Tuesday, August 1, 2023

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 9.80 मि.मी. पाऊस

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  9.80  मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 1 :- जिल्ह्यात मंगळवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी  9.80  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 576.90  मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात मंगळवार 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 7 (523.40), बिलोली-27 (718.20), मुखेड- 11.40 (553.70), कंधार-17.70 (299.30), लोहा-15.90 (423.70), हदगाव-6.70 (511.40), भोकर-6.60 (637.10), देगलूर-12(566.70), किनवट-2.80(772.60), मुदखेड- 2.60 (596.70), हिमायतनगर-1.70 (487.30), माहूर- 5.80 (784.50), धर्माबाद- 1.50 (664.90), उमरी- (638.40), अर्धापूर- 8.10 (662.80) नायगाव-15.10 (523.60) मिलीमीटर आहे.

0000

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 464

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती / संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन, एमआयडीसी परिसर शिवाजीनगर, नांदेड या कार्यालयाशी भ्रमणध्वनी क्रमांक 8390290213 किंवा दुरध्वनी क्रमांकावर 02462-240674 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

योजनेची वैशिष्टे- मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी/ विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे आहे.

या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रतेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य. वय 18 वर्षापेक्षा जास्त व 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्र चालक प्रगतशील मधपाळ व्यक्ती पात्रतेसाठी किमान 10 वी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे एक एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था पात्रतेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. एक एकर शेत जमीन स्वमालकीची / भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्तीमध्ये लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

 

पिक विमा भरण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 वृत्त क्र. 463

पिक विमा भरण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 31 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यत मुदत होती. परंतु शेतकऱ्यांना पिक विमा भरताना पोर्टलवर येत असलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने 3 ऑगस्ट 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही त्यांनी 3 ऑगस्टपर्यत पिक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

0000

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

 वृत्त क्र. 463

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी

शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती साठी माहे ऑगस्ट ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीत तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 2 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, 3 ऑक्टोंबर या दिवशी आहे. धर्माबाद येथे 4 ऑगस्ट, 6 सप्टेंबर, 5 ऑक्टोंबर या दिवशी आहे. किनवट येथे 8 ऑगस्ट, 8 सप्टेंबर, 10 ऑक्टोंबर यादिवशी आहे. मुदखेड येथे 10 ऑगस्ट,  12 सप्टेंबर, 12 ऑक्टोंबर यादिवशी आहे. माहूर येथे 17 ऑगस्ट, 14 सप्टेंबर, 17 ऑक्टोंबर या दिवशी आयोजन करण्यात येणार आहे. हदगांव येथे 22 ऑगस्ट, 20 सप्टेंबर, 19 ऑक्टोंबर यादिवशी आहे. धर्माबाद येथे 24 ऑगस्ट, 25 सप्टेंबर, 25 ऑक्टोंबर या दिवशी आहे. हिमायतनगर येथे 28 ऑगस्ट, 27 सप्टेंबर, 27 ऑक्टोंबर यादिवशी आहे. किनवट येथे 30 ऑगस्ट, 29 सप्टेंबर, 30 ऑक्टोंबर या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती साठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...