Monday, June 10, 2024

वृत्त क्र. 472

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात

शिकाऊ उमेदवारांची नेमणूक 

            नांदेड, दि. 10 :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड मध्ये सन 2024-25 सत्रासाठी व्यवसायनिहाय वाढीव प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार म्हणुन मेकॅनिक मोटार व्हेईकल 50डिझेल मेकॅनिक 28शिट मेटल वर्क्स 10ॲटो इलेक्ट्रीशियन 8मेकॅनिक (रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडीशनर) 4पेन्टर (जनरल) 2वेल्डर (गॅस अॅन्ड इलेक्ट्रीक) 2 अशी एकुण 104 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

(अनुसूचित जातीअनुसूचित जमाती व दिव्यांग करीता शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत.) त्यासाठी आय.टी.आय. उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार नेमणुक करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशन अभासक्रम पुर्ण केलेल्या व ॲटो इंजीनिअरिंग टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे व नंतर MSRTC DIVISION NANDED या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय करुन रा.प. महामंडळाचे विहीत नमुण्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक आहे.

सदर छापील अर्ज दिनांक 11 ते 20 जून 2024 वेळ 15.00 वाजेपर्यंत शनिवाररविवार व सुट्टीचा दिवस वगळुन विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा.प.नांदेड येथे स्विकारले जातील. सदर अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गाकरीता 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. सदर शिकाऊ उमेदवार नेमणुक ही नांदेड जिल्ह्याकरीता असुन फक्त नांदेड जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणुन नेमणुक करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील 3 वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 वृत्त क्र. 471

खरीप हंगामात शेतकरी, विक्रेत्यांना येणाऱ्या 

अडचणींचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापित

 

            नांदेड, दि. 10 : हाराष्ट्र राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापुर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खरिप हंगाम-2024 च्या आढावा सभेत बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तापुर्ण उपलब्धतेबाबत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

सदर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्काचा व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता ) 9822446655 उपलब्ध करुन देण्यात आला आहे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेल वर सुद्धा पाठवता, नोंदवता येईल.

संबंधीतांनी, उपरोक्त नमुद व्हॉट्सॲप क्रमांक (9822446655), टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक (18002334000) तसेच ई-मेलवर (controlroom.qc.maharashtra@gmail.com) येणाऱ्या अडचणी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत. साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा. सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास सुध्दा आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी उपरोक्त क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.

शेतक-यांच्या सुविधेसाठी एक भ्रमणध्वणी, एक टोल फ्री क्रमांक व एक ईमेल तक्रार निवारणासाठी समर्पीत केलेले असुन त्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी 1 जुन ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत नोंदवण्याबाबत आवाहन कृषि आयुक्तालय पुणे  यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 470 

 

अनु.जाती व अनु.जमातीच्या शेतकऱ्यांसाठी

फलोत्पादन योजनांच्या माहितीचा विशेष मेळावा

            नांदेड, दि. 10 : नांदेड येथे कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर दिनांक ते 20 जून 2024 या पंधरवाड्यात विशेष मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.

या मेळाव्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती देण्यात येणार आहे. प्रामुख्याने सामूहिक शेततळेवैयक्तीक शेततळे अस्तरीकरणकांदाचाळपॅक हाऊस, 20 एचपीच्या आतील छोटे ट्रॅक्टरपावर टीलरप्लास्टिक मल्चींगहरितगृहशेडनेट हाऊसशितगृहरायपनिंग चेंबर इत्यादी घटकांची तसेच ठीबक व तुषार सिंचन बाबत माहिती देण्यात येणार आहे.

जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. करीता जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावाअसे अवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहे बऱ्हाटे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००

  वृत्त क्र. 526   अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   नांदेड दि. 25 :- जिल्ह्यात गत ...