सातत्यपुर्ण सरावाने यश प्राप्त होते
- सोपान टोंपे
नांदेड
दि. 9 :- परीक्षा मग ती कोणतीही असो सातत्याने सराव केल्यास यश नक्की मिळते. ते सी-सॅट या विषयावर मार्गदर्शन करीत होते. सी-सॅटमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्यासाठी विदयार्थ्यांनी नियमीत सराव करावा. आयोगाच्या मागील प्रश्न पत्रिका वेळ लाऊन सोडवाव्यात, असे प्रतिपादन नुकतेच उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले सोपान टोंपे यांनी केले.
उज्ज्वल
नांदेड मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने आयोजित दरमहा 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरमध्ये बोलत होते. याप्रसंगी व्याख्याते कैलास तिडके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी प्रास्ताविकात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या-या विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी ठेवावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियमित मार्गदर्शन तथा सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
कैलास तिडके (Child Development Project
Officer) यांनी दिवसभर चाललेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना डिसेंबरमध्ये होणा-या बाल विकास प्रकल्प अधिकारी या परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन मुक्ती राम शेळके यांनी तर आभार प्रताप सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती कोकुलवार, बाळू पावडे, संजय कर्वे, कोंडिबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.
000000