Friday, May 13, 2022

 पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 13 :- राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पूनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शनिवार 14 मे 2022 रोजी लातूर येथून नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आगमन व खा. शरदचंद्रजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे स्वागत. स्थळ- विमानतळ नांदेड. सकाळी 10 वा. गोदावरी अर्बन सहकारी को. ऑप. सोसायटी नवीन मुख्यालयाचा उद्घाटन समारंभास खा. शरदचंद्रजी पवार यांचे समवेत उपस्थिती. स्थळ- तरोडा नाका नांदेड. सकाळी 11.45 वा. तरोडा  नाका नांदेड येथून मोटारीने वाई ता. वसमतकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. बाभुळगाव ता. वसमत येथून नांदेडकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 3.30 ते 4.30 वाजेपर्यंत शरदचंद्रजी पवार यांचेसमवेत राष्ट्रवादी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. दुपारी 4.30 वा. शरदचंद्रजी पवार यांच्या पत्रकार परिषदेस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. सायं 5.30 वा. कै. शामराव कदम हॉस्पिटल भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- सामाजिक न्याय भवन जवळ नांदेड. सायं 6.30 वा. कमलकिशोर कदम यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- माधसवाड इस्टेट नमस्कार चौक म्हाळजा बायपास नांदेड. रात्री 8.30 वा. एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथे राखीव. यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. 

रविवार 15 मे 2022 रोजी शरदचंद्रजी पवार यांचेसमवेत हरिहर भोसीकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नांदेड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- शिवकृपा शाहूनगर आनंदनगर रोड नांदेड. सकाळी 10.15 वा. खा. शरद पवार पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाणावेळी उपस्थिती. स्थळ नांदेड विमानतळ. यानंतर ॲड. मोहम्मद खान पठाण यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- लेबर कॉलनी उमर फारुक मस्जिद जवळ नांदेड. सुरेश गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- लेबर कॉलनी, उमर फारुक मस्जिद जवळ नांदेड. डॉ. उत्तम सोनकांबळे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- जगदीश कॉलनी चैतन्यनगर तरोडा बु. नांदेड. केशव घोणसे पाटील संपादक दै. गोदातीर समाचार यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- शिवाजीनगर नांदेड. सोईनुसार नांदेड येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

000000

 गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 13 :- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

शनिवार 14 मे 2022 मुंबई येथुन विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 9.30 वा. आगमन. सकाळी 10 वा. तरोडानाका नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था व इतर विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक. स्थळ- पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांचे कार्यालय सिडको रोड नांदेड. सायं. 5.30 वा. पद्मश्री इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर नांदेड या संस्थेच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- सामाजिक न्याय भवनच्या बाजुस, नमस्कार चौक, म्हाळजा बायपास नांदेड. सायं. 6.30 वा. कमलकिशोर कदम अमृत महोत्सव स्वागत समिती नांदेड आयोजित महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमकिशोर कदम यांचा अमृत महोत्सव सोहळा. स्थळ- माधसवाड इस्टेट, नमस्कार चौक, म्हाळसा बायपास नांदेड. रात्री नांदेड येथे मुक्काम.

रविवार 15 मे 2022 रोजी सकाळी 9 वा. हरिहरराव वि.भोसीकर यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- शिवकृपा, शाहूनगर विद्युतनगर बस स्टॉप समोर आनंदनगर रोड नांदेड. सकाळी 9.30 वा. मोटारीने शाहुनगर, आनंदनगर रोड नांदेड येथून श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड कडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सकाळी 10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथुन मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

 विभागातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा

अभ्यास करण्यासाठी समितीचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- मराठवाडा विभागातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाय योजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्यातील यंत्रमाग बहुल भागातून आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली असल्याचे समिती सचिव तथा प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई यांनी कळविलेले आहे. सदर समिती मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यातील यंत्रमाग बहुल भागाचा दौरा करुन यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्याबाबत अहवाल शासन सादर करणार आहेत. त्यानुसार उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यातील खाजगी, तसेच सहकारी संस्थांची पदाधिकारी, सभासद यांनी आपल्या सदस्यांचे निवेदन, सूचना असल्यास उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 19 मे, 2022, नांदेड जिल्ह्यासाठी 20 व 21 मे 2022, तर बीड जिल्ह्यासाठी 20 मे, 2022 रोजी संबंधित जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहून निवेदन द्यावे.

*****

 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

शनिवार 14 मे 2022 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.35 वा. नांदेड विमानतळ येथून तरोडा नाकाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. गोदावरी अर्बन सहकारसूर्य मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- सहकारसूर्य तरोडानाका नांदेड. सकाळी 11.45 वा. तरोडानाका येथून मोटारीने वाई ता. वसमतकडे प्रयाण. दुपारी 3.30 ते 4.30 यावेळेत शरदचंद्रजी पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते सेाबत बैठकीला उपस्थिती स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. दुपारी 4.30 वा. शरदचंद्रजी पवार यांच्या पत्रकार परिषदेस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. सायं. 5.15 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भेट नांदेड. सायं. 5.30 वा. इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर भूमिपूजन सोहळा. स्थळ- सामाजिक न्याय भवनाच्या बाजुस नमस्कार चौक नांदेड. सायं 6.30 वा. कमलकिशोर कदम एमजीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या 75 व्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ माधवसवाड इस्टेट नमस्कार चौक नांदेड. रात्री 8.30 वा. एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राखीव. यानंतर सोयीनुसार परळी जि. बीड कडे प्रयाण करतील.

0000

 मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी समर्पित आयोग

निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय दौऱ्यावर

 

·        रविवार 22 मे रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट   

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदपंचायत समितीग्रामपंचायत आणि शहरातील महानगरपालिकानगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थेत नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसीव्हीजेएनटी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचे सदस्य हे 21 ते 28 मे 2022 या कालावधीत विभागवार भेटी देणार आहेत. यासाठी समर्पित आयोगाने विभागनिहाय भेटीचा कार्यक्रम निश्तिच केला आहे.

 

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यासाठी समर्पित आयोगाने विभागवार हा कार्यक्रम जाहिर केला आहे.

 

या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना स्वत:ची मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावाअसेही स्पष्ट केले आहे.    

 

समर्पित आयोगाचा दौरा व भेटीच्या वेळा    

 

शनिवार 21 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत. रविवार 22 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे सकाळी 9.30 ते 11.30 यावेळेत तर याच दिवशी 22 मे रोजी सायं. 5.30 ते 7.30 यावेळेत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे. बुधवार 25 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे. दुपारी 2.30 ते 4.30 या कालावधीत. शनिवार 28 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत  विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे तर शनिवार 28 मे 2022 रोजी सायं. 4.30 ते 6.30 या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे समर्पित आयोगाचे सदस्य भेट देणार आहेत संबंधितानी यांची नोंद घ्यावीअसे आवाहन आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.  

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...