Friday, August 9, 2019


पूरग्रस्त भागातील नागरीकांना मदत देण्याकरीता 154 कोटी तातडीने वितरीत
- मुख्य सचिवांची माहिती

मुंबईदि. 9 : पूरग्रस्त भागातील नागरीकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही. पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लेप्टोवरील उपायांच्या सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  -
·       महाराष्ट्रात जून ते 9 ऑगस्टपर्यंत 782 मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या 109 टक्के पाऊस झाला. मागीलवर्षी या काळात 80 टक्के पाऊस झाला होता.
·       4 ऑगस्ट पासून कोल्हापूर येथे सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला. सांगलीमध्ये सरासरीच्या 223 टक्के पाऊस पडला आणि साताऱ्यात सरासरीच्या 181 टक्के पाऊस झाला.
·       अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 8 आणि सांगली जिल्ह्यात 4 असे एकूण 12 तालुके बाधित झाले.
·       कोल्हापूरमध्ये 239 गावेसांगलीत 90 गावे अशी 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.
·       या बाधित गावांमध्ये आतापर्यंत प्रशासनलष्करनौदलएनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या मदतीने आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
·       या सर्व व्यक्तींसाठी मदत निवारे उभारले आहेत. तेथे त्यांना वास्तव्यास ठेवण्यात आले आहे.
·       राज्य शासनाने असा निर्णय घेतला आहे कीया निवाऱ्यांच्या बांधकामांचातेथील नागरीकांच्या जेवणाचा तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना कपडे पुरविल्यास त्याचा खर्च आणि औषधांचा खर्च शासन देणार आहे. निवाऱ्यातील नागरीकांसाठी अन्य बाबींसाठी खर्च करावा लागला तर त्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
·       एनडीआरएफची एकूण 31 पथके (एका पथकात 40 जणांचा समावेश) कार्यरत असून त्यातील 16 पथके सांगलीमध्ये6 कोल्हापूरमध्येबाकी पथके आवश्यकता भासल्यास कार्यरत ठेवण्यात येत आहेत.
·       महाराष्ट्रात एनडीआरएफची ओडीसा येथून 5 पथके आणि 5 पथके भटींडा पंजाब येथून मागविण्यात आली आहेत. या पथकांना शासनाने एअर लिफ्टींग करुन पूरग्रस्त भागात तैनात केले आहे. गुजरातमधून 3 पथके मागविण्यात आली असून ती देखील कार्यरत आहेत. एसडीआरएफची 2 पथके  सांगलीमध्ये कार्यरत आहेत. तर एक पथक कोल्हापूरात आहे.
·       भारतीय नौदलाची 14 पथके कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये 12 पथके कार्यरत आहेत.
·       या सर्व पथकांकडे मोठ्या बोटी असून अत्याधुनिक साधने आणि विशेषज्ञांचा देखील समावेश आहे. राज्य शासनाने सैन्याकडे विनंती करुन बचाव पथकाला डोनीअर विमानाद्वारे पूरग्रस्त भागात सोडण्याचे काम केले. सेनादलाचे 8 कॉलम कार्यरत असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 4 कॉलम तैनात आहेत. एका कॉलममध्ये 40 जवानांचा समावेश आहे.
·       पूरग्रस्त भागात जे नागरीक स्थलांतर करु इच्छित नव्हते त्यांना प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 किलो तांदुळ आणि गहू वाटप करण्यात येत आहे.
·       सर्व पूरग्रस्त भागातील नागरीकांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये तर शहरी भागातील नागरीकांना 15 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरीकांना ही मदत देण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही.
·       आरोग्य विभागामार्फत 70 वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. त्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि 2 ते 3 नर्स यांचा समावेश आहे.
·       पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
·       लेप्टोवरील उपायांच्या गोळ्यांचे (डॉक्सीसीन) वाटप करण्यात आले असून सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. राखीव म्हणून 30 लाख गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत. साथ रोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी संनियंत्रण केले जात आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.
·       आपत्तीग्रस्त भागात पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
·       प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत सुमारे एक लाख हेक्टर शेतीची जमीन बाधित झाली आहे. त्याची जिरायतबागायतीफळबाग अशी फोड करण्यात येईल.
·       पाणी ओसरल्यावर पीक विम्यापोटी नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणासाठी वीमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले असून पिकाचे नुकसान त्याचे पंचनामे करण्याचेही निर्देश दिले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ मिळू शकेल. केंद्र शासनाकडे यासाठी विनंती करण्यात आली होती ती मान्य झाली आहे. पाणी कमी झाल्यावर पीक विम्याचे पंचनामे सुरु होतील.
·       पूरामुळे बाधित झालेल्या रस्त्यांचा आढावा घेतला. रस्ते वाहून जातातखराब होतात पाणी ओसरल्यानंतर त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु होते. प्रत्येक भागात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरुस्तीसाठी डांबर यासह आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ पोहोच करण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
·       ज्यावेळेस रस्त्यांवरुन वाहतूक सुरु होईल त्यावेळेस वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. जेणेकरुन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याचेही नियोजन करण्यात आले आहे.
·       पुरामुळे पाण्याचे स्त्रोत दुषित होतात. पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही दिवस टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी टँकर्स उपलब्ध आहेत ते अधिग्रहीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
·       वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. 32 पथके कोल्हापूर येथे तर 8 पथके सांगलीमध्ये तैनात केली आहेत. एका पथकात 4 लाईनमन आणि कर्मचारी उपलब्ध आहेत. पाणी कमी झाल्यावर त्यांच्यामार्फत पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
·       ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडाले असतील तर त्याच्या दुरुस्तीची वाट न पाहता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा. मोठ्या संख्येने ट्रान्सफॉर्मर कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा योजनांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मररुग्णालयसार्वजनिक ठिकाणेशाळामहाविद्यालये यांना वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
00000
शासकीय तंत्र प्रशाला केंद्रात
विविध व्यवसाय अभ्यासक्रमास प्रवेश सुरु
        नांदेड दि. 9 :- येथील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र या शासकीय संस्थेत इयत्ता दहावी उत्तीर्ण, दहावी एटीकेटी विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
            अभ्यासक्रम इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, ॲटोमोबॉईल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीसाठी शैक्षणिक वर्षे 2019-20 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपनीत नौकरीची संधी प्राप्त होते. मर्यादीत जागा असल्यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, भारत गॅस एजन्सी समोर बाबानगर, नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे मुख्याध्यापक एम. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.
00000

