Wednesday, January 29, 2020


पोस्टर एक्जीबीशन शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संपन्न
नांदेड, दि. 29 :- येथील शासकीय तंत्रनिकेत येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एन्हॉरन्मेंट पब्लिक अवेरनेस बदल पोस्टर एक्जीबीशन विद्युत विभागातर्फे घेण्यात आले. त्याचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपप्राचार्य डॉ. पी. डी. पोपळे, विभाग प्रमुख डी. एम. लोकमनवार, व्ही. व्ही. सर्वज्ञ, एस. एम. कंधारे, डॉ. एस. टी. कांबळे, एस. एम. ढोले, एस. जी. कदम यांच्यासह संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सध्याच्या युगामध्ये वातावरणातील होणारे बदल आणि निर्माण होणारे प्रदूषण यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. यावर काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्टरमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. या एक्जिबिशनसाठी विद्युत विभागाचे प्राध्यापक एस. जी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्युत विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
0000


केळी पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 29 :-  उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापुर या तालुक्यात केळी पिकासाठी किड रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे.
केळीचा प्लॉट स्वच्छ तणविरहीत ठेवावा. पाण्याचा निचरा व्यवस्थीत करुन पाणी साचणार नाही यांची काळजी घ्यावी. केळीच्या पानावरील ठिपके आढळल्यास तो भाग काढुन टाकून बागेच्या बाहेर  नेऊन नष्ट करावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...