Monday, February 3, 2025

 वृत्त क्र. 141 

दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

 

नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पोलीस मैदानावर आज दि.३ फेब्रुवारीला दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले.

 

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे हे होते.

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावारसमाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवारसमाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरेजिल्हा समाज  कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.

0000















 वृत्त क्र. 140

सन्मान योजनेंतर्गत साहित्यिक, कलाकारांच्या 11 वारसांसाठी अनुदान मंजूर

* जिल्हा प्रशासनाने मानले लाभार्थ्यांनी आभार 

नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयातील 11 मयत लाभार्थ्यांच्या वारसास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतेच अनुदान मंजुर केले आहे. ही योजना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांचा शासन निर्णय 16 मार्च 2024 अन्वये राबविण्यात येत आहे. ही योजना गरजू व होतकरु तळागाळातील साहित्यिक, कलावंत यांच्यापर्यंत प्रशासनाने पोहचविल्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा निवड समितीची पूनर्रचना करण्यात आली आहे. या योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सदस्य सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) श्रीमती मंजुषा जाधव (कापसे) या सर्वांचे जिल्ह्यातील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांकडुन व त्यांच्या विविध संघटनेकडुन आभार व्यक्त करण्यात आले आहे.

000

वृत्त क्र. 139

 

जागतिक सूर्यनमस्कार दिनरथसप्तमी निमित्त

सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड दि. फेब्रुवारी :- जिल्हयातील योगसंघटनायोग शिक्षकयोग मित्रमंडळयोग विद्याधामयोग परिषदपतंजली योग समितीयोग ॲण्ड स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनमहाराष्ट्र योग शिक्षक संघ असोसिएशन आदींच्या सहकार्याने जागतिक सुर्यनमस्कार (रथसप्तमी) कार्यक्रम 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा. यशवंत महाविद्यालय मैदान नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा प्रशासन नांदेडजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व क्रीडा भारती यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा क्रीडा परिषदजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सुदृढतेचा मुलमंत्र नागरीक विद्यार्थी युवा यांच्यामध्ये बिंबवण्यासाठी सातत्याने शासन स्वयंसेवी संस्था तसेच या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवित आहेत.

 

क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेश यांनी 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवा दिन) ते 4 फेब्रुवारी जागतिक सूर्यनमस्कार (रथसप्तमी) या कालावधीत सुर्यनमस्कार- योगप्रशिक्षण वर्गसुर्यनमस्कार स्पर्धायोगासन स्पर्धा आणि विविध स्तरीय स्पर्धाचे आयोजन शैक्षणिक संस्थाक्रीडा मंडळे इत्यादीना सदर दिनाच्यानिमीत्ताने कार्यक्रम क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

 

तसेच शहरातील महात्मा फुले हायस्कुलबाबानगर,नांदेडसावित्रीबाई फुले विद्यालय,बाबानगरनांदेड, महात्मा फुले विद्यालयविजयनगरनांदेडराजर्षी शाहू विद्यालयवसंतनगरनांदेड, नरहर कुरुंदकर हायस्कूलकौठानांदेडमाधवराव वटेमोड विद्यालय नांदेडशाकुंतल हायस्कुल नांदेडपिनॅकल इं. मेडीयम स्कुल नांदेड व नांदेड जिल्हयातील सर्व शाळा/ क. महाविद्यालयात क्रीडा भारती यांच्या सहकार्याने 4 फेब्रुवारी रोजी वेळ सकाळी 7.30 वा. जागतिक सूर्यनमस्कार दिन रथसप्तमी निमित्त आपआपल्या ठिकाणी क्रीडा भारती यांच्या सहकार्याने मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी योग संघटनायोग शिक्षकयोग मित्र मंडळयोग विद्याधामयोग परिषदपतंजली योग समितीयोग ॲण्ड स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ असोसिएशन आदींच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आयोजन करुन कार्यक्रमांचा फोटोसह अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व क्रीडा भारतीचे ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com, udaylakahalekar@rediffmail.com यावर पाठविण्यात यावेअसे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

000000

  वृत्त   क्र. 1 41   दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न   नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- समाज कल्याण विभाग व ना...