पीक कर्जमाफीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याना
अर्ज करण्यासाठी दि. 1 मे, 2018 मुदतवाढ
अर्ज सादर करण्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांचे आवाहन
नांदेड, दि.17:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्वतीने अर्ज करण्याची सुविधा आता दि. 1 मे, 2018 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे दि. 16 एप्रिल, 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला असून या आदेशाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी दि. 1 मे, 2018 पर्यंत “ आपले सरकार ” या सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
तसेच कांही शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा कांही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज करु न शकल्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांना लाभ देण्यात येईल, अशी घोषणा मा. मुख्यमंत्री महोदय यांनी केली होती, त्यानुसार आता दिनांक 1 मे, 2018 पर्यंत “ आपले सरकार ” पोर्टलवर किंवा शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल ओटीपीद्वारा केल्यानंतरच संबंधित अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत.
आपले सरकार पोर्टलवर माहीती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. तरी कर्जमाफी योजनेअंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी दिनांक 1 मे, 2018 पर्यंत “ आपले सरकार ” सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या अधारे ऑनलाईन अर्ज भरुन योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन नांदेड जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेचे प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment