Tuesday, March 12, 2024

 वृत्त क्र. 234

जिल्हा रेशीम कार्यालयास जागा भाडे तत्वावर देण्यासाठी

इमारत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 12 :- महाराष्ट्र शासनाच्या रेशीम कार्यालय नांदेडसाठी 1500 चौ.फुटपाच रुम असलेली बांधकाम पूर्ण झालेली जागा व शासकीय वाहनासाठी पुरेशी जागा भौतीक सुविधासह भाडेतत्वावर घ्यायची आहे. तरी इमारत भाडेतत्वावर देणाऱ्या जागा मालकांनी शासकीय अटी व नियमांचे पालन करुन खालील पत्त्यावर संपर्क साधावाअसे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

इच्छूकांना संपर्कासाठी रेशीम विकास अधिकारीजिल्हा रेशीम कार्यालयकृषी उत्पन्न बाजार समिती जवळनवीन मोंढानांदेडमो. क्रमांक 94215516359309531569 वर संपर्क साधावाअसे रेशीम विकास कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

  वृत्त क्र. 233

डाक विमाधारक वारसाच्या पत्नीला

12 लाख 14 हजार रुपयाचा धनादेश वितरीत

 

नांदेड दि. 12 :- डाक विमा ही सरकारी विमा योजना असून सर्व सामान्यांना कमी हफ्त्यात अधिक बोनस देणारी कल्याणकारी विमा योजना आहे. सर्व सामान्यांना त्यांच्या कुटूंबाच्या सुरक्षिततेच्या हमीसाठी डाक जीवन विमा घेण्याचे आवाहन अधीक्षक राजीव पालेकर यांनी केले.

 

नांदेड येथील मयत रोहीत राजेश्वर बच्चेवार विक्रीकर निरीक्षक नांदेड यांनी भारतीय डाक विभागाची दहा लाख रुपयाची डाक जीवन विमा संतोष पॉलीसी तीन वर्षांपूर्वी घेतली होती. जानेवारी 2024 मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी डाक जीवन विमा पॉलीसी घेतल्यामुळे त्यांना डाक विभागाचे अधीक्षक राजीव पालेकर  यांच्या हस्ते 12 लाख 14 हजार रुपयाचा धनादेश वारसाची पत्नी श्रीमती रागिणी कमठाणे यांना 11 मार्च 2024 रोजी सुपूर्द करण्यात आला.

 0000  

गुरुवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 वृत्त क्र. 232

गुरुवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 12 :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्राच्यावतीने गुरुवार 14 मार्च 2024 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्याकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घ्यावा. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

0000

मंगल कार्यालयाच्या मालकांनी लग्नकार्य व शुभ प्रसंगामध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी : जिल्हाधिकारी

 वृत्त क्र. 231

 

मंगल कार्यालयाच्या मालकांनी लग्नकार्य व शुभ प्रसंगामध्ये

मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी : जिल्हाधिकारी

 

नांदेड दि. 12 :- भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठीलोकशाही मार्गाने देशाचा विकास घडविण्यासाठी सुलभ व सर्वमान्य मतदान प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपल्या मताधिकाराचा योग्य वापर करावायासाठी जनजागृती अभियान म्हणून मंगल प्रसंगी मताधिकार बजावण्याची शपथघेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील युवा मतदारमहिला मतदारवंचित घटक तसेच सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयेफंक्शन हॉलबँक्वेट हॉल मालकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान करण्याच्या या जनजागृती मोहिमेत सक्रीय सहभागासाठी आपल्या कार्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या लग्न कार्यशुभ कार्यामध्ये व विविध प्रसंगामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी मतदान करण्याबाबतची शपथ घेण्यात यावी. तशी सूचना सर्व कार्यक्रमापूर्वी संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांना द्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

मतदारांसाठी प्रतिज्ञा याप्रमाणे आहे.

 

आम्ही भारताचे नागरिकलोकशाहीवर निष्ठा ठेवूनयाद्वारे प्रतिज्ञा करतो कीआपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्मवंशजातसमाजभाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु. ही शपथ घेताना नागरिकांचे सामुहिक छायाचित्र काढून दर दिवसातून एकदा सर्व छायाचित्रे जिल्हास्तरीय स्वीप कक्षास सादर करावेतअसेही आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...