वृत्त क्रमांक 1087
फळ पिक विमा
योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी
नांदेड दि. 13
ऑक्टोबर :- पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना सन 2025-26 अंतर्गत व आंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांसाठी शासन
निर्णय समजून घेऊन दिलेल्या अंतिम
दिनांकापूर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी
शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असुन संबंधित विमा कंपनी
किंवा कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
आंबिया बहार
रब्बी विमा हप्ता दर
अनुक्रमे फळपिक, समाविष्ट धोके, विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.), शेतकऱ्यांनी
भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) पुढीलप्रमाणे आहे.
फळपिक द्राक्ष- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित
रक्कम (रु. प्रती हे.) 3 लाख 80 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा
विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 19 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित
रक्कम 1,27,00, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 6 हजार 350 आहे.
फळपिक मोसंबी- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित
रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख, शेतकऱ्यांनी भरावयाचा
विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 5 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित
रक्कम 33 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित)
1 हजार 650 आहे.
फळपिक केळी- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित
रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा
विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 8 हजार 500, गारपीट नियमित
विमा
संरक्षित रक्कम 57 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार 850 आहे.
फळपिक अंबा- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित
रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा
विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 8 हजार 500, गारपीट नियमित
विमा
संरक्षित रक्कम 57 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार 850 आहे.
फळपिक संत्रा- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित
रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख, शेतकऱ्यांनी भरावयाचा
विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 7 हजार 500, गारपीट नियमित
विमा
संरक्षित रक्कम 33 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 1 हजार 650 आहे.
फळपिक पपई- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित
रक्कम (रु. प्रती हे.) 40 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा
विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित
रक्कम 13 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित)
650 आहे.
योजना अंमलबजावणी
वेळापत्रक व अधिसुचित मंडळे
ही योजना
जिल्ह्यामध्ये पुढील दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल.
आंबिया बहार
अधिसुचित महसुल मंडळे
अधिसुचित फळपिक
द्राक्ष अर्धापूर तालुक्यात अधिसुचित महसूल मंडळ अर्धापूर, दाभड, मालेगाव असून देगलूर
तालुक्यात मरखेल, हाणेगाव. नांदेड तालुक्यात तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपरी.
भोकर तालुक्यात भोकर. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यातील शेवडी
बा. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी या मंडळांचा समावेश आहे. पिक विमा
भरण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर असून विमा संरक्षण प्रकारात अवेळी पाऊस, दैनंदिन कमी
तापमान, गारपीटाचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 16 ऑक्टोबर ते 30 एप्रिल, 1 डिसेंबर
ते 28 फेब्रुवारी व 1 जानेवारी ते 31 मे असा राहील.
मोसंबी फळपिक अर्धापूर
तालुक्यात मालेगाव. कंधार तालुक्यात बारुळ, फुलवळ, कंधार, उस्माननगर. नांदेड तालुक्यात
लिंबगांव, विष्णुपुरी, नाळेश्वर, तरोडा बु. मुखेड तालुक्यात मुखेड, जाहूर. धर्माबाद
तालुक्यात करखेली. हदगाव तालुक्यात मनाठा, हदगाव, पिंपरखेड. मुदखेड तालुक्यात बारड
व मुदखेड या मंडळांचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 असून
अवेळी पाऊस, जास्त तापमान, जास्त पाऊस, गारपीटचा विमा संरक्षण प्रकारात समावेश आहे.
विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेबर ते 31 डिसेबर, 1 मार्च ते 31 मार्च, 15 ऑगस्ट ते
15 सप्टेंबर, 1 जानेवारी ते 30 एप्रिल याप्रमाणे राहील.
