Monday, December 9, 2019


ग्रंथालयांना समान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 9 :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतनीकरण या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळावरून उपलब्ध (download) करून या योजनेअंतर्गत अर्ज करावा असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकादवारे केले आहे.
सन 2019-20 साठी 5 वेगवेगळया असमान निधी योजना आहेत. 1.ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसाम्रगी, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय, 2.राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय, 3.राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, 4.प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय, 5.बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहायय अशा पाच प्रमुख असमान निधी योजना आहेत.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in हे संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव (विहित नमुद पद्धतीत)आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक असल्याचे ग्रंथालय संचालक यांनी कळविले आहे.
00000



मानवी हक्क दिनानिमित्त मंगळवारी
विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश
नांदेड दि. 9 :- जिल्ह्यात मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत.  
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, निरीक्षकगृह आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे. या कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये, शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.
00000


अल्पसंख्यांक हक्क दिन 18 डिसेंबरला
नांदेड, दि. 9 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून बुधवार 18 डिसेंबर 2019 हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणवी, माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, या कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद आदींचा समावेश असावा, असे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले.
00000


पोलिस उपनिरीक्षक पदास पात्र
उमेदवाराचे अभिरुप मुलाखती संपन्न
         
नांदेड दि. 9 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती नांदेड महापालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यावतीने उज्ज्वल नांदेड मोहिमेतर्गंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरक्षक पदास पात्र ठरलेल्या नांदेड जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी अभिरुप (mock) मुलाखती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे नुकतेच घेण्यात आल्या.
या मुलाखतीस  प्रा. मनोहर भोळे, बालाजी चंदेल (पी.आय मुख्य गुप्त वार्ताहर) जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक हे उपस्थित होते. अभिरुप मुलाखतीस 18 विद्यार्थ्यांने सहभाग घेतला दिवसभर चाललेल्या या मुलाखती प्रा. मनोहर भोळे यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीला सामोर कसे जावे. मुलाखतीचे तंत्र विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचे उत्तरे कशी दयावयाची याबाबत सखोल मार्गदर्शन केले. मुलाखती नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना अभिरुप मुलाखतीत त्यांनी केलेल्या चुका त्यामध्ये दुरुस्ती कशी करावयाची याबाबत मार्गदर्शन केले. या मुलाखतीस हिंगोली, परभणी येथील काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

000000


जिल्हाधिकारी कार्यालयात
          मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 9 :-जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   
जिल्ह्या महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.    
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...