Friday, October 25, 2019


मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना
निवडणूक आयोगाकडून पुरस्कार
नांदेड, दि. 25 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट) / सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.
लोकशाही बळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क - श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली  110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/25.10.2019


शेतीशाळेत किड व्यवस्थापनेची माहिती 
नांदेड, दि. 25 :- पिंपळकौठा मगरे येथे नुकतेच क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळेचा शेतीदिनाचे आयोजन सरदार गुरुजी यांच्या शेतात करण्यात आले होते. 
या शेतीदिनास ‍जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी आर.बी.चलवदे, मुदखेडचे तालुका कृषी अधीकारी आर.एन.शर्मा, आकाशवाणीचे गणेश धोबे, कृषी पर्यवेक्षक गणेश वाघोळे, कृषी सहाय्यक श्रीमती जे.ओ.येरावाड, ए.एस.मोरे, कृषी सहाय्यक आर.के.कपाटे, शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थीत होते.
            यावेळी  माधव पवार यांनी शेतीशाळेच्या वर्गामध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन घेतलेल्या किडीचे निरिक्षण प्रत्यक्ष सोयाबीनवरील  किडीची ओळख, त्यांचे चित्रीकरण, सादरीकरण याबद्दलची माहिती दिली. गंगाधर मगरे यांनी त्यांचे शेतीशाळेतील वर्गाचे अनुभव कथन करताना सोयाबिन पिकामध्ये कामगंध सापळयाचे किडी ओळखताना व नियंत्रण करताना महत्व सांगीतले. यात त्यांनी कामगंध सापळे एकरी दोन वापरुन सलग तिन दिवस आठ ते दहा नर पतंग सापळयामध्ये आढळुन आल्यास ती किड आर्थीक नुकसान पातळी ओलांडत आहे. पिकास नुकसान करत आहे असा अंदाज बांधुन पिक व्यवस्थापण करणे गरजेचे आहे सांगितले.
            सरदार गुरुजी यांनी 5 टक्के निंबोळी अर्क कसे तयार करावे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षीक करुन दाखविले. यामध्ये उन्हाळयात जमा केलेल्या कडुनिंबाच्या निंबोळया गोळा करुन त्या स्वच्छ करुन 5 किलो निंबोळया बारीक कुटुन घेवुन एका कपडयात बांधुन 10 लिटर पाण्यात 24 तास भीजवुन सकाळी पुर्ण द्रावण पिळुन घेवुन 90 लिटर पाण्यात मिसळावे असे सांगीतले. या शेतीदिनात मुख्य प्रवर्तक गणेश वाघोळे यांनी किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी व संरक्षक किटचे महत्व व प्रात्यक्षीक करुन दाखविले.
            या शेतीदिनास शेतकऱ्यांशी संवाद साधताना आर.बी.चलवदे म्हणाले या शेतीशाळेत आलेला अनुभव शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना सांगावा. तसेच रब्बी हंगामात या गोष्टीचा जास्ती जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री. शर्मा यांनी रब्बी हंगामात हरभरा पिक पेरणी बीबीएफ यंत्राव्दारे व बिज प्रक्रीया करुन करावी तसेच हरभरा पिकात तुषार सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन केले.
00000


पदवीधर व शिक्षकसंघाच्या मतदार
याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम
दावे हरकती स्विकारण्याची 6 नोव्हेंबर अंतिम मुदत
नांदेड दि. 25 :- पदवीधर व शिक्षकसंघाच्या मतदार याद्या नव्याने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नांदेड तालुक्यातील 86 नांदेड उत्तर व 87 नांदेड दक्षिण मतदारसंघात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुनरिक्षणाचे टप्पे व कालावधी पुढील प्रमाणे राहील. नमूना 18 किंवा 19 व्दारे दावे व हरकती स्वीनकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार 6 नोव्हेंबर 2019 आहे. हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई मंगळवार 19 नोव्हेंबर 2019. प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी शनिवार 23 नोव्हेंबर 2019 ते सोमवार 9 डिसेंबर 2019 आहे. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी गुरुवार 26 डिसेंबर 2019 असून मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2019 होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार नांदेड तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्व्ये पदवीधर व शिक्षक संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्यासाठी जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. या प्रसिध्दी पत्रकात नमूद दिनांकापर्यंत सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपले फॉर्म तहसिल कार्यालय नांदेड येथे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
0000

