Wednesday, August 25, 2021

 जिल्ह्यातील 100 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 100 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 26 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर रेल्वे हॉस्पिटल नांदेड येथे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर रेल्वे हॉस्पिटल येथे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 24 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 9 लाख 76 हजार 861 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 25 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 6 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 58 हजार 40 डोस याप्रमाणे एकुण 10 लाख 64 हजार 70 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 माहूर येथील आदिवासी मुलींचे वसतीगृहासाठी प्रवेश सुरु 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- आदिवासी विभागाच्यावतीने आदिवासी प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहेत. वसतिगृहात प्रवेशाकरिता www.swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन सुविधा दिल्या जातील. याशिवाय गणवेश भत्ता, निर्वाह व प्रसाधन भत्ता, स्टेशनरी भत्ता आदी लाभ डीबीटीमार्फत देण्यात येईल. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन माहुर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह यांनी केले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 950 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 724 एवढी झाली असून यातील 88 हजार 33 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 30 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे देगलूर तालुक्यांतर्गत 1 व हिंगोली 1  असे एकूण 2 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात देगलूर कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 30 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 2 हजार 812

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 99 हजार 859

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 724

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 33

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-30

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

भूजल सर्वेक्षण व चित्ररथाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 25 :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हयातील माळेगाव येथे चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बालाजी कल्याणकर यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, कार्यकारी अभियंता बाविस्कर, उपअभियंता संद्री, नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी चंदा रावलकर, आर. व्ही. पवार, कानोडे, गीते, भोसले, साबेर शेख, अन्नदाते, नितीन भवानकर, जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रसेन पाटील, माळेगावचे सरपंच हणमंत धुलगंडे, रावसाहेब धुलगंडे, माळकोळी पोलिस स्टेशनचे माणिकराव डोके, पोलिस उपनिरिक्षक संतोष गीते, पत्रकार नागनाथ पुरी, यादव ढवळे, सग्रांम पवार, कृष्णा केंद्र, बाबुराव बोईनवाड, तसेच गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

यानंतर लोहा येथे चित्ररथाचे आगमन झाले. यावेळी गावातील सरपंच शंकर माने, केशव हलगे, शुभम अकुलवार, हनमंत ढामे, दिगंबर कौशल्ये, शशिकांत बिडवाई, केशव भोसिकर, यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. तसेच वाडी येथे चित्ररथाच्या स्वागतासाठी गावातील जेष्ठ नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

00000






महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...