Wednesday, July 21, 2021

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.2 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात बुधवार 21 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 29.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 268.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात बुधवार 21 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 27.8 (297.3), बिलोली- 25.8 (317.8), मुखेड- 30.2 (261.0), कंधार- 29.5 (255.5), लोहा- 25.9 (278.3), हदगाव-28.2 (223.8), भोकर- 51.7 (267.5), देगलूर- 39.0 (250.0), किनवट- 28.8 (274.2), मुदखेड- 29.5 (323.2), हिमायतनगर-30.0 (190.6), माहूर- 18.7 (211.8), धर्माबाद- 17.3 (280.3), उमरी- 19.4 (322.6), अर्धापूर- 36.4 (327.8), नायगाव- 25.6 (269.8) मिलीमीटर आहे.

0000

 

 

नांदेड जिल्ह्यात 14 व्यक्ती कोरोना बाधित, 18 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 672 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 13 तर अँटिजन तपासणीद्वारे 1 असे एकुण 14 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 141 एवढी झाली असून यातील 87 हजार 422 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 60 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड तालुक्यात 5, कंधार 1 तर अँटिजन तपासणीद्वारे हदगाव 1 असे एकूण 14 बाधित आढळले.   

आज जिल्ह्यातील 18 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 16 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 60 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 12, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 37, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 140 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 43 हजार 873

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 41 हजार 809

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 141

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 422

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-17

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-51

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-60

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

जिल्ह्यातील 85 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 85 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 22 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

तर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली या 10 केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाणा शिवाजीनगर, तरोडा या 4 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 11 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, बारड, उमरी या 12 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार, मुदखेड, नायगाव येथे कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 44 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर 7 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 20 जुलै पर्यंत एकुण 7 लाख 54 हजार 983 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 21 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 98 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 77 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

0000

 

 

मोकाट जनावरांबाबत दंडात्मक कारवाई करू - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सर्व पाळीव प्राण्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. पाळीव जनावरे बाहेर रस्त्यांवर मोकळी सोडल्यास अशा पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. 

प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी 'जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची' त्रैमासिक बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. मधुसुदन रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. एस. बी. खुणे, डॉ. प्रविणकुमार घुले, पशुधन विकास अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, परिवहन कार्यालयाचे भोसले, अशासकीय सदस्य अतिंद्र कट्टी, सत्यवान गरुडकर यांच्यासह शासकीय, अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती. 

मनपा क्षेत्रात जनावरांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होणार नाही याबाबतची खबरदारी पशुपालकांनी घेतली पाहिजे. प्राणी क्लेश समितीने यासंदर्भात लक्ष देऊन अशी घटना घडत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले. वाहनांमध्ये मुक्या प्राणीमात्रांची दाटीवाटीने वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनला नागरिकांनी माहिती द्यावी. याबाबत वाहनधारकांवर तसेच पशूपालकावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिल्या.

00000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...