोणालाही काही न सांगता निघून गेला आहे.

 

नातेवाईकांकडे व इतरत्र मुलाचा शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. कोणीतरी अज्ञान व्यक्तीने मुलास फुस लावून पळवून नेले असावे या जबाबावरुन पोलीस स्टेशन मनाठा येथे गुन्हा दाखल असून तपासावर आहे. या अपह्त मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. नाव खंडु पि. बबन डोके, पत्ता-मौजे उंचाडा ता. हदगाव जि. नांदेड, वय-17 वर्षे (सध्या-21 वर्षे असावे) रंग-गोरा, बांधा-सडपातळ, उंची-अंदाजे पावणेपाच फुट, अंगावर कपडे-पॅन्ट व शर्ट, पायात-चप्पल, शिक्षण-दहावी, भाषा-मराठी, केस-काळे, चेहरा-गोल वरील वर्णनाच्या अपह्त मुलाची माहिती मिळाल्यास सहकार्य करावे व व्हि.एल.चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. मनाठा- 9767747774 व टी. वाय. चिटेवार, पोलीस उपनिरीक्षक - 9834634149 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक, टि.वाय. चिटटेवार पोलीस स्टेशन मनाठा यांनी केले आहे.

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...