Tuesday, March 22, 2022

सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या

होट्टल महोत्सवाचे 9 ते 11 एप्रिल कालावधीत आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन 9 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक बैठक संपन्न झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व यंत्रणाना सकारात्मक सहभाग घेवून हा महोत्सव अधिक चांगला होण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या निर्देशानुसार बैठकीत विविध नियोजनाचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, देगलूरचे उपविभागीय दंडाधिकारी शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महोत्सवाच्या पुर्व तयारीबाबत आढावा घेवून विविध समित्या स्थापन करण्यात येत आहेत. या महोत्सवाला अधिकाधिक पर्यटक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती-रसिक मोठया संख्येने सहभागी होतील असा विश्वास डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.  

या तीन दिवशीय महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारासह राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांनाही ऐकण्याची संधी मिळणार आहे. होट्टल येथील पर्यटनाला चालना मिळावी यादृष्टीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन राज्याच्या पर्यटन विभागामार्फत केले जात आहे.

0000 

 

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 540 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 795 एवढी झाली असून यातील 1 लाख 96 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 7 रुग्ण उपचार घेत आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकुण 7  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 91 हजार 715

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 71  हजार 803

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 795

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 96

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत

प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी गावपातळीवर विशेष कॅम्पचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीचे काम 25 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी गाव पातळीवर कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे लाभ थांबलेले आहेत अशा अर्जदारांनी  या कॅम्पमध्ये सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन डाटा दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

सदर डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करुन पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांचे परिपत्रक दि. 4.2.2019 नुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कुटूंबनिहाय प्रति वर्ष रुपये सहा हजार इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत विविध प्रकारची डाटा दुरुस्ती असून त्याचा तालुकानिहाय तपशील याप्रमाणे आहे. मुखेड-2 हजार 537, देगलूर- 2 हजार 87, किनवट-2 हजार 56, लोहा-2 हजार 56, लोहा- 2 हजार 26, नायगाव- 1 हजार 910, भोकर-1 हजार 782, कंधार- 1 हजार 688, उमरी- 1 हजार 584, हिमायतनगर -1 हजार 443, नांदेड-1 हजार 437, हदगाव- 1 हजार 253, बिलोली-1 हजार 223, मुदखेड-1 हजार 34, माहूर-985, अर्धापूर-873, धर्माबाद-846 असे एकूण जिल्ह्यात तालुकानिहाय 24 हजार 764 डाटा दुरुस्ती आहेत. तरी या कॅम्पमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांनी आपल्या प्रलंबित अर्जाचा डाटा दुरुस्तीचे काम करुन सुरळीत लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.

0000

 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...