माळेगाव : देवस्वारी व पालखीने आज माळेगाव येथील प्रसिध्द यात्रेची सुरुवात झाली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व देशभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती.
Sunday, December 29, 2024
वृत्त क्र. 1238
संगणकीकरणात जिल्हा दुसरा ; 64 संस्थांचे संगणीकरण
नांदेड दि. 29 डिसेंबर : सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत सहकार चळवळ पोहोचवण्यासाठी व त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची (डीसीडीसी ) जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर डीसीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू आहेत.
सदर योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील 64 विविध सहकारी संस्थानची संगणकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आपला नांदेड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याअनुषंगाने 64 विविध सहकारी संस्था या आता 'गो-लाईव्ह ' या स्टेजपर्यंत गेलेल्या आहेत.
आपल्या जिल्ह्यात 84 प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था अर्थात पीएससीस अर्थात पॅक्स यांनी नागरी सुविधा केंद्र (सिटीजन सर्व्हिसेस, सीएससी ) सूरू केले आहे. गावामध्ये संगणकीय सेवा पुरवितात.
आपल्या जिल्ह्यात 11 पीएससी पॅक्स निवड प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासाठी झालेली आहे.तीन ठिकाणी प्रत्यक्ष केंद्र सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे धान्य साठवणूक व प्रक्रिया प्रकल्प या अंतर्गत आपल्या जिल्हयातील 7 संस्थानी डिपीआर सादर केलेला आहे. सदर डिपीआर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मान्यतेसाठी आहे.प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र हे चार संस्थानचे सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती या कुठल्यातरी एका विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अंतर्गत येतील. हे उद्दिष्ट सुद्धा आपले पुर्ण झालेले आहेत.
सगळ्या ग्रामपंचायती या कुठल्यातरी सहकारी संस्थेअंतर्गत जोडल्या गेल्या आहेत. आगामी टप्यामध्ये जिल्ह्यातील 5 संस्थामार्फत पेट्रोलपंप सुरू करण्याविषयी कार्यवाही सुरू आहे. त्याप्रमाणे जिल्हा एलपीजी गॅस वितरणाचे काम देण्याविषयी कार्यवाही सुरू आहे.या विषयी सहकार विभाग समन्वयक असून या कमिटीचे सर्व सदस्य अर्थात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन, दुग्धविकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड, व्यवस्थापिक संचालक दुधसंघ, व्यवस्थापकिय संचालक मत्स्यपालन संघ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँक हे सगळे या समितीचे सदस्य आहेत. जिल्हा उपनिबंधक (डिडिआर) हे याचे निमंत्रक तथा सदस्य सचिव आहेत.
00000
वृत्त क्र. 1237
दक्षिण भारताच्या महायात्रेला माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात
• पालखी दर्शनाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती
• जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक घेतले श्री खंडेरायाचे दर्शन
• श्री खंडोबारायावर बेल भंडारा खोबरे उधळून निघाली देवस्वारी व पालखी
• हजारोंची अलोट गर्दी ; भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन
• प्लास्टिक मुक्त व कचरामुक्त यात्रेचा संकल्प
नांदेड, दिनांक 29 डिसेंबर :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला. दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली. ‘यळकोट यळकोट’ जय मल्हारच्या गजरात बेल भंडारा, खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. देवस्वारीचे विश्रामगृह येथे आगमन झाले होते.
यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, अमित राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले, कृषी विकास अधिकारी सचिन कपाले, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, पंचायत समिती दशरथराव आडेराघो, सरंपच प्रतिनिधी हनुमंत हुलगंडे, ग्रामपंचायत अधिकारी बी. सी. देवकांबळे, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाजन (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशालराव भगवानराव भोसीकर (पानभोसी) व गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायण पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकदंडे (आष्टुर) व अंबादास खंडेराव जहागीरदार (माळेगाव) यांचा देवस्थानच्यावतीने मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.
यावर्षी मंदिराकडे जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता मोकळा केल्याने भाविकांना दर्शनासाठी सहज जाणे शक्य झाले. याचबरोबर यावर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिक सुरक्षितता घेतली जात आहे. तसेच प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने उत्तम नियोजन केलेले आहे. तसेच पार्किंग, सुरक्षा व्यवस्था याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
यावेळी पालखी सोहळ्यात पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळी, वासुदेव, पारंपारीक पध्दतीने कवड्याच्या माळी, लांब हळदीचा मळवट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी सहभागी झाले होते. त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या उत्सवात सहकार मंत्र्यांसोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते. या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती, माळेगाव ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
आजपासून सुरू झालेली यात्रा पुढे 5 तारखेपर्यत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. दोन जानेवारीपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. देशभरातील भाविक या ठिकाणी पुढील काळात येणार असून पशुधनाचा मोठा बाजार या ठिकाणी या कालावधीत सुरू होतो. तसेच पशुधन संदर्भातील आवश्यक वस्तू विक्रीचेही दुकाने मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय या यात्रेत देणाऱ्या भाविकांसाठी 2 जानेवारीला लावणी महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध लावणी कलाकार व त्यांच्या अनेक चमू या ठिकाणी आपली कला साजरी करणार आहे.
या यात्रेला कुलदैवताची यात्रा समजणाऱ्या अनेक जमातीचे नागरिक आजपासून या ठिकाणी दाखल झाले आहे. आपल्या पारंपारिक पेहेरावात ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. आजच्या यात्रेदरम्यान भारताच्या ग्रामीण भागातील अनेक कलांचे पालखी महोत्सव दरम्यान नागरिकांनी सादरीकरण केले.
या यात्रेदरम्यान पोलीस विभागाने चोख, बंदोबस्त ठेवला असून मोठ्या प्रमाणात पोलीस दल या ठिकाणी कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चौकट– उत्तम जागा पाहूनी मल्हाजरी, देव नांदे गड जेजुरी, उत्तुम रायाची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी या जयघोषात माळेगावच्यात यात्रेत पारंपारीक वाद्याने खंडेरायाची सेवा अर्पण करायला सुरुवात केली. पारंपारीक गितासोबत डफ, तुनतुने आणि जयघोषाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमला. उर्वरित नियोजित कार्यक्रम 2 ते 5 जानेवारी पर्यंत होतील.
00000
वृत्त क्रमांक 6 माळेगाव यात्रेत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...