Tuesday, January 1, 2019

लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..!
आज लोकसंवाद
मोबाईललॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार
मुंबईदि. 1 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभत्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. उद्या बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईलसंगणकटॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे.
हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, Dev Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणि Devendra.Fadanavis या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण)उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाप्रधानमंत्री पीक विमा योजनामागेल त्याला शेततळेगाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवारस्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनासूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे.
0000

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...