Tuesday, September 24, 2024

 वृत्त क्र. 859 

आरटीओ कार्यालयातील

सेवा फेसलेस सुविधेद्वारे   

 

नांदेड दि. 24 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. याकाळात नागरिकांना आपले अर्ज आधार लिंक भ्रमणध्वनी क्रमांकाचा येणाऱ्या ओटीपी क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. जेणेकरुन आपली  गैरसोय न होता कामकाजात विलंब होणार नाही. नागरिकांनी फेसलेस सुविधेचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

 

मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या 24  सप्टेंबर 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संपात प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील कामे खोळंबू नये यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

नागरिकांचे कामकाज सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्त्या केल्या आहेत. शासनाद्वारे परिवहन विभागातील 38 सेवा या नागरिकांच्या सोईसाठी व कार्यालयात प्रत्यक्ष न येता कामकाज होण्याकरिता फेसलेस स्वरुपात सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कामाकरिता या कार्यालयात प्रत्यक्ष न येता विभागाच्या https://sarathi.parivahan.gov.in लायसन्साठी व https://parivahan.gov.in/parivahan वाहनासाठी या संकेतस्थळावरुन अर्ज करु शकता, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

0000

 वृत्त क्र. 858 

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे

उमरी येथे दोन दिवस आयोजन

 

नांदेड दि. 24 सप्टेंबर : उमरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन दिनांक 25 व 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बारावी पासआयटीआय उत्तीर्णपदवीधरपदवीत्तर शिक्षण झालेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात नोंदणी करावी, असे आवाहन उमरी येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड  यांनी केले आहे. 

 

याबाबतचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्रातील रहिवाशी असावा. वयाची अट 18 वर्ष ते 35 वर्ष असावे. बारावी पास 6 हजार व आयटीआय उत्तीर्णपदवीका 8 हजार, पदवीधर व  पदवीत्तर 10 हजार असे मानधन राहील. शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाहीतउमेदवाराचे आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार सलग्न असावेअधिक माहितीसाठी पुढील वेबसाईटचा वापर करावा. www.rojgar.mahaswayam.gov.inwww.cmykpy.mahaswayam.gov.inतसेच सदर कार्यक्रमास वरील दर्शविलेले नियम व अटीच्या उमेदवारांनी नोंदणी करून सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असेही आवाहन केले आहे.

00000

  वृत्त क्र. 873 माहितीअधिकार प्रकरणात  तत्‍परता आवश्‍यक - डॉ.हाटकर  जिल्‍हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार दिन साजरा नांदेड दि. २७ सप्टें...