Monday, November 9, 2020

                71  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

        35 कोरोना बाधितांची भर  तर तिघांचा मृत्यू

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- सोमवार 9 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 71 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 35 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले.

 

आजच्या एकुण 548 अहवालापैकी  479 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 478 एवढी झाली असून यातील  18  हजार 416 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 362 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 27 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार तीन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 8 नोव्हेंबर 2020 रोजी विजयनगर नांदेड येथील 90 वर्षाचा एक पुरुष, अर्धापूर तालुक्यातील शनि येथील 66 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर सोमवार दि. 9 नोव्हेंबर 2020 रोजी गणेशनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 532 झाली आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 33, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, बिलोली कोविड केअर सेटर व गृहविलगीकरण 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, खाजगी रुग्णालय 19,  असे एकूण 71 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 12, मुखेड तालुक्यात 1, परभणी 2, यवतमाळ 1 असे एकुण 16 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 12,  हदगाव 1, देगलूर 1, भोकर 1, कंधार 2, किनवट 2 असे एकूण 19 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 362 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 42, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 45, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 116, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 23, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 9, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 4, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 19, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4,  अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 48 आहेत. 

 

सोमवार 9 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 160, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 21 हजार 831

निगेटिव्ह स्वॅब- 98 हजार 815

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 478

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 416

एकूण मृत्यू संख्या- 532

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.54टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 485

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 362

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 27.

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 

 



 

खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकिटदर

आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  जिल्हयात खाजगी बस, ट्रॅव्हल्स, कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने तिकिटदर आकारल्यास, तसेच प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी असे, आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत केले आहे.

27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अंमलात आला आहे. तक्रारी संदर्भाने उचित चौकशीअंती संबंधीत कंत्राटी बस परवाना धारकांच्या परवान्यावर निलंबनाची, रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच खाजगी कंत्राटी वाहनांना (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ.) गर्दीच्या हंगामाच्या काळात एस.टी. बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी mvdcomplaint.enf2@gmail.com वर तक्रार नोंदवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

राष्ट्रीय आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी

शिष्यवृत्तीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS २०२१-२१) चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठीचे आवेदन पत्र भरण्यासाठी ०९ नोव्हेंबर २०२० पासून ऑनलाईन परिक्षा परिषदेच्या www.mscepune.in  nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर ०८ डिसेंबर २०२० पर्यंत नियमित शुल्कासह तसेच ०९ ते १६  डिसेंबर २०२० विलंब शुल्क १७  ते २३ डिसेंबर -२०२० पर्यंत शाळा संस्थेच्या जबाबदारीवर अतिविलंब शुल्कासह भरण्यासाठी उपलब्ध राहील. तरी जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांनी  याची नोंद घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(मा) बालासाहेब कुंडगीर यांनी केले आहे.    

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS २०२१-२१) चे आयोजन करण्यात आलेले असून महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आवेदन पत्र भरण्यासंबधीच्या सूचना परिक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

000000

 

 

अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्रासाठी

14 ते 30 नोव्हेंबरपर्यंत विशेष पंधरवडा

नांदेड (जिमाका) दि. 9 :- पात्रताधारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमीत करण्याकरीता विभागीय स्तरावर 14 ते 30 नोव्हेंबर 2020 कालावधीमध्ये पंधरवडा राबविण्यात येत आहे. हा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्याकरीता विभागातंर्गत कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाल कल्याण समिती, बालकांच्या काळजीसाठी कार्यरत असलेल्या संस्थाचे अधिक्षक व इतर सर्व संबंधीत यांना माहिती होण्याकरीता तसेच अनाथ प्रमाणपत्रासंबंधीचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून प्रमाणपत्र निर्गमीत करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने, त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे महिला व बाल विकास विभागाचा 6 जून, 2016 च्या शासन निर्णयान्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमातंर्गत मान्यता प्राप्त (अनुदानित/ विनाअनुदानित) संस्थामध्ये दाखल असलेल्या व निकष पुर्ण करणाऱ्या संस्थेतील अनाथ मुलांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.

0000  

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  10 नोव्हेंबर पासून लागू 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात 10 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम  37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 10 नोव्हेंबर, 2020 चे 06.00 वाजेपासून ते मंगळवार, दिनांक 24 नोव्हेंबर 2020 चे मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 

केळी पिकासाठी कृषी संदेश

नांदेड (जिमाका) दि. 9 :- केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असुन केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे कृषि संदेश देण्यात आला आहे. 

केळी पिकावरील ठिपके आढळुन आल्यास रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग काढुन टाकावे व बागेबाहेर आणुन नष्ट करावा. बागेत वाळलेली पाने झाडावर लटकणारी काढुन टाकावेत. केळीची बाग स्वच्छ व तणविरहीत ठेवावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...