प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनेत
जिल्ह्यातील 1 लाख 36 हजार 129 शेतकऱ्यांना पहिला तर  
1 लाख 21 हजार 496 शेतकऱ्यांना दुसरा हप्ता बँक खात्यात जमा
        नांदेड दि. 9 :-प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी ( PM-KISAN)  योजनेअंतर्गत निश्‍चीत उत्‍पन्‍न मिळण्‍याकरीता भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्‍प्‍यामध्‍ये केंद्र शासनाकडून थेट शेतकरी कुटूंबाच्‍या बॅंक खात्‍यामध्‍ये जमा येत असून, नांदेड जिल्‍हयातील 1 लाख 36 हजार 129 इतक्‍या शेतकऱ्यांना पहिला हप्‍ता व 1 लाख 21 हजार 496 इतक्या शेतकऱ्यांना दुसरा हप्‍ता शेतकरी कुटूंबाच्‍या बॅंक खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात आला आहे.
            नांदेड जिल्‍हयातील अर्धापूर - 6362, भोकर - 6889, बिलोली - 7792, देलगूर – 10674, धर्माबाद – 5898, हदगांव – 15926, हिमायतनगर – 10753, कंधार – 12873, किनवट-14310, लोहा-7352, माहूर – 6330, मुदखेड – 5578, मुखेड – 11200, नायगांव – 7842, नांदेड – 104 व उमरी  -6606 इतक्‍या लाभार्थी कुटूंबाना पहिला हप्‍ता जमा करण्‍यात आला आहे. तसेच नांदेड जिल्‍हयातील अर्धापूर - 5825, भोकर - 6025, बिलोली - 6825, देलगूर – 9090, धर्माबाद – 5860, हदगांव – 14219, हिमायतनगर – 7851, कंधार – 12361, किनवट-12649, लोहा-6991, माहूर – 6248, मुदखेड – 5258, मुखेड – 8909, नायगांव – 6917, नांदेड – 83 व उमरी  -6385 इतक्‍या लाभार्थी कुटूंबांना दुसरा हप्‍ता जमा झालेला आहे.
        शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग यांचे परिपत्रक दि.04.02.2019 अन्‍वये शेतक-यांना निश्‍चीत उत्‍पन्‍न मिळण्‍याकरीता प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी ( PM-KISAN)  योजना  सुरू करण्‍यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत संविधानीक पदावरील व्‍यक्‍ती, विद्यमान व माजी मंत्री/ संसद-विधानभवन सदस्‍य/ महापौर/नगराध्‍यक्ष/ जिल्‍हा पंचायत सभापती तसेच कार्यरत व सेवानिवृत्‍त कर्मचारी (वर्ग-4 वगळून व रु.10,000 पेक्षा कमी निवृत्‍तीवेतन असलेले निवृत्‍तीवेतनधारक वगळून) व डॉक्‍टर/ अभियंता/ वकील/ चार्टर्ड अकाउन्‍टन्‍ट / आर्कीटेक्‍ट, इ. यांचेसह मागील वर्षात आयकर भरणारे व्‍यक्‍ती या सर्वांना वगळण्‍याचे आले आहे. जिल्‍हाधिकारी श्री. अरूण  डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्‍हयातील 3,04,925 इतकया पात्र लाभार्थी कुटूंबांची माहिती माहे फेब्रुवारी 2019 या महिन्‍यात पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्‍यात आलेली आहे. तसेच कृषी मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.07.06.2019  अन्‍वये प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत क्षेत्र मर्यादेची अट शिथिल (अल्‍प, अत्‍यल्‍प व बहूभूधारक) सरसकट सर्व भूधारक शेतक-यांना लागू करण्‍यात आली आहे. त्‍यानुषंगाने नवीन पात्र असलेले 86,813 लाभार्थी कुटूंबांची माहे जुन 2019 मध्‍ये पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्‍यात आली असून, जिल्‍हयात एकूण 3,91,738 पात्र लाभार्थी शेतकरी कुटूंबाची माहिती अपलोड करण्‍याचे काम पुर्ण करण्‍यात आले असून, वंचित राहिलेल्‍या पात्र लाभार्थी कुटूंबाचा शोध घेऊन तालुकास्‍तरावर अपलोड करण्‍याचे काम सुरू  आहे, अशी माहिती येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
00000


आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
नांदेड दि. 9 :-आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सोमवार 12 ऑगस्ट 2019 सकाळी 7.30 वा. श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक रुग्णालय नांदेड येथून महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची रॅली निघणार असून श्री गुरुगोविंदसिंघ स्मारक रुग्णालय नांदेड-गांधी पुतळा-महावीरचौक-वजिराबाद-मुथाचौक मार्गे जावून श्री गुरुगोविंदसिंघ स्मारक रुग्णालय नांदेड येथे समारोप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी दिली.
00000


महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम व नियम सुधारणा
समितीच्या बैठकीचे औरंगाबाद येथे रविवारी आयोजन
नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम व नियम सुधारणा समितीची विभागवार बैठक औरंगाबाद येथे रविवार 11 ऑगस्ट 2019 रोजी औरंगपुरा येथील बलवंत वाचनालयाच्या स्व. विजयेंद्र काबरा स्मृती सभागृहात सकाळी 11 वा. आयोजित केली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम 1) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहाय्यक अनुदान व इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम 1970. 2) महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहायक अनुदानासाठी मान्यता देणे) नियम 1971. 3) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपद्धती) नियम, 1973. 4) महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थाची ग्रंथालय) सहायक अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम 1974 यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासयाठी ग्रंथालय संचालक सु. हि. राठोड यांचे अध्यक्षतेखाली सुधारणा समिती गठीत केली आहे.
या बैठकीसाठी औरंगाबाद विभागातील शासनमान्य जिल्हा व तालुका ग्रंथालयांचे अध्यक्ष कार्यवाह, ग्रंथालय, सर्व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कार्यवाह, ग्रंथ / ग्रंथालय चळवळीशी संबंधीत स्थानिक लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक/ प्रतिनिधी, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, वाचक व सभासद, विद्यापीठ, महाविद्यालयीन, शालेय ग्रंथपाल / प्राध्यापक, ग्रंथालय संचालनालयातील माजी अधिकारी आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन समिती सदस्य तथा सहायक ग्रंथालय संचालक सु. सं. हुसे यांनी केले आहे.
00000