केळी फळपिकात अर्धापूर
तालुक्यात अर्धापूर, दाभड, मालेगाव. उमरी तालुक्यात उमरी, सिंधी. किनवट तालुक्यात इस्लापूर,
शिवनी, किनवट, बोधडी. देगलूर तालुक्यात मरखेल, हाणेगाव, नरंगल, शहापूर. नांदेड तालुक्यात
तरोडा बु. तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी, नांदेड ग्रा., नाळेश्वर, वाजेगाव. नायगाव
तालुक्यात बरबडा, कुंटुर, नरसी. भोकर तालुक्यात भोकर, भोसी. मुदखेड तालुक्यात मुदखेड,
मुगट, बारड. लोहा तालुक्यात शेवडी बा. सावरगाव, नसरत. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा,
मनाठा, आष्टी या मंडळाचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025
असून विमा संरक्षण प्रकारात कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, गारपीट याचा समावेश
राहील. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी, 1 मार्च ते 31 जुलै, 1
एप्रिल ते 31 मे, 1 जानेवारी ते 30 एप्रिल हा राहील.
आंबा फळपिकात अर्धापूर
तालुक्यात मालेगाव, दाभड. कंधार तालुक्यात कंधार, बारुळ, फुलवळ, पेठवडज, दिग्रस बु.
नांदेड तालुक्यात लिंबगांव, नाळेश्वर. भोकर तालुक्यात मोघाळी, भोसी. मुखेड तालुक्यात
मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, चांडोळी, येवती, जाहुर. हदगाव तालुक्यात निवघा, तळणी या मंडळाचा
समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असून विमा संरक्षण प्रकारात
अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट याचा समावेश आहे. विमा
संरक्षण कालावधी 1 जानेवारी ते 31 मे, 1 जानेवारी ते 28 फेब्रूवारी, 1 मार्च ते 31
मार्च, 1 एप्रिल ते 31 मे, 1 फेब्रुवारी ते 31 मे आहे.
पपई पिकात नांदेड
तालुक्यात लिंबगाव, नाळेश्वर, तरोडा बु. अर्धापूर तालुक्यात दाभड, मालेगाव. कंधार तालुक्यात
कंधार. लोहा तालुक्यात शेवडी बा., हदगाव तालुक्यात तामसा, मनाठा. भोकर तालुक्यात भोकर
या मंडळांचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 आहे. विमा संरक्षण
प्रकारात कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस व आर्द्रता, गारपीठ समावेश आहे. विमा
संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी, 1 फेब्रुवारी ते 30 जुन, 15 जून ते
30 सप्टेंबर. 1 जानेवारी ते 30 एप्रिल आहे.
संत्रा पिकात नांदेड
तालुक्यात लिंबगाव, नाळेश्वर या मंडळाचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत
30 नोव्हेंबर 2025 आहे. विमा संरक्षण प्रकारात अवेळी पाऊस, कमी तापमान, जादा तापमान,
गारपीठ समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी, 16 जानेवारी ते
28 फेब्रुवारी, 1 मार्च ते 31 मे, 1 जानेवारी ते 30 एप्रिल आहे.
या योजनेत अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळपिकासाठी कुळाने भाडेपट्टीने शेती
करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. पिककर्ज घेणाऱ्या आणि
बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित
मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपीक विमा पोर्टल WWW.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी, आधार कार्ड, जमीन धारणा 7/12, 8 (अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo
Tagging) केलेला फोटो, बँक पासबूक वरील बँक
खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता
येतील.
शासनाच्या ११ एप्रिल, २०२५ रोजीच्या
शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता
शेतकरी ओळखपत्र क्रमांक१५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य
करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत
फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये योजनेत सहभागी होण्याकरीता
अॅग्रिस्टेंक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक राहील.
या योजनेत प्रती शेतकरी सहभागासाठी एका फळपिका खालील कमीतकमी उत्पादनक्षम
क्षेत्र २० गुंठे ( ०.२० हे. अशी मर्यादा राहील. जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा हि
सर्व फळपिके मिळून व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हे. मर्यादेतपर्यंत राहील.
अधिसूचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा
आंबिया बरहापैकी कोणत्याही एकाच हंगामा करिता विमा सरंक्षणासाठी अर्ज करता येईल.
(उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब
व द्राक्ष). पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहाभागी होणाऱ्या
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
राज्य शासनाच्या
शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना द्राक्ष, मोसंबी, केळी, आंबा, पपई व संत्रा या अधिसुचित पिकांकरीता अधिसुचित महसुल मंडळामध्ये भारतीय कृषि
विमा कंपनी लिमिटेड, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्टिट्र, फोर्ट मुंबई - 400023 मार्फत राबविण्यात येत
आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
0000000