Wednesday, April 18, 2018


केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचा सुधारित

   नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

        नांदेड, दि. 18:-  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी, नदी गंगा पुरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांचा        दि. 19 एप्रिल 2018 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार, दिनांक 19 एप्रिल, 2018 रोजी 10-55 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. 11-25 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघजी नांदेड विमानतळ येथून निघून हेलिकॉप्टरने लोहा ता. जि. नांदेडकडे प्रयाण.              11-35 वाजता खरेदी विक्री संघ मैदान, लोहा ता. जि. नांदेड येथे नॅशनल हायवे प्रोजेक्टच्या भुमिभूजन सोहळ्यास उपस्थिती. 12-45 वाजता लोहा ता. जि. नांदेड येथून 1-30 वाजता हेलिकॉप्टरने परभणी हेलिपॅडकडे प्रयाण.

****  

 

राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा

नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

नांदेड, दि. 18:-  राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा दि. 19 एप्रिल 2018 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.  

गुरुवार, दिनांक 19 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 9-55 वाजता छ.शि.म.आं.विमानतळ सांताक्रूझ येथे आगमन व 10-00 वाजता विमानाने नांदेडकडे प्रयाण. 11-00 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन. 11-05 वाजता हेलिकॉप्टरने लोहा जि. नांदेडकडे प्रयाण. 11-15 वाजता लोहा हेलिपॅड येथे आगमन. 11-20 वाजता मोटारीने खरेदी विक्री संघ मैदान, लोहा जि. नांदेडकडे प्रयाण. 11-25 वाजता राष्ट्रीय महामार्ग भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12-35 वाजता कार्यक्रम स्थळ येथून मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. 12-40 वाजता लोहा हेलिपॅड येथे आगमन . 12-45 वाजता हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण.

****

कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री

संभाजी पाटील-निलंगेकर यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम  

 

नांदेड, दि. 18:-   राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दि. 19 एप्रिल 2018 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार, दिनांक 19 एप्रिल, 2018 रोजी 11-50 वाजता शासकीय विश्रामगृह , नांदेड येथून वाहनाने विमानतळावर आगमन . दुपारी 12-35 वाजता लोहा ता. जि. नांदेड येथे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. 1-35 वाजता लोहा ता. जि. नांदेड येथून हेलिकॉप्टरने परभणी जि. परभणीकडे प्रयाण.

****  

विधान परिषदेचे उपसभापती श्री. माणिकराव ठाकरे यांचा

नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

नांदेड, दि. 17:- विधान परिषदेचे उपसभापती श्री. माणिकराव ठाकरे यांचा दि. 19 एप्रिल 2018 रोजी नांदेड जिल्हा  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार, दिनांक 19 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 8-40 वाजता नांदेड येथे आगमन मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. 9-00 वाजता शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन राखीव. 10-00 वाजता शासकीय विश्रामगृह , नांदेड येथून शासकीय मोटारीने भक्ती लॉन, मालेगाव रोडकडे प्रयाण. 11-00 ते 1-00 वाजता भक्ती लॉन , मालेगाव रोड, नांदेड येथे आगमन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या मराठवाडा विभागीय शिबीरासाठी राखीव (पहिले सत्र) . दुपारी 1-00 ते 2-00 वाजेपर्यंन्त राखीव. 2-00 ते 4-30 वाजता भक्ती लॉन, आयोध्दा नगरी, नांदेड येथे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीने केलेल्या मराठवाडा विभागीय शिबीरासाठी राखीव (दुसरे सत्र). सांयकाळी 6-00 ते 10-00 वाजता नवा मोंढा मैदान, नांदेड येथील जाहीर सभेसाठी राखीव. रात्री 10-15 वाजता कार्यक्रम स्थळाकडून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री शासकीय विश्रामगृह येथे आगमन मुक्काम राहील.

****

पीक कर्जमाफीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याना 

अर्ज  करण्यासाठी दि. 1 मे, 2018  मुदतवाढ

अर्ज सादर करण्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांचे आवाहन

            नांदेड, दि.17:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्वतीने अर्ज करण्याची सुविधा आता दि. 1 मे, 2018  पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन वस्त्रोद्योग विभागाचे दि. 16 एप्रिल, 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला असून या आदेशाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी दि. 1 मे, 2018  पर्यंत आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.

तसेच कांही शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा कांही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज करु शकल्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांना लाभ देण्यात येईल, अशी घोषणा मा. मुख्यमंत्री महोदय यांनी केली होती, त्यानुसार आता दिनांक 1 मे, 2018  पर्यंत  आपले सरकार  पोर्टलवर किंवा शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल ओटीपीद्वारा केल्यानंतरच संबंधित अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत.

आपले सरकार पोर्टलवर माहीती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. तरी कर्जमाफी योजनेअंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी दिनांक 1 मे, 2018   पर्यंत आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. पासवर्डच्या अधारे ऑनलाईन अर्ज भरुन  योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन नांदेड जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेचे प्रवीण फडणीस यांनी केले आहे.  

****

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...