Friday, July 29, 2022

 नांदेड जिल्ह्यात 17 व्यक्ती कोरोना बाधित

तर 13 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 180 अहवालापैकी 17 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 134 एवढी झाली असून यातील 1 लाख 398 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 44 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, माहूर 3, भोकर 1, नायगाव 1, धर्माबाद 1, वसमत 1, हदगाव 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे बिलोली येथील 3 असे एकुण 17 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 13 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 23,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 15 असे एकुण 44 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 12 हजार 619

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 92 हजार 105

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 134

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 398

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-44

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक. 

 000000

 महावितरण आपल्या दारी आले ही भाग्याची गोष्ट

आकोडे टाकून वीज वापरणे हे दुर्दैव - अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

विविध कार्यक्रमांनी रंगला ऊर्जा महोत्सव

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मागील काही दशकातील विजेची स्थिती पाहता आज विद्युत क्षेत्रात मोठी क्रांती झाल्याचे मान्यच करावे लागेल. आपल्या जीवनात प्रकाश पोहोचवण्यासाठी महावितरण आपल्या दारी आले आहे ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे असे मनोगत अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दिनांक 29 जुलै रोजी मोठ्या उत्साहात उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य पॉवर ॲट 2047 या संकल्पनेतून महावितरणच्या वतीने ऊर्जा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवाचा अध्यक्षीय समारोप करताना श्री परदेशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी रॉकेलचा दिवा, स्टंगस्टनचा दिवा पाहिलेला आहे. विजे विना ग्रामस्थांचे जीवन काय असते याची अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे. त्या दृष्टीने आजचा काळ हा एक ऊर्जा क्रांतीचा काळ आहे हे मान्य करावे लागेल. ग्राहकाभिमुखतेच्या दृष्टीने शासन हे विकासात्मक योजना राबवत असते त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवं. सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवणारी योजना आहे. यामुळे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे शाश्वत सिंचन करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. कोरोनाच्या महामारी मध्ये माझा मुलगा अखंडित विजे मुळेच शिक्षण घेऊ शकला, असे सांगत श्री परदेशी म्हणाले की पूर्वजांच्या कर्तबगारीवरच आज आपण जगत आहोत. ही बाब दुर्लक्षित न करता येणारी आहे. वीज चोरून वापरणे, वापरलेल्या विजेचे बिल न भरणे या गोष्टी आपण टाळायला हव्यात. महावितरणचा लाईनमन उन्हा पावसात आपल्याला वीज पुरवण्यासाठी प्रयत्न करत असतो. वीज खंडीत झाल्याच्या  काळात लाईनमनला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

या कार्यक्रमास नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर, केंद्र शासनाच्या पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे समन्वयक श्री रविंद्र रेंगडे, महावितरणच्या नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव, महापारेषणचे अधीक्ष्क अभियंता श्री मिलींद बनसोडे, प्रभारी अधीक्षक अभियंता श्री सुनिल वनमोरे, त्याचबरोबर श्री सुशील पावसकर, तौसिफ पटेल, महापारेषणचे कार्यकारी अभियंता श्री माधव सोनकांबळे, श्री पवार, श्री कुलकर्णी, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री अभीमन्यू राख, श्री श्रीनिवास चटलावार प्रामुख्याने उपस्थित होते.

 

याप्रसंगी मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी राज्यात व परिमंडळात झालेल्या विद्युतीकरणावर प्रकाश टाकला. तसेच भविष्यात विजेच्या क्षेत्रात होणारा बदल स्पष्ट करत सौभाग्य योजने अंतर्गत नांदेड जिल्हयातील 28 हजार कुटूंबियांना प्रकाश पोहचवण्याचे काम करण्याची संधी प्राप्त झाली याचा आनंद आहे. आज रोजी नांदेड जिल्हयात 2100 कोटी रूपयांची थकबाकी आहे. त्यामुळे उदयासाठी वीज हवी असेल तर आज विकलेल्या प्रत्येक युनीटच्या बिलाची वसुली झाली पाहिजे असे स्पष्ट करत दरमहा वीजबील भरण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महावितरणच्या विवीध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यी श्री संभाजी लूकूडवार, श्री गजानन हेंडगे, परमेश्वर शिंदे,श्री पांडूरंग चेलकेवार तसेच श्री चेलकेवाड यांनी  मनोगते व्यक्त करत आमच्या जीवनात प्रकाश निर्माण केला असे गौरवोउदगार काढत महावितरणला धन्यवाद दिले.

 

ऊर्जा विभागाच्या विविध कामांची चित्रफीत, प्रमोद देशमूख यांचे पथनाट्य, मोतीराम जोंधळे यांनी कलापथकाव्दारे ऊर्जा विषयक जनजागृती असा भरगच्च कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविक सादर करत अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव यांनी नांदेड जिल्हयात गेल्या आठ वर्षात झालेल्या कामांची माहिती दिली.कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय पवार यांनी केले.कार्यक्रम यशश्वितेसाठी अभियंते श्री स्वप्नील जोशी, श्री नारायण मार्लेगावकर, श्री जनार्दन चौधरी, श्री प्रमोद क्षीरसागर, श्री गट्टूवार, श्री दंडगव्हाण व जनमित्रांनी परिश्रम घेतले. यावेळी नायगाव उपविभागातील लाभार्थी ग्रामस्थ तसेच महावितरणचे सर्व अभियंते, अधीकारी व जनमित्र मोठया संख्येने उपस्थित होते.




 

फोटो ओळ:- ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी. मुख्य अभियंता श्री पडळकर, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव व अधिकारी.

00000


 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  6.90 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 29 :- जिल्ह्यात शुक्रवार 29 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 737.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवार 29 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 5 (694.50), बिलोली-1.80 (777.20), मुखेड- 8.70 (679.30), कंधार-0.20 (692.10), लोहा-0.20 (663), हदगाव-3.70 (654.60), भोकर-28(865.30), देगलूर-0.40 (628.60), किनवट-16.40 (817.40), मुदखेड- 7.80 (892.80), हिमायतनगर-14 (1024.60), माहूर- 2.20 (664.40), धर्माबाद- 8.10 (814.90), उमरी- 18.70(918.60), अर्धापूर- 4.40 (674.10), नायगाव-1 (666.90) मिलीमीटर आहे.

0000 

  वृत्त क्र. 704 वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता    हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना    प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 07 ...