Wednesday, June 9, 2021

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 10 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 150 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले असून हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 8 जून पर्यंत एकुण 4 लाख 49 हजार 871 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 9 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 40 हजार डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 67 हजार 330 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

 

नांदेड जिल्ह्यात 138 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू तर 146 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 611 अहवालापैकी  138 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 65 तर अँटिजेन तपासणीद्वारे 73 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 699 एवढी झाली असून यातील 87 हजार 636 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 639 रुग्ण उपचार घेत असून 14 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आजच्या अहवालानुसार 8 जून 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पौर्णिमानगर येथील 45 वर्षाचा पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 894 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 27, कंधार 1, नायगाव 1, परभणी 2, नांदेड ग्रामणीण 16, किनवट 3, माहूर 1, यवतमाळ 1, अर्धापूर 1, लोहा 3, मुदखेड 1, हिंगोली 1, हदगाव 2, मुखेड 4, उमरी 1,  तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 36, हदगाव 3, मुखेड 2, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 14, हिमायतनगर 1, उमरी 2, वाशिम 2, वाशिम 1, अर्धापूर 1, कंधार 1, परभणी 2, देगलूर 3, लोहा 3, हिंगोली 2, असे एकूण 138 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 146 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 2,  मुखेड कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यातर्गंत 1, भोकर तालुक्यातर्गंत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, माहूर तालुक्यातर्गत 4, हिमायतनगर तालुक्यातर्गत 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 107, किनवट कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यातंर्गत 1, खाजगी रुग्णालय 18 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 639 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 37, लोहा कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय 19, देगलूर कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 367, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 135, खाजगी रुग्णालय 40 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 109, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 120 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 66 हजार 164

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 63 हजार 944

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 699

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 261

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 894

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-40

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-263

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 639

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14

00000

 

 

हमीभावाने चणा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 9 :- किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये हमीभावाने चणा खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, कंधार, लोहा, किनवट (गणेशपूर) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणीस 18 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.    

मार्च-2021 मध्ये कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कडक निर्बंधामुळे काही शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. ज्या शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे नोंदणी करता आली नाही व त्यामूळे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी व हमीभावाचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी  18 जून र्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

000000

 

नांदेड जिल्हा संक्षिप्त माहिती व जलचक्र विषयावर वेबिनार संपन्न  

नांदेड (जिमाका) दि. 9 :- भू.स.वि.यं.सुवर्ण महोत्सवी वर्ष 2021 निमित्त भूजल विषयक तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती व जनजागृती होण्यासाठी भूजलाशी निगडीत विविध विषयावर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ  भूवैज्ञानिक आर.व्ही पवार यांनी नांदेड जिल्हा संक्षिप्त माहिती व जलचक्र या विषयावर वेबिनारद्वारे नुकतेच सादरीकरण केले. 

यावेळी विद्यापिठातील भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र व भूगोल विभागातील  कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी व इतर महाविद्यालयातील जवळपास 75 विद्यार्थ्यांनी या वेबिनारचा लाभ घेतला, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी दिली.  

0000

 

रत्नेश्वरी शिवारात साकारणार ऑक्सिजन वन   

कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींच्या हस्ते वृक्ष लागवड 


नांदेड (जिमाका) दि. 9 :- वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत लोकसहभागातून नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी उपक्रम हाती घेतले आहेत. यात लोहा तालुक्यातील रत्नेश्वरी शिवारात रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाच्या संयुक्त विद्यामातून अभिनव ऑक्सिजन वन उपक्रमातील वृक्षारोपणाचा शुभारंभ दि. 10 जून रोजी सकाळी 11 वा. संपन्न होत आहे.

 

या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिताताई देवरे, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंद शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, पंचायत समिती सदस्या सुकेशिनी कांबळे, वडेपुरीचे सरपंच गोपाळराव सावळे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे.

 

लोकसहभागातून वृक्षारोपणाला चालना मिळावी यावर जिल्हा प्रशासनाने विविध विभागाच्या समन्वयातून विशेष भर दिला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 1 कोटी 26 लाख 82 हजार 824 एवढी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निर्धारित केले आहे. यापैकी 53 लाख 49 हजार झाडे उपलब्ध आहेत. उर्वरित झाडे सामाजिक वनीकरण, वन विभाग, कृषि, मनपा, रेशीम विभाग यांच्यामार्फत उपलब्ध केली जात आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर शुद्ध प्राण वायुच्या उपलब्धतेसाठी समाजातील सर्व घटकात अधिकाधिक जनजागृती व्हावी व त्यांचा वृक्ष लागवडीतून कृतीशील लोकसहभाग घेता यावा यासाठी जिल्हा परिषद, वन विभाग, कृषि विभाग, शालेय शिक्षण विभाग या सर्वांच्या माध्यमातून नियोजन केले आहे.

 

जिल्ह्यात आजच्या घडिला एकुण 87 हजार 636 कोरोना बाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यातील बहुसंख्य बाधित या वृक्ष लागवडीतील लोकसहभागासाठी पुढे सरसावले आहेत. यादृष्टिने नांदेड जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिम अभिनव ठरावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विविध विभाग प्रमुखांना सूचना देऊन त्यांचाही सहभाग यात घेतला आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...