Tuesday, May 18, 2021

 

       डोसच्या उपलब्धतेनुसार कमी-अधिक प्रमाणात

   जिल्ह्यातील सर्व केंद्रांना लसीचे वाटप  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दिनांक 19 मे रोजी पुढीलप्रमाणे केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, जंगमवाडी, कौठा, सिडको या 7 केंद्रावर कोविशिल्डचे शंभर डोस प्रत्येकी देण्यात आले. शहरी दवाखाना जंगमवाडी या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस व श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालयात कोव्हॅक्सिनचे 70 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, उमरी, नायगाव येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय लोहा, मुदखेड, बारड येथे कोविशिल्डचे 90 डोस, उपजिल्हा रुग्णालय देगलूर कोव्हॅक्सिनचे 20 डोस, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे कोव्हॅक्सिनेच 30 डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे कोव्हॅक्सिनचे 80 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सिनचे 80 डोस, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (एकुण 67) येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस याप्रमाणात लसीची उपलब्धता करुन दिली आहे.

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.  

0000

 

 

574 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 163 व्यक्ती कोरोना बाधित

8 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 169 अहवालापैकी 163 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 110 तर अँटिजेन तपासणीद्वारे 53 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 266 एवढी झाली असून यातील 82 हजार 492 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 560 रुग्ण उपचार घेत असून 111 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 17 व 18 मे 2021 या दोन दिवसांच्या कालावधीत 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 824 एवढी झाली आहे. दिनांक 17 मे 2021 रोजी तिरुमला कोविड रुग्णालयात जैन मंदिर नांदेड येथील 61 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे देगलूर तालुक्यातील जारी येथील 67 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील मारतळा येथील 53 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 58 वर्षाची महिला तर 18 मे रोजी मुखेड कोविड रुग्णालयात मुखेड तालुक्यातील बेळी येथील 45 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे आनंदनगर येथील 42 वर्षाची महिला, हर्षनगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, गांधीनगर बिलोली येथील 81 वर्षाच्या पुरुषाचा यात समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 41, देगलूर 3, कंधार 3, मुखेड 7, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 3, धर्माबाद 10, किनवट 1, नायगाव 7, यवतमाळ 5, भोकर 4, हदगाव 4, लोहा 2, वाशिम 1, बिलोली 8, हिमायतनगर 2, मुदखेड 5, परभणी 2 बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 9, देगलूर 3, कंधार 2, मुखेड 6, अर्धापूर 1, धर्माबाद 2, किनवट 4, नायगाव 5, भोकर 1, हदगाव 2, माहूर 10, परभणी 1, बिलोली 3, हिमायतनगर 1, मुखेड 3 असे एकूण 163 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 574 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 14, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 301, मुखेड कोविड रुग्णालय 15, धर्माबाद तालुक्यातंर्गत 6, अर्धापूर तालुक्यातंर्गत 5,कंधार तालुक्यांतर्गत 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, बारड कोविड केअर सेंटर 9, मुदखेड कोविड केअर सेंटर 12, माहूर तालुक्यांतर्गत 2, बिलोली तालुक्यांतर्गत 35, उमरी तालुक्यांतर्गत 3, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 6, देगलूर कोविड रुग्णालय 3, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 19, हदगाव 10, लोहा तालुक्यांतर्गत 12, खाजगी रुग्णालय 106 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 2 हजार 560 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 83, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 54, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 56, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 10, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 37, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 24, देगलूर कोविड रुग्णालय 6, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 25, बिलोली कोविड केअर सेंटर 48, नायगाव कोविड केअर सेंटर 11, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 13, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर 26, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 9, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 8, एनआरआय कोविड केअर सेंटर 3, बारड कोविड केअर सेंटर 11, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 3, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 420, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 185, खाजगी रुग्णालय 464 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 72, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 73, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 89, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 1 हजार 926

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 4 हजार 321

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 266

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 82 हजार 492

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 824

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-236

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 560

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-111.

00000

 

पाणी टंचाईपासून मुक्त होण्यासाठी

विहिरींचे पूनर्भरण करण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- भविष्यातील पाणी टंचाईपासून मुक्त होण्यासाठी पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या विहिरींचे / विंधन विहिरींचे भूजल पूनर्भरण करावे, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी केले. 

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेनुसार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षे 2021 निमित्त जिल्ह्यातील सरकारी व खाजगी एकुण 4 हजार विहिरींच्या भूजल पूनर्भरणाचा शुभारंभ जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कार्यालय परिसरातील विंधन विहिरीचे पाऊस पाणी भूजल पूनर्भरण करण्यात आले. हे भूजल पूनर्भरण वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

00000



 

ग्रामीण डाक सेवक पदासाठी

अर्ज करण्याची मुदत 26 मे पर्यंत

नांदेड (जिमाका) दि. 18 :- भारतीय डाक विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची मुदत बुधवार 26 मे 2021 पर्यंत आहे. पात्र उमेदवारांनी https://indiapost.gov.in  किंवा http://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर अर्ज भरावेत. उमेदवारांना अर्ज करतांना काही तांत्रिक अडचण आल्यास gdsrectt@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड विभागाचे डाकघर अधिक्षक यांनी केले.

00000

 

निधन झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात कोविड व इतर आजाराने 10 माजी सैनिकांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून 10 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. माजी सैनिकाच्या पत्नीस  कुटुंब  निवृत्ती वेतन व आर्मीग्रुपचा विमा मिळण्यासाठीचे काम तात्काळ करण्यात येत आहे.  कोविड-19 संसर्गामुळे माजी सैनिकांना कार्यालयात येणे शक्य होत नाही. यामुळे तातडीचे काही काम व अडचणी आल्यास कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे यांचा मो. 9403069447 यावर संपर्क साधावा, असे  आवाहन नांदेडचे  सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी  केले आहे. 

मदत वाटप करण्यात आलेल्या कुटुंबियात श्रीमती विमल कावळे, पत्नी स्व. उत्तम गणपतराव कावळे. श्रीमती कल्पना चौदंते स्व कमलाकर चौंदते. पुंडलिक भुसावळे मुलगा स्व श्रीमती रुकमाबाई जगदेवराव भुसावळे. श्रीमती सुशिला राठोड स्व पत्नी भगवान राठोड. श्रीमती  कमल अरविंद पांडे, पत्नी स्व. अरविंद पांडे.श्रीमती  पुष्पा पत्नी स्व रमेश कौठेकर. श्रीमती  इंदू  पत्नी स्व गणेश कदम. श्रीमती प्रीती दगडे पत्नी स्व शंकर लक्ष्मन दगडे. दिपक भक्ते पाल्य श्रीमती जनाबाई सोनबा भक्ते. श्रीमती भारतीबाई पत्नी स्व. बाबुराव पवार यांचा समावेश आहे.

00000

 

पंडीत दीनदयाल उपाध्याय

रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  कोरोनाच्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 17 ते 21 मे 2021 या कालावधीत 5 दिवसाचे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड आणि इप्मॉवर प्रगती वोकेशनल ॲन्ड स्टाफिंग प्रा.ली. (पीएमकेके) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. 

नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधवा. 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 1 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव,  शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल, असेही आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...