Tuesday, March 12, 2024

 वृत्त क्र. 234

जिल्हा रेशीम कार्यालयास जागा भाडे तत्वावर देण्यासाठी

इमारत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 12 :- महाराष्ट्र शासनाच्या रेशीम कार्यालय नांदेडसाठी 1500 चौ.फुट, पाच रुम असलेली बांधकाम पूर्ण झालेली जागा व शासकीय वाहनासाठी पुरेशी जागा भौतीक सुविधासह भाडेतत्वावर घ्यायची आहे. तरी इमारत भाडेतत्वावर देणाऱ्या जागा मालकांनी शासकीय अटी व नियमांचे पालन करुन खालील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

इच्छूकांना संपर्कासाठी रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, नवीन मोंढा, नांदेड, मो. क्रमांक 9421551635, 9309531569 वर संपर्क साधावा, असे रेशीम विकास कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...