Friday, October 21, 2022

 आधारभूत किंमत खरेदी योजनेत नोंदणी

करण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 21 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान/भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गुरुवार 10 नोव्हेंबर 2022  पर्यन्त मुदतवाढ दिलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

नोंदणीसाठी चालू हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचा आहे.

00000

 निवृत्तीवेतन धारकांना पेन्शन मिळण्यासाठी

बँकेतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी किंवा अंगठा आपल्या नावासमोरच्या रकान्यात करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून बँकांना अद्याक्षर निहाय यादी पाठविण्यात आली असून ही स्वाक्षरी दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत करावीअसे आवाहन कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी केले आहे.

 

याचबरोबर बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखल करण्याकरिता http://jeevanpramam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सादर  करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदरील यादीत जर कोणी स्वाक्षरी  किंवा अंगठा उमटवलेला नसेल अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर 2022 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाहीयाची नोंद घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 दिवाळी सणानिमित्त नवीन वाहन नोंदणीसाठी

सुट्टीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- दिवाळी सणानिमित्त नवीन वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय शनिवार 22 व रविवार 23 ऑक्टोंबर 2022 रोजी नवीन वाहन नोंदणी व कर वसुली कामकाजासाठी सुरु राहणार आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000  

 लेंडी प्रकल्पाला जलसंपदा विभागाकडून गती

 

·  3 गावातील 329 कुटुंबाच्या स्वेच्छा पुनर्वसनाबाबत शासन निर्णय

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील संयुक्त प्रकल्प असलेल्या लेंडी प्रकल्पाला जलसंपदा विभागाने गती दिली आहे. राज्यात भूमीसंपादन, पूनर्वसन व पूर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 लागू करण्यात आला. यातील नियम क्रमांक 108 नुसार स्वेच्छा पुनर्वसनाबाबत तरतूद करण्यात आली. त्यानुसार लेंडी प्रकल्पातील ईटग्याळ गावातील 165 कुटूंब, कोळनूर गावातील 30, वळंकी गावातील 134 अशा एकुण 329 कुटुंबासाठी सुमारे 16 कोटी 42 लाख रुपये आवश्यक अनुदान मंजूर करण्याचा शासनाने निर्णय निर्गमीत केला.

 

नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर असलेल्या देगलूर, मुखेड सह तेलंगणातील मदनूर भागातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासह दोन पिकांची हमी मिळणार आहे. या प्रकल्पाचे 80 टक्के काम पुर्ण झाले असून घळभरणीचे काम प्रलंबित आहे. प्रकल्पाच्या संयुक्त कालव्याची कामे पूर्णत्वास आली आहेत. 14 दरवाजांपैकी फक्त 4 द्वार उभारणीचे काम बाकी आहे. सन 2021 पासून पुर्नवसनाबाबत प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेअभावी हे काम स्थगित होते. या प्रकल्पामुळे 26 हजार 914 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होणार असून यातील 15 हजार 710 हेक्टर क्षेत्र देगलूर व मुखेड तालुक्यातील असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी दिली.

00000     

 हवामानावर आधारित फळपीक विमा

योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार रब्बी सन 2022-23 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना मोसंबीकेळी व आंबा या अधिसूचित पिकाकरीता महसूल मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. स्टॉक एक्चेंच टॉवर्स मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

 

अंबिया बहार रब्बी विमा हप्ता दर पुढील प्रमाणे आहे. मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 80 हजार रुपयेशेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 4 हजार 400 आहे. केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 1 लाख 40 हजार रुपयेशेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 8 हजार 400 आहे. आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 1 लाख 40 हजार रुपयेशेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 23 हजार 100 आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात पुढील प्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल. मोसंबी फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात मालेगावकंधार तालुक्यातील बारुळ, फुलवळकंधार. नांदेड तालुक्यातील लिंबगावविष्णुपुरीनाळेश्वर. मुदखेड तालुक्यातील बारडचा समावेश आहे. विमा संरक्षण प्रकार अवेळी पाऊसजास्त तापमाणजास्त पाऊस, गारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर1 ते 31 मार्च, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर1 जानेवारी ते 30 एप्रिल याप्रमाणे आहे.  