सुधारीत वृत्त


योग्यता प्रमाणपत्रासाठी
वाहनाची तपासणी
नांदेड, दि. 25 :- राज्य शासनाने भाऊबीज निमित्त मंगळवार 29 ऑक्टोंबर 2019 रोजी सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मंगळवार 29 ऑक्टोंबर 2019 रोजी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी  अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे. तसेच ही यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.
(कंसात अपॉईंटमेंट अनुक्रमांक) कंसाबाहेर वाहन उपस्थित करावयाचा दिनांक (अ.क्र.1 ते 15) दि.30 ऑक्टोंबर 2019, (अ.क्र.16 ते 30) दि. 31 ऑक्टोंबर 2019, (अ.क्र.31 ते 45) दि. 1 नोव्हेंबर 2019, (अ.क्र.46 ते 55) दि. 2 नोव्हेंबर 2019 आहे.
मंगळवार 29 ऑक्टोंबर 2019 रोजी अपॉईंमेंट घेतलेल्या सर्व वाहन मालक, चालकांनी त्यांचे वाहन वरील अनुक्रमांकाच्या दिवशी योग्यता प्रमाणपत्रासाठी नूतनीकरणाच्या तपासणीसाठी उपस्थित करावे. नांदेड जिल्हयातील सर्व वाहन चालक, मालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ
 मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 25 :- मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (4) चे अनुरोधाने मतदार नोंदणी अधिकारी, 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी पात्र असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नमुना 18 अन्वये अर्ज मागविण्याबाबत 1 ऑक्टोंबर 2019 रोजी वर्तमानपत्रात मतदार नोंदणी नियम 1960 ला जोडलेला नमुना 18 मध्ये आणि सदर नोटीसच्या दुसऱ्या अनुसूचिमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व पात्र व्यक्तींनी यापूर्वी अर्ज केले नसल्यास त्यांनी 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी नमुना 18 मध्ये अर्ज सादर करु शकतील. हा तपशील विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे अधिकृत संकेतस्थळावर https://aurangabad.gov.in/notification-panel/ वर उपलब्ध आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौंडीचे गुरुवारी आयोजन
नांदेड, दि. 25 :- सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित केली आहे. गुरुवार 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7.30 वा. एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरुवात महत्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरु होणार असून जुना मोंढा टावर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचित केले आहे.
0000000


बारावी परीक्षेचे ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
नांदेड, दि. 25 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परिक्षेच्या शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची अर्ज Saral Database वरुन ऑनलाईन पद्धतीने 3 ते 23 ऑक्टोंबर 2019 तसेच व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream) व सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्ज नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने 24 ते 31 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत व विलंब शुल्कासह 1 ते 8 नोव्हेंबर 2019 या कालावधीत भरावयाची होती. परंतू अर्ज भरताना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत असून या मुदतीवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. त्याचा तपशील पुढीप्रमाणे आहे.
नियमित शुल्कासह (उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची अर्ज Saral Database वरुन आणि व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream) व सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या मुदतवाढीच्या ताराखा) गुरुवार 3 ऑक्टोंबर 2019 ते शुक्रवार 15 नोव्हेंबर 2019 (विलंब शुल्कासह शनिवार 16 नोव्हेंबर 2019 ते सोमवार 25 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत). उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउनलोड करुन बॅकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा शुक्रवार 1 ते 26 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहील.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व Pre-list जमा करावयाची तारीख- गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 आहे. अर्ज भरावयाच्या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी Pre-list Print करुन विद्यार्थ्यांमार्फत अर्जातील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी व विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर सदर Pre-list चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाहा / कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची अर्ज Saral Database वरुन सेव्ह होत नसल्यास त्यांनी उपरोक्त दिलेल्या मुदतीत All Application च्या Link वरुन अर्ज भरावयाची आहेत.
सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्य मुदतीतच संबंधीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारेच भरण्यात यावेत, असे आवाहन डॉ. अशोक भोसले सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केले आहे.  
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144  
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 ऑक्टोंबर 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 नोव्हेंबर 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.   
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...