Friday, February 20, 2026

वृत्त क्रमांक

परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 परीक्षार्थ्यांपैकी 43 हजार 949 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.68 इतकी नोंदविण्यात आली.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण वेळ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व 178 केंद्रांवर आजची इयत्ता 10 वीची परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडली.

परंतु जिल्ह्यातील काही केंद्रांवर परीक्षा कालावधीत परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्ती परिसरात दिसून आल्या आहेत. ही बाब भारतीय न्याय संहिता कलम 163 चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून इयत्ता 12 वी तसेच पुढील सर्व इयत्ता 10 वी व 12 वीच्या पेपरदरम्यान परीक्षा केंद्र परिसरात परीक्षेशी संबंध नसलेली व्यक्ती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिला आहे.

सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी इयत्ता 12 वीच्या परीक्षेदरम्यान दहेली तांडा केंद्रास भेट दिली असता त्यांना काही अनधिकृत व ओळखपत्र नसलेल्या व्यक्ती परीक्षा केंद्र परिसरात फिरताना आढळून आल्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व परीक्षा केंद्रांवर कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. संबंधित व्यक्ती त्या शाळेचे कर्मचारी किंवा संस्थेचे प्रतिनिधी असले तरी परीक्षेशी थेट संबंध नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

उद्या, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 12 वीचा महत्त्वाचा गणित विषयाचा पेपर असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहूल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत.

इयत्ता 10 वी व 12 वीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असून विद्यार्थ्यां व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

00000

वृत्त क्रमांक

अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण

नांदेड दि. २० फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहयाने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून निवड केलेल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  

आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल व खाजगी तथा मान्यता माध्यमिक शाळा अंतर्गत इयत्ता 11 वी व इ. 12 वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षेची तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आयटीआय मधील अभ्यासक्रमांना जास्तीत जास्त मुलांना प्रवेश घेणे सोईस्कार शक्य होईल. 

मुला-मुलींना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी सीईटी CET/ जेईई JEE व  नीट NEET साठी प्रत्येकी 50 एवढी आहे. त्यानुसार निवड केलेले केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. 

नाशिक अपर आयुक्त अंतर्गत आश्रमशाळा शा.आ.शा. बोपेगांव (नाशिक प्रकल्प) मुलांना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी CET/JEE- 50 व  NEET- 50 एवढी आहे. 

ठाणे अपर आयुक्त अंतर्गत आश्रमशाळा शा.आ.शा. (शहापूर प्रकल्प) मुलींना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी CET/JEE- 50 व  NEET- 50 एवढी आहे. 

अमरावती अपर आयुक्त अंतर्गत आश्रमशाळा शा.आ.शा. गोटेवाडी (प्रकल्प कळमनुरी) मुलांना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी CET/JEE- 50 व  NEET- 50 एवढी आहे. 

नागपूर अपर आयुक्त अंतर्गत आश्रमशाळा शा.आ.शा. सिंधीविहीर (वर्धा प्रकल्प) मुलींना प्रवेश द्यायची विद्यार्थी संख्या इयत्ता 11 वी CET/JEE- 50 व  NEET- 50 एवढी आहे. 

याप्रमाणे नमुद अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षणाकरीता विद्यार्थ्यांची सर्वसाधारण पात्रता पुढीलप्रमाणे आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अनुसूचित जमातीच्या यादीतील असावा व त्याकरिता प्रवेशावेळी जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी असावे. या चाळणी परिक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सदरचा विद्यार्थी 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी मध्ये प्रवेशित असावे.) 

वरीलप्रमाणे या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सर्व शासकीय/अनुदानित आश्रमशाळा/EMRS निवासी शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व नांदेड जिल्हातील सर्व खाजगी तथा मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीच विद्यार्थी असावे. 

आवेदन पत्र विहीत नमुन्यात व यादी संबधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट जि. नांदेड या कार्यालयात बुधवार 18 फेब्रुवारी 2026 पुर्वी सादर करावेत. विहित नमुन्यात माहिती सादर केलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा माहे मार्च 2026 मध्ये या प्रकल्प कार्यालया अंतर्गत एकुण प्राप्त आवेदनपत्रानुसार शासकीय आश्रमशाळेवर घेण्यात येणार आहे, असे आवाहन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा

नांदेड, दि. 20 फेब्रुवारी :- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष (मंत्री दर्जा) पाशा पटेल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

रविवार 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वा. लोदगा, लातूर येथून नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आगमन. सकाळी 11.05 वा. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे माधवराव पाटील यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थित. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण राखीव व मुक्काम. 

0000

वृत्त क्रमांक

मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती

माजी सैनिक, पाल्य व पत्नी/विधवांसाठी संधी

नांदेड दि.२० फेब्रुवारी :- मेस्को क्षेत्रीय कार्यालय, लातूर अंतर्गत बीड व नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या पदांसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य तसेच माजी सैनिकांच्या पत्नी/विधवांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

बीड व नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी आपली नावे शुक्रवार 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांच्याकडे सादर करावीत.

तरी पात्र माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

नांदेड, दि.20 फेब्रुवारी : मराठी पत्रकारितेचे आद्यजनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसंपादक अलका पाटील, वरिष्ठ लिपिक काशिनाथ आरेवार, लिपीक अनिल चव्हाण, अहेमद बेग, शिपाई गंगाधर निरडे उपस्थित होते. 

०००००



महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या प्रबोधनाचा गौरवशाली वारसा लाभला आहे. 🙏✨
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईत भक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा महाकुंभ भरणार आहे. 🚩
शीख, सिंधी, बंजारा, लबाणा, सिंधी आणि नामदेव साम्प्रदायासह सर्व समाज बांधवांनी या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
📍 स्थळ: ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई
🗓️ दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६



 


"गुरु नानक देवजींच्या एका निरंकार मंत्राने संपूर्ण समाजाला एकत्र जोडण्याचे महान कार्य केले!" 🤝✨
मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी 'हिंद-दी-चादर' ३५० व्या शहीदी समागमानिमित्त सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. शीख, सिंधी, बंजारा, लबाणा आणि सर्व नानक-नाम-लेवा समाजाचा हा भव्य संगम! 🚩
🗓️ २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६
📍 ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई.


 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त व्यक्त केलेले प्रेरणादायी विचार. गुरुंचा गौरवशाली इतिहास घराघरांत पोहोचवण्याचा आमचा संकल्प !
📍 स्थळ: ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई.
🗓️ दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६.



 

नवी मुंबई के खारघर में 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहादत समागम की तैयारियाँ अब अपने चरम पर हैं। ओवे मैदान (सेक्टर-29) में एक विशाल और भव्य पंडाल का निर्माण कार्य युद्ध स्तर पर जारी है, जहाँ देश-विदेश से आने वाली संगत के लिए विश्व स्तरीय सुविधाएँ सुनिश्चित की जा रही हैं।



 

 धर्मरक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन!

🙏✨
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला नक्की उपस्थित राहा.
📍 ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई.
🗓️ २८ फेब्रुवारी - १ मार्च २०२६




वृत्त क्रमांक परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी राहूल कर्डिले नांदेड दि. 20 फेब्रुवारी :...