Wednesday, February 13, 2019


अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींसाठी  
राज्य परिवहन महामंडळात 685 पदासाठी भरती
नांदेड दि. 13 :- राज्य परिवहन महामंडळात अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी चालक तथा वाहक पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन विभाग नियंत्रक रा. प. नांदेड यांनी केले आहे. 
राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने चालक तथा वाहक पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गाचा अनुशेष व आवश्यकता लक्षात घेऊन 12 दुष्काळग्रस्त जिल्ह्यासह एकुण 21 जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 685 इतक्या चालक तथा वाहक पदाची ही भरती करण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2019 आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती www.msrtcexam.in www.msrtc.gov.in या महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी. तसेच सहाय्यता नि:शुल्क दुरध्वनी क्रमांक 18005722005 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000


वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...