Tuesday, September 13, 2022

 वृत्त क्र.  850 

उद्योग केंद्रातील विविध योजनेबाबत

मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार / युवक व युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनेबाबत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्यावतीने गुरुवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. शेप स्किल अकॅडमी, नृसिंह मंदिराजवळ कौठा रोड, कौठा, नांदेड येथे जिल्हा उद्योग केंद्राचे लेखापरिक्षक बालाजी जायभाये हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील युवक व युवतीनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02462-251674 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

00000 

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...