Thursday, March 8, 2018


राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष
रामुजी पवार यांचा दौरा कार्यक्रम   
नांदेड, दि. 8:-  राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांचा दिनांक 8 व 9 मार्च, 2018 दोन दिवसीय दौरा कार्यक्रम असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार, दिनांक 8 मार्च, 2018 रोजी सांयकाळी 8-00 वाजता नांदेड येथे आगमन. रात्री 8-30 ते 9-30 वाजता शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे मुक्कम.  
शुक्रवार, दिनांक 9 मार्च, 2018 रोजी सकाळी 11-00 वाजता नांदेड - वाघाळा महानगरपालिका यांच्या समवेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठकीस उपस्थिती. दुपारी 2-00 वाजता पत्रकार परिषद. 2-30 ते 4-00 वाजता राखीव . सांयकाळी 8-00 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सफाई कामगार कार्यकत्यांसोबत चर्चा. सांयकाळी 8-30 ते 9-30 वाजता राखीव व मुक्काम.
शनिवार, दिनांक 10 मार्च, 2018 रोजी सकाळी 8-00 वाजता नांदेड येथून दिग्रसकडे प्रस्थाव व मुक्काम.
**** 


पेन्शन अदालतीचे आयोजन  
नांदेड, दि. 8:- माहे मार्च, 2018 च्या दुसऱ्या मंगळवार, दिनांक 13 मार्च, 2018 रोजी पेन्शन अदालत जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामधील महसूल विभागातून सेवा निवृत्त झालेले अधिकारी / कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11-00 ते दुपारी 1-30 वाजेपर्यंन्त हजर राहून तक्रारींचे निवेदने द्यावीत, असे अवाहन जिल्हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
****





समाज सदृढ आणि राष्ट्राच्या विकासात महिलांचे भरीव योगदान
--- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
§  विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा     

नांदेड, दि. 8:- सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुले करुन दिली. त्यामुळे महिला विविध क्षेत्रामध्ये पदाक्रांत करीत आहेत. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. तसेच महिला दैनंदिन जीवनात अनेक भुमिका बजावूनही त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात. महिलांच्या या शक्तीचे समाज सदृढ होण्यास आणि राष्ट्राच्या विकासात भरीव योगदान आहे, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.  यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलत होते.     
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, आरोग्य शिबीर, विविध स्पर्धा तसेच तसेच लाभार्थ्यांना आनुदान वाटप अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी,  उपजिल्हाधिकारी  पुनर्वसन महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनुराधा ढालकरी, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे यांच्यासह जिल्हा महसूल प्रशासनातील महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुरुवातीला सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. तद्नंतर महिला दिनाची शपथ उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी सर्व उपस्थित अधिकारी , कर्मचारी यांना दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती ढालकरी यांनी केले.
यावेळी डॉ. लक्ष्मीकांत बजाज व डॉ. अर्चना बजाज यांनी आहार व आरोग्य या विषयी माहिती देवून  पॉवर प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले. यावेळी श्रीमती अंजना सुरेश शेळके, नांदेड या लाभार्थी सामाजिक अर्थ सहाय्य योजनेतंर्गत राष्ट्रीय कुटूंब अर्थ व सहाय्य योजनेचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते रुपये 20 हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.  
रेणुका पांडे यांनी सावित्रीबाई फुले , मनिषा मोहीते यांनी राणी लक्ष्मीबाई, अनुसया नरवाडे यांनी इंदिरा गांधी, स्वाती अलोणे यांनी ऑफिस महिला या विषयावर, उर्मिला कुलकर्णी रजिया सुलतान यांनी  या विषयावर वेशभुषेत माहिती दिली. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त अव्वल कारकून अनुराधा सुरेवाड यांनी आई माझी मायेचा सागर ही कविता सादर केली. तर शालिनी धुळे, अनुपमा मुधोळकर, मनिषा मोहिते यांनी संसार रथाचे आधुनिकीकरणावर नाटीका सादर केली. श्री गुरु गोविंदसिंघ परिचारिका प्रशिक्षण केंद्र, नांदेड येथील प्रशिक्षार्थी चमुने महिला सबलीकरण या विषयावरील पथनाट्य करुन सर्वांची मने जिंकली.  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले. तर आभार श्रीमती उषा कदम यांनी मानले.  नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाल्याबद्दल जया अन्नमवार यांचा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात श्रीमती ढालकरी, तहसीलदार संतोषी देवकुळे, उर्मीला कुलकर्णी, उत्कृष्ट महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, सहा.पुरवठा अधिकारी संतोषी देवकुळे, तहसीलदार श्रीमती उज्वला पांगरकर , नायब तहसीलदार श्रीमती उषा उजपवार, उर्मिला कुलकर्णी, अव्वल कारकून संजीवनी मुपडे या संवर्गातून श्रीमती मीना सोलापूरे , सुचिता बोधगिरे , स्वाती अलाने, ज्योती बाऱ्हाळीकर , शालीनी धुळे, विद्या सुरुंगवाड, लिपीक संवर्गातून श्रीमती माधुरी शेळके, प्रणिता संगपवार, प्रिती डहाळे, राधिका खारे, मंजुषा रापतवार तर शिपाई संवर्गातून श्रीमती संगीता खोले व छबुताई सानप यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी महिलांची एचबी रक्तामधील साखरेचे प्रमाण व बी.पी. ची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी व उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले . तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती ज्याेती बाऱ्हाळीकर यांनी केले.
तत्पुर्वी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त ध्वजारोहणही करण्यात आले. तसेच मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले.  
****   

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...