परीक्षेत यशप्राप्तीसाठी सराव
महत्वाचा - हतनुरे
नांदेड दि. 30 :- स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी
सातत्यपूर्ण अभ्यासासोबत परीक्षेच्या
अनुषंगाने सराव परीक्षा देणे
महत्वाचे असून यामाध्यमातून यश मिळण्याचा आत्मविश्वास वाढीस लागतो, असे
प्रतिपादन पुणे येथील प्रा. हणमंत हतनुरे यांनी केले. "उज्ज्वल नांदेड"
या मोहिमेअतंर्गत
जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू
समिती, नांदेड-वाघाळा शहर मनपा
व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने
राज्य सेवा पूर्व परीक्षेची
तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सराव परीक्षेचे उत्तरासह विश्लेषण करताना
ते बोलत होते.
डॉ. शंकरराव
चव्हाण प्रेक्षागृह व सेतू
समिती अभ्यासिका याठिकाणी सामान्य
ज्ञान व सीसॅट या विषयावर
सराव परीक्षा घेण्यात आली. याप्रसंगी
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, ग्रंथपाल आरती
कोकुलवार व बाळू पावडे
उपस्थित होते.
या दोन्ही विषयाची
सराव परीक्षा झाल्यानंतर प्रा. हतनूरे यांनी पाच तास
सामान्य ज्ञान या विषयावरील
प्रश्नपत्रिकेचे उत्तरासहित विश्लेषण विद्यार्थ्यांसमोर सादर केले. सोबतच प्रश्नपत्रिका
सोडविताना आवश्यक त्या भागावर
लक्ष केन्द्रीत करणे, अचूकता व वेळेचे
व्यवस्थापन या महत्वाच्या बाबी
कशा आत्मसात करायच्या याविषयी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने महत्वाच्या अशा सराव परीक्षेचे
नि:शुल्क
आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी
सुरेश काकाणी व जिल्हा
प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
परीक्षा व कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी कोंडीबा गाडेवाड, रघुवीर
श्रीरामवार, मधुकर, सोपान
यनगुलवाड आदीने सहकार्य केले.
000000