 

केळी फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात दाभडमालेगाव. उमरी तालुक्यात उमरी. किनवट तालुक्यात इस्लापूरशिवणीकिनवटबोधडी. देगलूर तालुक्यात मरखेलहानेगाव, नरंगलशाहापूर. नांदेड तालुक्यात तरोडा बु. तुप्पावसरणीलिंबगावविष्णुपुरी, नांदेड (ग्रामीण)नाळेश्वरवाजेगाव. नायगाव तालुक्यातील बरबडाभोकर तालुक्यात भोकर. मुदखेड तालुक्यात मुदखेडमुगटबारड. लोहा तालुक्यातील शेवडी बा. कापसी बु. हदगाव तालुक्यात हदगावतामसामनाठाआष्टी या मंडळाचा समावेश आहे. विमा संरक्षण प्रकार कमी तापमाणवेगाचा वाराजादा तापमानगारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते  28 फेब्रुवारी1 मार्च ते 31 जुलै1 एप्रिल ते 31 मे1 जानेवारी ते 30 एप्रिल याप्रमाणे आहे.

 

आंबा फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात दाभडमालेगाव. कंधार तालुक्यात बारुळ, फुलवळपेठवडज. नांदेड तालुक्यातील लिंबगावमुखेड तालुक्यात मुक्रमाबाद. हदगाव तालुक्यात निवघातळणी विमा संरक्षण प्रकार कमी तापमाणवेगाचा वाराजादा तापमान, गारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 जानेवारी ते 311 जानेवारी ते 28 फेब्रुवारी1 मार्च ते 31 मार्च1 एप्रिल ते 31 मे1 फेब्रुवारी ते 31 मे याप्रमाणे  विमा संरक्षण कालावधी आहे.

 

या योजनेत अधिसूचित क्षेत्रातअधिसूचित फळपिकासाठी कुळानेभाडेपट्टीने शेती करणारा शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी सहभाग घेऊ शकतात. पिक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारासाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in  वर विमा हप्ता जमा करून सहभागी होता येते. यासाठी आधार कार्डजमीन धारणा सात/बाराआठ-अ उतारा व पिक लागवडस्वयंघोषणापत्र, फळबागेचा केलेला फोटोबँक पासबुकवरील बँकखात्यामध्ये सविस्तर माहिती द्यावी लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाईन भरता येईल.

 

या योजनेत शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावेअधीक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे कृषि सहाय्यकपर्यवेक्षककृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

--

 मोजणी कामाच्या जलद निपटाऱ्यासाठी

भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-   संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्या पुढाकाराने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप प्राप्त झाले आहेत. जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस.पी.सेठीया यांचे हस्ते प्राप्त 22 लॅपटॉपचे वितरण प्रातिनिधिक स्वरूपात नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील नऊ अधिनस्त उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारीभूकरमापक व निमतानदार/परीरक्षण भूमापक यांना आता लॅपटॉप उपलब्ध झाल्याने कामाचा जलद गतीने निपटारा करता येणे शक्य झाले आहे.

 

ईटीएस व रोव्हर मशिनने केलेले मोजणी काम अचुक व जलद नोंदविला जाईल. कार्यालयात प्राप्त मोजणी प्रकरणात मोजणी करुन हद्दीखुणा देणेची कार्यवाही त्याच दिवशी करणे सोईचे होईल. याचबरोबर ड्रोनद्वारे गावठाण भुमापन केलेल्या गावांचे पुढील कामकाज करणे व इपीसीएसद्वारे नगर भुमापनकडील ऑनलाईन फेरफार घेणे याकामी याचा उपयोग होईल असे श्रीमती एस.पी.सेठीया यांनी सांगितले.

0000



महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...