Tuesday, February 14, 2023

वृत्त क्र. 68

 जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन

केंद्रातील निर्लेखित वस्तुचा शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी लिलाव


नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथील टेबलखुर्च्यानोटीस बोर्ड, वापरात नसलेल्या व मोडकळीस आलेल्या निर्लेखित वस्तूंचा लिलाव करावयाचा आहे. जाहीर लिलावात भाग घेण्यासाठीच्या अटी व नियम कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेले आहेत. शहरातील इच्छुक व गरजु खरेदीदारांनी लिलावात भाग घेण्यासाठी शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 रोजी कार्यालयास कैलास बिल्डिंगवर्कशॉप रोडकैलास नगरनांदेड भेट द्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र. (02462) 251674 वर संपर्क साधावाअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

0000 

 वृत्त क्र.  67 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक

निवडणुकीसाठी विविध कामांसाठी निविदा

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या mahatenders.gov.in या संकेतस्थळावर 14 ते 28 फेब्रुवारी पर्यंत सात ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. यात मतदान केंद्रासाठी आवश्‍यक साहित्‍य तसेच कार्यालयीन कामासाठी लेखन सामुग्री व तत्‍सम साहित्‍य पुरवठा व पुढील बाबीचा समावेश आहे. फर्निचर / मंडप भाडे तत्‍वावर पुरवठा करणे, व्हिडीओग्राफी करणेकरीता HD4K डिजिटल कॅमेरामनसह भाडे तत्‍वावर पुरवठा, भाडेतत्त्वावर सी.सी.टी.व्‍ही.(C.C.T.V.), भाडे तत्‍वावर पुरवठा संगणक, झेरॉक्‍स प्रती पुरवठा, डी.टी.पी. व छपाई करण्याबाबतच्या कामांचा यात समावेश आहे. या निविदांची विस्‍तुत माहिती mahatenders.gov.in संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार(सामान्य)यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...