Thursday, December 5, 2024

वृत्त क्र. 1164

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम व सीवाय टीबी टेस्टचे उदघाटन

क्षयरुग्ण संपर्कातील व्यक्तींची संसर्गिक तपासणी व औषधोपचार होणार –मीनल करणवाल

नांदेड दि. 5 डिसेंबर :  फुफ्फुसाशी संबंधित क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्षयरोगाचा संसर्ग झाला आहे काय याबाबतची तपासणी करून त्यांना रोगप्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात येणार आहे. या आरोग्यसेवेचा व जंतनाशक मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले.

मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हास्तरीय सीवाय टी बी टेस्ट व जंतनाशक मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ह्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आरोग्य संबंधीच्या सेवा त्यांच्या राहत्या गावातूनच मिळाव्यात म्हणून सी वाय टी बी टेस्ट व जंतनाशक गोळ्याचे वितरण सारख्या आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. हे क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या कामी महत्वपूर्ण पाऊल असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे गरजूवंताना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तरी गरजु रुग्णांनी या आरोग्य सेवा उपलब्ध करुन घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. 

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कासराळीकर , शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी,  आरोग्य कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

00000




 वृत्त क्र. 1163

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी सकंलन शुभारंभ कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन

 नांदेड डिसेंबर दि. 5 :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024-25 संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 12 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

00000

वृत्त क्र. 1162

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड डिसेंबर दि. 5 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

०००००

 दि. 5 डिसेंबर२०२४

वृत्त क्र. २२४

 

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत

ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी

उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेअजित पवार यांनी घेतली शपथ

 

मुंबईदि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदेअजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.

आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहकेंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डाकेंद्रीय भूपृष्ठ परिवहन व  महामार्ग मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहानकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनकेंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयलकेंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकरकेंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादवकेंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवकेंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारस्वामीकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानकेंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझीकेंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधियाकेंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजूकेंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंहकेंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवानउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथआंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारअरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडूआसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्माछत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव सायगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलहरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनीमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवमेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमाराजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मात्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहाउत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामीपुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामीओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझीमणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंहनागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओसिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांगकेंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवलेमुरलीधर मोहोळप्रतापराव जाधवरक्षाताई खडसेविविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्यब्रजेश पाठकपवन कल्याणराजेंद्र शुक्लाअरुण सावोविजय शर्माप्रेमचंद बैरवाविजयकुमार सिन्हासम्राट चौधरीकनक बर्धन सिंह देवप्रवती परिदाचौना मेनप्रेसतोन त्यांसोंगयांथुंगो    पटॉनटी. आर. झेलियांगएस धारश्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधूसंतमहंतविविध धर्मांचे गुरुराज्यातील खासदारआमदारविविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेतेउद्योगक्रीडामनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरविशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.

००००















 

वृत्त क्र. 1185 सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांनी ईक...