मराठवाड्यात बीड, लातूर, उस्मनाबाद वगळता
इतर इतर जिल्ह्यांत पावसाची भूरभूर
विभागात 291 मि.मी. पाऊस
औरंगाबाद,दि. 9 (विमाका) :- आज सकाळी मागील चोवीस तासांत मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस झाला नाही. उर्वरित जिल्ह्यात पावसाची केवळ भूरभूर सुरू होती. विभागात आजपर्यंत एकूण 291.38 मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत फक्त 37.4 टक्के पाऊस विभागात झाला आहे. अद्यापपर्यंत चांगल्या पावसाची प्रतिक्षा सुरू आहे.
 जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद- 308.90 मि.मी, जालना -268.27  मि.मी, परभणी -270.01 मि.मी, हिंगोली - 380.01 मि.मी, नांदेड 454.47 मि.मी, बीड 157.82 मि.मी. लातूर 251.20 मि.मी, आणि उस्मानाबाद 240.33 मि.मी.
आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 8.70 (268.20), फुलंब्री 7.50 (325.75), पैठण 8.60 (204.43), सिल्लोड 15.75 (418.06), सोयगाव 12.00 (463.33), वैजापूर 8.10 (263.20), गंगापूर 8.78 (240.89), कन्नड 11.38 (327.88), खुलताबाद 7.33 (268.33). जिल्ह्यात एकूण 308.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 8.00 (213.19), बदनापूर 13.40 (259.20), भोकरदन 15.00 (381.38), जाफ्राबाद 11.40 (308.60), परतूर 13.00 (253.26), मंठा 7.25 (272.00), अंबड 11.00 (236.86), घनसावंगी 9.00 (221.71), जिल्ह्यात एकूण 268.27 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 1.38 (240.17), पालम 0.00 (245.33), पूर्णा 1.60 (348.40), गंगाखेड 0.25 (265.25), सोनपेठ 0.00 (265.00), सेलू 7.60 (232.80), पाथरी 6.00 (244.33), जिंतूर 8.67 (273.83), मानवत 3.00 (315.00), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 270.01 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 7.57 (354.29), कळमनुरी 8.67 (474.92), सेनगाव 11.17 (354.83), वसमत 6.43 (265.29), औंढा नागनाथ 8.00 (450.75). जिल्ह्यात एकूण 380.01 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 2.75 (421.75), मुदखेड 6.33 (497.67), अर्धापूर 3.67 (390.66), भोकर 9.00 (473.00), उमरी 3.67 (435.12), कंधार 0.00 (415.16), लोहा 0.17 (365.65), किनवट 23.29 (627.62), माहूर 35.00 (634.44), हदगाव 11.00 (442.14), हिमायत नगर 13.00 (518.99), देगलूर 0.67 (289.66), बिलोली 0.00 (494.80), धर्माबाद 1.33 (441.00), नायगाव 1.80 (435.00), मुखेड 7.00 (388.86), जिल्ह्यात एकूण 454.47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 0.45 (141.27), पाटोदा 0.00 (176.00), आष्टी 0.00 (160.86), गेवराई 2.70 (126.10), शिरुर कासार 0.00 (104.00), वडवणी 3.00 (157.50), अंबाजोगाई 0.00 (146.80), माजलगाव 2.50 (227.53), केज 0.00 (148.57), धारुर 4.00 (138.67), परळी 0.80 (208.67), जिल्ह्यात एकूण 157.82 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 0.00 (159.50), औसा 0.00 (163.29), रेणापूर 0.0 (202.25), उदगीर 0.00 (258.43), अहमदपूर 0.00 (378.00), चाकुर 0.00 (217.80), जळकोट 0.00 (353.50), निलंगा 0.38 (264.38), देवणी 0.00 (270.50), शिरुर अनंतपाळ 0.00 (244.33), जिल्ह्यात एकूण 251.20 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 0.00 (222.75), तुळजापूर 0.00 (325.29), उमरगा 0.00 (332.80), लोहारा 0.00 (322.33), कळंब 0.00 (169.83), भूम 0.00 (215.90), वाशी 0.00 (199.33), परंडा 0.00 (134.40), जिल्ह्यात एकूण 240.33 मि.मी. पाऊस झाला आहे.
******


औरंगाबाद येथे माजी सैनिकांसाठी
आधार कार्ड दुरुस्ती कॅम्पचे आयोजन
नांदेड दि. 9 :- माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचे आधारकार्डमध्ये चुका असल्यामुळे त्यांना ईसीएचएस मेडीकल कार्ड बनविणे व इतर व्यवहारासाठी अडचणी निर्माण होत असल्याने स्टेशन हेडक्वार्टर औरंगाबाद  यांनी  आधारकार्ड दुरुस्तीसाठी मुंबई येथील युनिक आयडींटी फिकेशन अधिकारी यांच्याशी चर्चा करुन  16 ते 20 ऑगस्ट 2019 दरम्यान  आधार कार्डस दुरुस्तीसाठी औरंगाबाद छावणी येथे कॅम्पचे आयोजन केले आहे.
या कॅम्पमध्ये  युनिक आयडींटीटी फिकेशन अधिकारी यांची एक टिम येत आहे. नांदेड जिल्हयातील ज्या माजी सैनिकांना आधारकार्डमध्ये दुरुस्ती करावयाची असेल त्यांनी सर्व दुरुस्तीचे आधार असलेले संबधीत मुळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे व या आयोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
00000


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई, ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 9 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000


जिल्हाधिकारी कार्यालयात
          मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 9 :-जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 13 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   
जिल्ह्या महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार 13 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
0000

गणेश मंडळांना वर्गणीसाठी
परवाना घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 9 :- गणेश चतुर्थीसाठी गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने 13 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
गणेश मंडळांना ही परवानगी ऑनलाईन पद्धती देण्यात येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन नोंदणीसाठी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे.
परवान्यासाठी सर्व सभासदांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, दुरध्वनी नंबर, जागा मालकाची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत पत्र, गणेश मंडळ स्थापनेबाबत ठराव, मागीलवर्षी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी घेतली असले तर गेल्या वर्षाचा अधिकृत लेखा परिक्षकामार्फत जमा खर्चाचा हिशोब या कागदपत्रांची आवश्यकता आहे, असेही आवाहन धर्मादाय उपआयुक्त नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.   
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...