Friday, March 25, 2022

 भगवती व सेवा बाल रुग्णालयास शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक व औद्योगिक भेट 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आले आहे.  वेगवेगळ्या आधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या साह्याने रुग्णाचे योग्य निदान होऊन वेळीच उपचार मिळाल्याने असंख्य प्राण वाचविता आले आहेत. वैद्यकीय उपकरणाची निगडित वैद्यकीय अणुविद्युत पदविका शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे उपलब्ध आहे. राज्यात केवळ तीन शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर या शाखेला प्रतिसाद मिळत आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष वैद्यकीय उपकरणाचा वापर होताना बघण्यासाठी व हाताळण्यासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ.गोरक्ष गर्जे, वैद्यकीय विभाग प्रमुख बी. व्ही. यादव यांच्या पुढाकाराने प्रथम व द्वितीय वर्षाच्या  वैद्यकीय अणुविद्युत शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. 

यात जवळपास 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नांदेड परिसरातील भगवती हॉस्पिटल  येथील अतिदक्षता विभागातील उपकरणांची माहिती व इतर सर्व विभागातील उपकरणांच्या वापराबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना आपुलकीने डॉक्टर राहुल देशमुख यांनी करून दिली. विविध रोग निदानामध्ये त्यांचा उपयोग कसा करायचा याची देखील माहिती त्यांनी दिली. त्यांच्यासोबतच जिव्हाळा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब स्त्रीयांना मदतीचा हात देणाऱ्या तसेच स्त्रियांचे वैद्यकीय प्रश्न सोडविणाऱ्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर्स राजश्री रुपेश देशमुख यांनी ऑपरेशन थिएटर मधील विविध उपकरणांची माहिती विद्यार्थी व विद्यार्थीनींना यावेळी करून दिली.  औद्योगिक सहल यशस्वी होण्यासाठी अधिव्याख्याता प्रा. एस. बी. चव्हाण प्रा. एच. डी. खर्जुले ,प्रा. बी. आर. कोळी, शेख अफसर, तृतीय वर्षातील विद्यार्थीनी कु. पल्लवी धुपे, कु. अंजना तेगंपले, शुभांगी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

000000





 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

तर एक कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 607 अहवालापैकी एकही अहवाल पॉझिटीव्ह आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 797 एवढी झाली आहे. यातील 1 लाख 99 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 6 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषध उपचारानंतर बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणात 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 5 असे एकुण 6 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 93 हजार 402

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 73 हजार 471

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 797

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 99

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-6

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शनिवार 19 एप्रिल 2022 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.  

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मार्च 2022  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 एप्रिल 2022  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 पिकाच्या वाढीसाठी उत्ती, पाने तपासणीची सुविधा उपलब्ध 

·         धनेगाव येथे नवीन उत्ती, पाने तपासणी प्रयोगशाळा सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  पिकाच्या वाढीच्या अवस्थेमधील विविध अन्नद्रव्याची कमतरता पाने व उत्ती परिक्षणातून समजते. त्यानुसार आवश्यक ते खत दिल्यास उत्पादन खर्चात घट होऊन उत्पादनात वाढ होऊन मालाची प्रत सुधारते. मानव विकास योजनेतून उत्ती व पाने परिक्षण प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून 40 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा धनेगाव नांदेड येथे नवीन उत्ती व पाने तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. वनस्पती संबंधीत उत्ती व पाने देताना अडचण आल्यास जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा धनेगाव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8208037806 / 7588428280  /  7744822001 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने केले आहे.

 

या  प्रयोगशाळेत वनस्पतीसाठी आवश्यक अशा 11 (नत्र, स्पुरद, पालाश, कॅल्शीअम, मॅग्नेशीअम, गंध, बोरॉन, जस्त, लोह, तांबे व मॅग्नीज) पोशकद्रव्य (Nutrients) यांचे परीक्षण केले जाते. वरील 11 पोषकद्रव्याची तपासणी करण्यासाठी 1100 रुपये शुल्क आकारले जाईल. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा धनेगांव, वाघाळेकर पेट्रोल पंपासमोर, नांदेड या पत्यावर उत्ती व पाने नमुना स्विकारण्यात येईल.

