Tuesday, March 5, 2024

वृत्त क्र. 205

 छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित

'शिवगर्जना’ महानाट्याचा नांदेडमध्ये प्रयोग

·         9,10,11 मार्चला नांदेड सर्कस ग्राउंडवर सायंकाळी दररोज सादरीकरण

 

नांदेडदि. 5 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. दि. 9,10,11 मार्च 2024 रोजी, सर्कस ग्राउंडरेल्वे स्टेशन शेजारीनांदेड येथे आबालवृद्धाना विनामूल्य महानाट्य पाहता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित हे महानाट्य नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी ३ प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. कोणत्याही पासेस विना प्रवेशिका विना प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे महाराष्ट्राच्या भूमीतील प्रत्येकाने बघावा असा हा नाटय प्रयोग सहकुटुंब बघण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वांना सादर निमंत्रित केले आहे. किमान दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी वाहनतळरस्ते मार्गआपत्ती व्यवस्थापनबैठक सुविधाजनजागृती आदि विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले. या महानाट्याला नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य शिवगर्जना

 

आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेतभारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्तीघोडेउंटबैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहेतसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. 12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रयोगाला सुरुवात होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या अविस्मरणीय क्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000




 

वृत्त क्र. 204

 नव उद्योजकांसाठी एक खिडकी योजना राबविणार

 -  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत


·         नांदेड येथे एक दिवसीय गुंतवणूक परिषदेला व्यापारउद्योग जगताचा प्रतिसाद


नांदेड दि. 5 :- जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात नवीन उद्योगांची वाढ होवून रोजगार निर्मिती होण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासू नये. त्यांची कामे सुलभ व वेळेत व्हावीत यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. मिडलॅड हॉटेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळेमहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी शंकर केंदुळेनगर रचनाकार पवनकुमार आलुरकरजिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटेजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळेजिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके आदीची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक संघटनासंघटनेचे पदाधिकारीनामांकित उद्योजकऔद्योगिक समूहसनदी लेखापाल इ. ची उपस्थिती होती.


उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या विहित मुदतीत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे सेवावैद्यकीय सेवाशैक्षणिक प्रकल्प इ. यांना पायाभूत सुविधा देण्याबाबत तसेच गुंतवणूकदारांना उद्योगांसाठी लागणारे विविध परवानेअनुषंगिक सवलतीअनुदान इ. बाबी उद्योगास प्राधान्याने दिल्या जातील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच देशातंर्गत दळणवळणाची सोय सुलभ झाली असल्यामुळे उद्योगघटकांना नांदेड जिल्हयात गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

या परिषदेमध्ये विविध विभागाच्या शासकीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची कार्यप्रणाली विषद करुन भावी उद्योजकांना अडी-अडचणींबाबत मार्गदर्शन केले. या गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यातील विविध उद्योग घटकाच्या उत्पादित मालाची स्टॉल उभारणी करण्यात आली होती. या स्टॉलला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देवून पाहणी केली.

 

या कार्यक्रमांमध्ये एखादा उद्योग कसा उभारावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्या त्या विभागाची काय कार्य आहेतयाची माहिती दिवसभराच्या कार्यशाळेत दिली. नांदेड जिल्हा हा उद्योग उभारणीसाठी पायाभूत सुविधांनी युक्त असून या ठिकाणी नव्या स्टार्टअप कंपन्यांनी झेप घ्यावीअसे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 

नांदेड जिल्ह्याचे विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देण्याचा या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या परिषदेमध्ये 60 उद्योग घटकामध्ये हजार 450 कोटी गुंतवणूक व हजार रोजगार निर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने प्रकल्प संचालक शंकर पवार यांनी आभार मानले.

 0000






 वृत्त क्र. 203

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार

योजनेसाठी अर्ज करण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

नांदेड दि. 5 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  15  मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांनी आपला अर्ज http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रत (प्रिंट) अर्ज भरल्यानंतर 2 दिवसात आवश्यक कागदपत्रासह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करणे बंधनकारक आहे. तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन संबंधित महाविद्यालयाकडे प्राचार्य यांनी सही शिक्क्यासह सात दिवसाच्या आत पर्यत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनग्यानमाता शाळेसमोरनमस्कार चौक नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिनांक 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

लाभाचे स्वरूप या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भोजन भत्ता 28 हजार रुपयेनिवास भत्ता 15 हजार रुपयेनिर्वाह भत्ता 8 हजार रुपयेप्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रुपयेवरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल. 

या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास  विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावीबारावीपदवीपदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा  नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. शासन परिपत्रक 31 ऑक्टोंबर 2023 नुसार विद्यार्थ्यांने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही. 

विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल अशी सूचना समाज कल्याण कार्यालयाने दिली आहे. तसेच अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र,त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 202

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 7 मार्च रोजी आयोजन

नांदेड दि. 5 : जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत  गुरुवार 7 मार्च 2024  रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र.02462251674 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपण्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असेही  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...