Friday, October 18, 2024

  वृत्त क्र. 959

आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध भेटवस्तू वाटल्याचा गुन्हा दाखल

नांदेड,दि,१७ ऑक्टोंबर : 15 ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना कंधार शहरात भेटवस्तू वाटप करतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या छायाचित्रावरून कंधार येथे आचारसंहिता भंग करण्याचा अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार येथील संभाजी नगर परिसरात पिकअप व्हॅन क्रमांक नंबर एमएच 14 जीयू 7751 मधील अनोळखी इसमाने कंधार येथील संभाजीनगर कंधार येथे आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन करून नागरिकांना भेटवस्तू वाटप करीत असल्याचे फोटो व्हाट्सअपवर व्हायरल झाला. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास समाज माध्यमावर या संदर्भातील फोटो व्हायरल झाला. त्यानंतर या परिसरात शासनाच्या वतीने फिर्यादीने प्रत्यक्ष भरारी पथकाद्वारे पाहणी केली असता सदर पिकअप व्हॅन आढळून आली नाही. मात्र या संदर्भातील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानुसार  कंधार पोलीस ठाण्यात शासनाच्या वतीने श्री. राम ज्ञानोबा वारकड वय 40 वर्षे व्यवसाय नोकरी कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार राहणार संगुचीवाडी तालुका कंधार यांनी दुपारी तीनच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी  340/2024 कलम 170, 173, 223 भारतीय न्याय संहिता BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती लोहा विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरूणा संगेवार यांनी दिली आहे.
000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...