Friday, August 10, 2018


कापूस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी संदेश देण्यात येत आहे.
प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 टक्के ए एफ 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे. सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी कामगंध सापळे लावा आणि निरीक्षण करा. तसेच प्रोफेनोफॉस 50 ईसी 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.  
000000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात शनिवार 25 ऑगस्ट 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 25 ऑगस्ट 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुक 2018
गुरुव्‍दारा सचखंड हजूर साहिब नांदेड येथे नांदेड तालुक्‍यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयाच्‍या ठिकाणी मतदार नोंदणी कक्ष स्‍थापन
नांदेड दि. 10 :- गुरुव्‍दारा सचखंड हजूर साहिब नांदेड येथे व नांदेड तालुक्‍यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयाच्‍या ठिकाणी मतदार नोंदणी कक्ष स्‍थापन करण्यात आले आहे. नांदेड तालुक्‍यातील शिख धर्मीय मतदारांना मतदार यादीत अधिकाधिक नाव नोंदविता येईल यादृष्‍टीने, नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब येथे अतिरीक्‍त मतदार नोंदणी कक्ष कार्यान्‍वीत करुन त्‍याठिकाणी मतदारांना फॉर्म नं.1 उपलब्‍ध करुन देणे, मतदार नोंदणी फॉर्म स्विकारण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. 
महसल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे राजपत्र दि. 27 जुन 2018 नुसार नांदेड शीख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर निवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम व पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍यासाठी  सोमवार 20 जुलै 2018 पासून मतदार नोंदणी कार्यक्रमाची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी सुरु झाली आहे.   
नांदेड तालुक्‍यातील सर्व  मंडळ अधिकारी यांचे कार्यालयात अतिरीक्‍त मतदार नोंदणी कक्ष  कार्यान्‍वीत करुन त्‍याठिकाणीसुध्‍दा मतदारांना फॉर्म नं.1 उपलब्‍ध करुन देणे, मतदार नोंदणी फॉर्म स्विकारण्‍याची व्‍यवस्‍था रण्‍यात आली आहे.  सर्व शिख धर्मीय मतदारांना याद्वारे जाहिर आवाहन करण्‍यात येते की, दि. 18 ऑगस्‍ट 2018 ही मतदार नोंदणीची अंतिम तारीख असून, उपरोक्‍त ठिकाणाहून  मतदार नोंदणीचे फॉर्म प्राप्‍त करुन घेऊन, सदरचे फॉर्म अचुक भरणा करुन मतदार नोंदणी कक्षात दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000



मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक
निमित्त मतदानाच्या दिवशी आज स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 10 :- मुदखेड कृषि बाजार क्षेत्रातील शेतकरी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मुदखेड कृषि उत्पन्न बाजार क्षेत्रातील सर्व सरकारी, खाजगी शाळांना शनिवार 11 ऑगस्ट 2018 रोजी स्थानिक सुट्टी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जाहिर केली आहे.
मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान 11 ऑगस्ट रोजी दुसऱ्या शनिवारी होणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शासकीय कार्यालयांना सुट्टी असली तरी खाजगी कार्यालये, संस्था व शाळा या आस्थापना त्यादिवशी चालू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.
0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...