Sunday, May 24, 2020


खते, बी-बियाणे खरेदीची दुकानदाराकडून पावती घ्या
कृषि विभागाचे आवाहन  
नांदेड दि. 24 :- खरीप हंगामासाठी खते, बि-बियाणे, कीटकनाशके खरेदी केल्यानंतर संबंधित दुकानदाराकडून संपूर्ण विवरणासह बिल पावती घ्यावी, असे आवाहन धर्माबाद येथील तालूका कृषि अधिकारी माधुरी उदावंत व  पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास अधापूरे यांनी केले आहे.
शेतकरी अत्यंत कष्टाने शेती पिकवत असतो. अशावेळी खते, बि-बियाणे, कीटकनाशके, मशागत आदी कामासाठी त्याला आर्थिक गुंतवणूकही करावी लागते. त्यामुळे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गुणवत्ता व चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कृषी निविष्ठा विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, भेसळीची शंका दूर करण्यासाठी सीलबंद, वेष्टनातील, लेबल असलेले बियाणे खरेदी करावे, वैध मुदतीची खात्री करावी, पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने खरेदी करू नये. खरेदी केलेल्या बियाण्याचे पीक, वाण, लॉट नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचे आहे ते नाव, किमान किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्याचे नाव व सही असलेली रोख अथवा उधारीची पावती घ्यावी. ही पावती तसेच वेष्टन बॅग, त्यावरील लेबल व त्यातील थोडे बियाणे या गोष्टी पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवाव्यात. काही शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
00000


बाहेर जिल्ह्यातून आलेली एकूण प्रवासी संख्या 1 लाख 32 हजार 91
यात्री निवास कोवीड सेंटर येथील आज 4 रुग्ण बरे ; आज कोरोनाचा नवीन रुग्ण नाही
·         आतापर्यंत 59 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी तर 60 रुग्णांवर औषधोपचार चालू

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  कोरोना विषाणु संदर्भात रविवार 24 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वा. पुढीलप्रमाणे माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. रविवार 24 मे  रोजी एनआरआय भवन व यात्री निवास कोविड सेंटर येथील 4 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 125 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 59 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर उर्वरीत 60 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
रविवार 24 मे 2020 रोजीची कोरोना संशयीत व कोविड रुग्णांचा संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 32 हजार 91, घेतलेले स्वॅब 3 हजार 254, निगेटिव्ह स्वॅब 2 हजार 746, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 125, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 122, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यू संख्या 6, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 59, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 60, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 243 एवढी आहे.
शनिवार 23 मे 2020 रोजी पाठविण्यात आलेल्या 71 स्वॅब तपासणी अहवाल आज रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होईल. रविवार 24 मे 2020 रोजी 172 रुग्णांची स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील.
एकुण 125 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 59 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 60 रुग्णांपैकी 7 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. पंजाब भवन कोवीड केअर सेंटर, यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 46 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा : कोरोना विषाणू संसर्गाबाबत
रविवार 24 मे रोजी सायं. 5 वाजेपर्यंतची आकडेवारी  
आत्तापर्यंत एकूण संशयित – 3 हजार 149, एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2 हजार 828, क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1 हजार 482, अजून निरीक्षणाखाली असलेले – 256, पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 71, घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2 हजार 757, आज घेतलेले नमुने – 172, एकुण नमुने तपासणी- 3 हजार 254, एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 125, पैकी निगेटीव्ह – 2 हजार 746, नमुने तपासणी अहवाल बाकी- 243, नाकारण्यात आलेले नमुने – 14, अनिर्णित अहवाल – 122,  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 59, कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 6, नांदेड जिल्ह्यात  बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 1 लाख 32 हजार 91 असून त्यांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...