 

उत्ती व पाने परीक्षणासाठी नमुना घेण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.  वनस्पतीच्या शेंडयाकडील भागाची निवड करावी किंवा खालील कुष्टकात निर्देशित केलेली पाने निवडावी. नमुना हा पुर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण चारही बाजूचा घ्यावा. सुर्य प्रकाशात असलेल्या पानाचाच नमुना घ्यावा. माती लागलेली, किडग्रस्त व रोगग्रस्त पानाचा नमुना घेऊ नये. वनस्पतीचा नमुना काढल्यानंतर 12 तासाच्या आत नमुना प्रयोगशाळेत आणावा. वनस्पतीचे पान, देठ किवा उत्ती स्वच्छ कागदी किवा कापडी पिशवीमध्ये ठेऊन प्रयोगशाळेत आणावेत.

 

निरनिराळया पिकात उत्ती व पाने विश्लेषणासाठी नमुना घेण्याची पध्दत. पिक निर्देशित उत्ती व पर्ण आणि पानाची संख्या याप्रमाणे आहे. लिंबु पिकासाठी नविन पालवीची पाने व पानाची संख्या 30 आहे. केळी या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण शेंडयाकडून तिसरे पान पूर्णपणे उघडल्यानंतर मध्यभागाच्या शिरेच्या दोन्ही बाजूसह तीन इंच रुंदीच्या पटया पानाची संख्या 15 आहे. सिताफळ या पिकासाठी शेंडयाकडून पाचवे पान असून पानाची संख्या 30 राहील. द्राक्ष पिकासाठी उत्ती व पर्ण खोडाच्या शेजारच्या फांदीवरील पाचव्या पानाचा देठ, पानाची संख्या 200 राहील. पेरु या पिकासाठी  उत्ती व पर्ण शेंडयाकडील नुकतीच परिपक्व झालेली पानाची तीसरी जोडी,  पानाची संख्या 25 राहील. संत्रा / मोसंबी पिकासाठी उत्ती व पर्ण चार महिने कालावधीचे नुकतेच जुने झालेले पान, पानाची संख्या 30 आहे. आंबा या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण नविन फांदीच्या मध्य भागाजवळील चार ते सात महिने कालावधीचे पाने व देठ, पानाची संख्या 15 आहे. पपई या पिकासाठी उत्ती व पर्ण शेंडयाकडून सहावे पान व देठ, पानाची संख्या 20 आहे. चिकू या पिकासाठी उत्ती व पर्ण शेंडयाकडून दहावे पान, पानाची संख्या 50 आहे. डाळींब  या पिकासाठी उत्ती व पर्ण शेंडयाकडून आठवे पान, पानाची संख्या 50 आहे. गहू या पिकासाठी उत्ती व पर्ण गहू ओंबीवर येण्यापूर्वीचे पान, पानाची संख्या  50 आहे. ज्वारी या पिकासाठी उत्ती व पर्ण फुलोऱ्याखालील तिसरे पान असून पानाची संख्या 50 आहे. मका या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण निसवण्यापुर्वीचे कनसाजवळील पान असून पानाची संख्या 15 आहे. व्दिदल पिके निर्देशित उत्ती व पर्ण यात फुलोरा येण्यापुर्वीचे नुकतेच परिपक्व झालेले पान असून पानाची संख्या 200 (हरभरा) आहे. सोयाबीन या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण सोयाबीन पेरणीनंतर दोन महिन्याचे शेंडयाकडील तिसरे पान असून पानाची संख्या 25 आहे. कापूस पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण शेंडयाकडून चौथ्या पानाचे देठ असून पानाची संख्या 50 आहे. भूईमुग या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण नुकतेच परिपक्व झालेले पान असून पानाची संख्या 25 आहे. बटाटा या पिकासाठी वाढीच्या टोकाकडील तिसरे व सहावे पान असून पानाची संख्या 20 आहे. टोमॅटो या पिकासाठी वाढीच्या टोकाकडील चौथे पान असून पानाची संख्या 25 आहे. याप्रमाणे निरनिराळ्या पिकात उत्ती व पाने विश्लेषणासाठी नमुना घेण्याची पद्धत आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.  

रविवार 27 मार्च 2022 रोजी पुणे सकाळी 10.45 वा. येथून नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.  सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून रामापूर तांडो ता. पालम जि. परभणीकडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील. रामापूर तांडो येथून दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.15 वा. नांदेड येथून हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.

0000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...