जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेडच्या वतीने येथे NDRF पुणे कमांडर राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने आज दि.10 ऑक्टोंबर 2025 रोजी रोजी दु.01 वाजता. संगम ता. धर्माबाद (संगमेश्वर देवस्थान) या नदीकाठावरील गावामध्ये हे प्रशिक्षण प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरीता आयोजीत केले होते यामध्ये पुर, भुकंप, आग इ. आपत्तीपासुन बचाव कसा करावा याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित तहसीलदार सुरेखा स्वामी मॅडम, गटविकास अधिकारी, सहा.पोलिस निरीक्षक कुंडलवाडी, उपविभागीय कार्यालय धर्माबादचे नायब तहसिलदार, तसेच तालुक्यातील विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व नागरीकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
Friday, October 10, 2025
वृत्त क्रमांक 1082
आठवा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम तरोडा खुर्द येथे साजरा
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर कार्यालयाअंतर्गत तरोडा (खु.) बिट मधील शास्त्रीनगर येथील अंगणवाडी केंद्रावर 9 ऑक्टोबर रोजी 8 वा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी अंगणवाडीतील सर्व सेवांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या कामकाजाचे प्रशंसा त्यांनी केली.
नागरी नांदेड शहरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी के. व्ही. तिडके यांनी सन 2025 पोषण माह थीम जेवणामध्ये साखर व तेलाचे प्रमाण, प्रारंभिक बाल्यवस्था काळजी व संगोपन, कुपोषण निर्मुलनाबाबत उपाययोजना इत्यादी बाबत जनजागृती केली आहे.
या कार्यक्रमांतर्गत बिट मधील कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी ICDS च्या सर्व योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना इत्यादी बाबत श्रीमती दुर्गा सांगोळे यांनी गरोदर मातेची भुमिका साकारली व श्रीमती नंदा जोंधळे यांनी अंगणवाडी सेविकेची भुमिका साकारून नाटिकेतून जनजागृती केली.
हा कार्यक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी के. व्ही. तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. प्रस्ताविक मुख्यसेविका श्रीमती ए. बि. शिसोदे यांनी केले. अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा जोंधळे यांनी सुत्रसंचलन केले. कार्यालयातील मुख्यसेविका श्रीमती जी. एस. गुंडारे, श्रीमती. एस. एम. पेंदे, श्रीमती. व्हि.आर. गरूड, श्रीमती. एस. बि. शिसोदे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बिट मधील अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा जोंधळे, श्रीमती दुर्गा सांगोळे, सर्व सहकारी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.
00000
वृत्त क्रमांक 1081
संकरीत चारा बियाणे मोफत उपलब्ध
पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा : पशुसंवर्धन विभाग
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- रब्बी हंगामासाठी सन २०२५-२६ या अर्थीक वर्षात दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम, वैरण व पशुखाद्य कार्यक्रम, चारा उत्पादन कार्यक्रम अंतर्गत (सर्वसाधारण) या योजनेतुन सुधारीत संकरीत चारा बियाणे वैरणीचे शंभर टक्के अनुदानावर पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्याकडून वाटप करण्यात येणार आहे.
विहित नमुन्यात परिपूर्ण भरलेले अर्ज सोमवार 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित पशुवैद्यकिय दवाखान्यात सादर करावेत. जास्तीत जास्त संख्येने नांदेड जिल्हयातील सर्व प्रर्वगाच्या व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, डॉ. राजकुमार पडिले यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत किमान 3 ते ४ जनावरे आहेत अशा लाभार्थीना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थीकडे चारा उत्पादनासाठी स्वत:ची शेत जमीन व सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. सर्व प्रवर्गातील पशुपालकांना या योजनाचा लाभ घेता येईल.
जिल्हयातील १६ तालुक्यातुन या योजनेसाठी अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती किंवा नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याकडून उपलब्ध करुन घ्यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्रमांक 1080
मुखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वसंतनगर मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर मुखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने एकूण ८६३ रिक्त पदांसाठी एकूण ३० विविध खाजगी उद्योग व आस्थापनांमध्ये मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. पासून ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वसंतनगर, मुखेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड. संपर्क ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्रमांक संर्पक क्र. ०२४६२-२५१६७४ योगेश यडपलवार ९८६०७२५४४८ संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000
वृत्त क्रमांक 1079
जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर
वृत्त क्रमांक 1078
“आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीच्या वतीने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवार १२ ऑक्टोबर रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मारुती वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्षपदी परभणी येथील विठ्ठला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोणी बु. चे प्राचार्य डॉ. दशरथ इबतवार यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत तर विशेष मार्गदर्शक म्हणून ना. गिरीश महाजन, ना. संजय शिरसाट, ना. माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
साहित्य संमेलनात महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना डि.लिट ही पदवी दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि महात्मा गांधी मिशन या संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांचाही गौरव करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनास विशेष अतिथी म्हणून खा. डॉ. अजित गोपछडे, खा. प्रा. रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे बीज भाषण क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ "लसाकम"चे प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड करणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार बाबुराव कदम, आमदार आनंद तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार संजय केनेकर यांच्यासह माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताई पाटील, कुसुमताई बाबासाहेब गोपले, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. श्यामसुंदर शिंदे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. गंगाधर पटणे, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. पृथ्वीराज साठे, राम गुंडले, रामचंद्र नावंदीकर, सुधाकर भालेराव, सुभाष साबणे, अनुसयाताई खेडकर हे उपस्थित असणारा असून विशेष अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची उपस्थिती असणार आहे.
रविवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ग्रंथदिंडी निघणार अजून या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. समारोप समारंभाचे विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती असणार आहे.
समारोप समारंभाच्या कार्यक्रमात इयत्ता दहावी, बारावी ८५ टक्के गुण घेतलेल्या, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी निवड, नेट, सेट,पीएच.डी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी विजय रणखांब, संजय मोरे, प्रा. देविदास इंगळे, किरण गोइनवाड, माधव गोरकवाड, अंबादास भंडारे यांच्याकडे नावे नोंदणी करावी.
समारोपानंतर पुणे येथील धनंजय खुडे आणि संच यांच्यावतीने गाथा लोकशाहीरांची हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नांदेडचे स्वागतध्यक्ष मारोती वाडेकर,निमंत्रक गणेश अण्णा तादलापूरकर, गंगाधर कावडे, गुणवंत काळे, कार्यवाह यशपाल गवाले, महाव्यवस्थापक नामदेव कांबळे प्रेमानंद शिंदे, प्रितम गवाले, शिवा कांबळे, विजय रणखांब, प्रा. देविदास इंगळे, निलेश तादलापूरकर, संतोष शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 1077
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना शुभारंभाचे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेबाबत केंद्र शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा शुभारंभ शनिवार 11 ऑक्टोबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी सुब्रमण्यम सभागृह पुसा नवी दिल्ली येथे सकाळी 10.30 वा. होत आहे. नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती मुख्य सभागृह कै. शंकरावजी चव्हाण नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय कार्क्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील कामगिरी करणारे 200 हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले,कृषी कर्जाची उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यांची निवड झालेली आहे.सद्यस्थितीमध्ये राज्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणे, पिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व कडधान्य अभियान या योजनांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार शुभारंभ कार्यक्रम शनिवार 11 ऑक्टोंबर रोजी सर्व जिल्हा मुख्यालय, कृषी विज्ञान केंद्र, सर्व तालुका मुख्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र, सर्व प्राथमिक सहकारी कृषि पतपुरवठा पतसंस्था (PACS), सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.
यामध्ये लोकप्रतिनिधी, कृषि व संलग्न विभागातील अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञ, कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी, नैसर्गिक शेती करीत असलेले शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
वृत्त क्रमांक 1076
रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटीवर बुधवार 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान-कडधान्य-गहू, हरभरा, पौष्टिक तृणधान्य-रब्बी ज्वारी, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया-करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषि विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेंतर्गत-ज्वारी या घटकांतर्गत रब्बी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी हरभरा 1 हजार 900 हेक्टर, गहू 280 हेक्टर, ज्वारी 2 हजार 510 हेक्टर व करडई 1 हजार 169 हेक्टर क्षेत्रावर पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाणांचे बियाणे, खते व एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा अनुदान तत्त्वावर केला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या गटांना एकत्रितपणे शेतीतील उत्कृष्ट पद्धती आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळते. तसेच गटांची निवड 'पहिले येईल त्याला पहिले प्राधान्य' या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकरी गटांनी विहित मुदतीत तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट, संस्था सदस्याकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.
पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे दि. 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer /AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकरी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थाना अर्ज करता येईल.
0000
वृत्त क्रमांक 1075
नांदेड जिल्ह्यात 5 हजार 146 क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्षांक
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्ये, पौष्टिक तृणधान्ये पिके अंतर्गत 5 हजार 146 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
हरभरा पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 5 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 2160 क्विंटल व 10 वर्षा वरील वाणांकरिता 2181 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे.
रब्बी ज्वारीच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 3 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 100 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 260 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे.
गहू पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 2 हजार रुपये प्रति क्विंटल वं 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 298 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 147 क्विंटल लक्षांक प्राप्त आहे.
प्रमाणित बियाणे वितरण या घटकातंर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. वैयक्तिक शेतकरी यांनी संबंधित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ/राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड/ कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड यासंस्थेच्या अधिकृत वितरकांमार्फत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वांवर लाभार्थी निवड करण्यात येत आहे. त्यासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी (Agristack), आधार कार्ड, ७/१२ उतारा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच शेतक-यांनी उत्स्फूर्तपणे याबाबीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
0000
वृत्त क्रमांक 1074
औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- नागरिकांनी खोकला झाल्यावर कफ सिरपची खरेदी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये खोकल्याच्या औषधाचे सेवनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे 3 ऑक्टोबर 2025 व राज्याचे औषध नियंत्रक यांचे 7 ऑक्टोबर 2025 रोजी परिपत्रकानुसार रजिस्टर्ड प्रॅक्ट्रीशनर यांच्या चिठ्ठीवरच औषधांची विक्री करावी अशा सूचना औषध व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 मध्ये सुध्दा औषधांची विक्री नियंत्रित असावी व शेडयूल एच औषधे ही डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसारच रूग्णांना विक्री करावी, असे कायद्यास अभिप्रेत आहे.
सर्व औषध विक्रेत्यांनी खोकल्याची औषध रजिस्टर्ड प्रॅक्ट्रीशनर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये याची दक्षता घेण्यात यावी. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 अंतर्गत कारवाई घेण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी.
00000
वृत्त क्रमांक 1277 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध नांदेड (जिमाका) , दि . 5 :- जिल्हा माहिती कार्यालय , नांदे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
