वृत्त क्र. 960
निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी
वृत्त क्र. 960
निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी
वृत्त क्र. 959
आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध भेटवस्तू वाटल्याचा गुन्हा दाखल
वृत्त
क्र. 958
संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 1098 ची मदत घ्या
नांदेड दि. 18 ऑक्टोबर :- आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह, संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कुठून कशी मिळवून देता येईल, याकरीता कुठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरीकांमध्ये संभ्रम असतो. यासाठी आता चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित करण्यात आली.
संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 0 ते 18 वयोगटातील
कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज
असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत
संकटग्रस्त बालकांना 24 तास
हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर
कोणीही सदर सेवेद्वारे बालकांना मदत मिळवून देऊ शकतात.
या संबधी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते. याद्वारे संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी संबंधीतांनी 1098 या टोल फ्री
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व
बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी
अभिजीत राऊत, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी.
रंगारी यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 957
रब्बी हंगामासाठी पाणीपाळी सोडण्याचे नियोजन
वृत्त क्र. 956
युवक-युवतींनी मतदानाचा उत्सव साजरा करावा - तहसीलदार प्रविण पांडे
नांदेड दि. 18 ऑक्टोबर :- लोकशाहीमध्ये मतदान करणे हा आपला हक्क व कर्तव्य आहे. विशेषतः युवक-युवतीनी भरभरून मतदान करणे व इतर पात्र मतदारांना मतदानास प्रेरित करणे हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. युवक हे राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. एक एक मत राष्ट्र घडवण्यास आवश्यक असते. याच उद्देशाने युवक-युवतीनी येत्या विधानसभा व लोकसभेच्या पोट निवडणुकीत उत्साहाने मतदान करुन लोकशाहीचा हा उत्सव साजरा करावा, असे प्रतिपादन तहसीलदार प्रविण पांडे यांनी केले.
आज नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातून मतदार युवकांसाठी 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने मतदान जनजागृतीची सुरुवात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू यांच्या प्रेरणेतून झाली. जवळपास तीनशे मतदार युवकांना मतदानाचे महत्त्व उपप्राचार्या प्रा.कल्पना कदम यांनी विशद केले. प्रा.अनंतराव कौसडीकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात राजेश कुलकर्णी यांनी मतदाराच्या प्रतिज्ञेतून केली. नवमतदार युवक युवतींनी आपल्या परिसरातील मतदारांच्या भेटी घेवून मतदान करण्याची गरज व आवश्यकता पटवून देवून मतदान करावेच, असे सांगावे या बाबींचा उल्लेख स्वीप सदस्य संजय भालके यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी.कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.एम.वाय.कुलकर्णी, लोक प्रशासन विभाग प्रमुख प्रा. अनंतराव कौसडीकर, बालासाहेब कच्छवे, सारिका आचमे,एस.व्हि.भालके, सुनील मुत्तेपवार, शिवराज पवार, लोक प्रशासन अभ्यास मंडळाचे डॉ. शेख हनीफ, करीयर कट्टा चे समन्वयक डॉ संतोष शेंबाळे, लोक प्रशासन विभागातील डॉ. विजय तरोडे, डॉ. सुरेश गजभारे, प्रा. शशिकांत रामगिरवार, प्रा. शिवानंद साखरे, डॉ. निलंगेकर शरणकुमार यांनी विशेष परिश्रम घेतले.
000000
वृत्त क्र. 955
रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 ऑक्टोबर :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7 वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. 7 वर भुसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात 15 नोव्हेंबर 2024 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
हंगाम सुरु होण्यापुर्वी पुढील अटी व शर्तीची पूर्तता होणे आवश्यक
रब्बी हंगामी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 15 नोव्हेंबर 2024 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरुन सादर करावेत. मुदतीनंतर आलेले पाणी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पाणी अर्ज दिला म्हणजे परवानगी मिळाली असे गृहीत धरु नये याची नोंद घेण्यात यावी. नमुना नं. 7 चे कोरे पाणी मागणी अर्ज शाखेत विनामुल्य उपलब्ध आहेत. पिकाचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस कार्यालय जबाबदार असणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामूळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. शासन निर्णयात नमूद दरानुसार सन 2024-25 साठीचे पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरणे आवश्यक आहे. कालव्यावरील लाभधारक थकबाकीदार असल्यास पुर्णपणे पाणीपट्टी भरणे बंधनकारक आहे. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या/अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.
0000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...