Friday, September 1, 2017

जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग झाल्यास
गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी
नांदेड, दि. 1 :- जायकवाडी धरणाची पाणीपातळी 78 टक्‍के क्षमतेने भरली असुन पाऊस होत राहिल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा गोदावरी नदीत सोडण्‍याची शक्‍यता केंव्‍हाही निर्माण होऊ शकते. यामुळे जायकवाडी धरणातुन पाण्‍याचा विसर्ग सोडला असता, धरणाखालील भागातील गोदाकाठच्‍या गावांना पुराचा धोका होऊ शकतो. म्हणून गोदावरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सर्तकता बाळगावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 धरणातुन होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना व स्थानीक प्रशासकीय यंत्रणेला पुर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सुचनाही देण्‍यात आलेल्या आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

000000
राज्य परिवहन महामंडळा
शिकाऊ उमेदवारांच्या 55 पदांसाठी भरती
नांदेड, दि. 1 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागामध्ये सन 2017-18 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाचे शिकाऊ उमेदवार म्हणुन 55 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये यांत्रिक-40, विजतंत्री- 6, शिट मेटल वर्क्स-5,पेंटर- 1, अभियांत्रिक पदवीधर / पदवीका-2, अकाउंन्टसी न्ड ऑडीटींग- 1 या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार 20 सप्टेंबर 2017 पर्यंत विभाग नियंत्रक नांदेड कार्यालयात छापील अर्ज भरावेत, असे आवाहन राज्य परिवहन विभाग नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम एमआयएस वेबपोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी पदवीधर, पदवीकाधारक, 12 वी व्यवसायभमुख विषयात अकौटन्सी न्ड ऑडीटींग घेऊन यत्ता 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारानी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या राष्ट्रीय वेबसाईटवर दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करुन MSRTC  Nanded Division या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.   
उमेदवार संबंधीत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणुन विचार केला जाईल व उमेदवारांचे कॉन्ट्रक्ट फॉर्म नोंदणी होतील. अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये मागासवर्गीयासाठी 250 रुपये आहे.  छापील अर्ज विभागीय कार्यालय, कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे बुधवार 20 सप्टेंबर पर्यंत शनिवार, सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मिळतील स्विकारले जातील. बुधवार 20 सप्टेंबर नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही,  ते रद्द समजले जाणार आहेत. असेही  राज्य परिवहन विभाग नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
संवाद पर्व अंतर्गत विकास योजनेच्या माहितीचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन रविवारी प्रसारण
नांदेड, दि. 1 :- गणेशोत्सव काळात विविध शासकीय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवाद पर्व अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.
या संवाद पर्व अभियानांतर्गत रविवार 3 सप्टेंबर 2017 रोजी रात्री 8.15 वा. महिला व बालविकासाच्या विविध योजनांवर आधारीत नांदेडचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. पी. शाहु यांची मुलाखत आकाशवाणीवरुन प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी घेतली आहे.
या संवाद पर्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  

000000
संवाद पर्व अंतर्गत कृषि योजनांच्या माहितीचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण
नांदेड, दि. 1 :- गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक जाणीव जागृती व प्रबोधन करता यावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवाद पर्व अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.
या संवाद पर्व अभियानांतर्गत शनिवार 2 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 7.30 वा. आकाशवाणीच्या किसान वाणी या कार्यक्रमात ठिबक सिंचन योजना व मृद आरोग्य पत्रिका या विषयांवर नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांची मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी घेतली आहे.
या संवाद पर्व अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...