Wednesday, April 3, 2019


निवडणुक कालावधीत शासनाने जप्‍त केलेल्‍या रक्‍कमा परत करण्‍याबाबत समितीची स्‍थापणा.


     मा.भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र.76/Instructions/EEPS/2015/Vol-II Dated 29.05.2015 मधिल परिच्‍छेद 16 Release of cash मध्‍ये नमुद केल्‍यानुसार Police / flying Squads / SST ईत्‍यादी मार्फत जप्‍त करण्‍यात आलेल्‍या रक्‍कमा Release करताना नागरिकाना सोयीस्‍कर होण्‍यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करणे बाबत निर्देश देण्‍यात आलेले आहेत. यानुसार समितीने जप्‍त करण्‍यात आलेल्‍या रक्‍कमांची Suo-motu चौकशी करेल आणि समितीच्‍या चौकशीअंती सदर रक्‍कमेचा संबंध निवडणुक/ राजकीय पक्ष / उमेदवार यांचेशी नसल्‍यास सदर रककम संबंधितास Standard operating procedure नुसार तात्‍काळ परत करण्‍यात यावी असे निर्देश देण्‍यात आले आहे. यासाठी समितीमध्‍ये अध्‍यक्ष म्‍हणून श्री अशोक काकडे (भा.प्र.से.) मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जि.प.नांदेड तर सदस्‍य श्री मनोज गगड, जिल्‍हा कोषागार अधिकारी, नांदेड आणि श्री शिवप्रसाद जटाळे, सहा.संचालक स्‍थानिक निधि लेखा, नांदेड यांचा समावेश आहे.


एमसीएमसी समितीच्‍या मिडिया सेंटरमध्‍ये
जिल्‍ह्यातील रेडिओ प्रतिनिधी व प्रकाशकांची बैठक संपन्‍न

नांदेड,दि. 3ः- १६- लोकसभा निवडणूकीदरम्‍यान प्रचार आणि प्रसार माध्‍यमातून प्रचार करण्‍यात येणा-या साहित्‍याविषयी तसेच संख्‍या यासंदर्भात आकाशवाणीवरुन प्रसारित होणा-या प्रचारपर जाहिरातीच्‍या प्रमाणकीकरण करुन घेवूनच प्रसारित करावी. प्रकाशक , मुद्रक आणि विविध एफएम वाहिन्‍यांचे प्रतिनिधी यांची जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या मिडिया कक्षात आज बैठक घेण्‍यात आली.
या बैठकीस माहिती अधिकारी तथा सदस्‍य सचिव श्रीमती मीरा ढास, प्रा. डॉ. दीपक शिंदे, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्‍यवहारे, श्री. जटाळे आदि सदस्‍यांची या बैठकीस उपस्थिती होती.
या बैठकीदरम्‍यान प्रचार साहित्‍यासंदर्भात उमेदवारांनी छापाई केलेला मजकूर आणि छापिल प्रतींची संख्‍या याची माहिती प्रमाणन करुन घेण्‍यासाठी प्रथम एमसीएमसी कमिटीकडे देणे आवश्‍यक आहे. तसेच आकाशवाणीवरुन प्रसारित होणा-या जिंगल्‍स किंवा जाहिराती याही प्रमाणित करुन घेवूनच प्रसारित करण्‍यात याव्‍यात. समाज माध्‍यमावरुन प्रसारित करण्‍यात येणा-या जाहिराती तसेच या अनुषंगाने येणा-या विविध परवानग्‍या देण्‍यासंदर्भात जिल्‍हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्‍हाण यांनी मार्गदर्शन केले.
प्रकाशक डॉ. आबासाहेब कल्‍याणकर, सुनिल गोधणे, सु.ग. चव्‍हाण, शिवानंद सुरकुटवार, साहेबराव शंकरराव बेळे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी व्‍ही.आर. वाघमारे, रेडिओचे प्रतिनिधी दीपक रत्‍नपारखी (रेड एफएम), शशिकांत महामुणे (माय एफएम), संकेत इनामदार (रेड एफएम), आर. पी. आत्राम (ऑल इंडिया रेडिओ), गौतम पट्टेबहादूर (ऑल इंडिया रेडिओ), शंकर भोसले  (रेडिओ सिटी) यांची उपस्थिती होती.


0000


दिव्‍यांग मतदार जनजागृतीसाठी
"माझं मत माझा स्‍वाभिमान" हे पथनाट्य सादर
नांदेड, दि. 3 :- 17 व्‍या लोकसभा सार्वत्रीक निवडणुक 2019 मतदान प्रक्रीयेतील सर्वांचा स‍हभाग वाढावा यासाठी 86 उत्‍तर नांदेड मतदार संघात दिव्‍यांग मतदारांमध्‍ये जनजागृतीचे कार्यक्रम सात्‍यत्‍याने चालु आहेत.  या कार्यक्रमांतर्गत पुनश्‍च 2 एप्रिल  2019 रोजी कामठा (बू.)  येथील जिल्‍हा परिषद शाळा येथे दिव्‍यांग मतदारांसाठी "माझं मत माझा स्‍वाभिमान" हे पथनाट्य सादर केले. "माझं मत माझा स्‍वाभिमान" या पथनाट्याद्वारे लोकशाहीतील प्रत्‍येकाच्‍या मताचे महत्‍व तसेच दिव्‍यांगासाठी निवडणुक विभागाद्वारे मतदान केंद्रावर पुरविण्‍यात येणा-या सोयी सुविधांबाबत मतदारांचे  प्रबोधन करण्‍यात आले.
यावेळी संबंधीत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील दिव्‍यांग मतदारांनी, नागरिक व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून पथनाट्यास उत्‍स्पूर्तपणे प्रतीसाद दिला. या कार्यक्रमाप्रसंगी कामठा (बू.) येथील सहशिक्षक शेख हमीद पाशा इब्राहीम यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करुन निवडणूक विभागाने  केलेल्‍या जनजागृती बद्दल आभार व्‍यक्‍त केले. या प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्‍तावना प्रा. डॉ. महेश पाटील यांनी केली.

या कार्यक्रमासाठी विधी महाविद्यालयाचे  विद्यार्थी सुरज मंत्री, मारोती कदम, केदार जोशी, कर्णधार मगर, चैतन्‍य अर्जुने व रुषीकेश यादव यांनी पथनाट्य कलाकार म्‍हणून आपला सहभाग नोंदवला.
सहय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती. अनुराधा ढालकरी व नायब तहसिलदार स्‍नेहलता स्‍वामी  यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर कक्षाचे प्रमुख प्रा.डॅा. अशेाक सिद्धेवाड, प्रा. डॅा. महेश पाटील कार्लेकर, प्रा. डॅा. सुग्रीव फड,    प्रा. डॅा. दत्‍ता मेहत्रे  दिव्‍यांग मतदारांचे मतदाणात 100 टक्‍के सहभागी होण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातुन विशेष प्रयत्‍न करत आहेत.
0000



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक   
मतदारांना मतदानाच्या दिवशी
18 एप्रिल रोजी मतदानासाठी सुट्टी
नांदेड, दि. 3 :- लोकसभा निवडणूक मतदानासाठी सदर क्षेत्रातील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यात येणार आहे.  
त्यानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेबर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.
ही सुट्टी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील. जसे राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी.
अपावादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्ण परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे 15 मार्च 2019 रोजीच्या शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ. सय्यद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...