Wednesday, March 24, 2021

दुय्यम निबंध कार्यालयात गर्दी करु नये

मुद्रांक जिल्हाधिकारी विजय बोराळकर यांचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- राज्य शासनाने स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर 31 मार्च 2021 पर्यंत सुट जाहीर केली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 18 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन नांदेडचे मुद्रांक जिल्हाधिकारी विजय प्र. बोराळकर यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या महसुल व वन विभागाने 29 ऑगस्ट, 2020 रोजी शासन राजपत्रानुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्ताऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (बी) अन्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या आणि 31 डिसेबर 2020 रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी दोन टक्के तर 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या कालावधी करीता दिड टक्केने कमी केले आहे. 31 ऑगस्ट,2020 रोजीचे शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 147 (अ) अन्वये महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार 28 ऑगस्ट 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 अन्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत शुन्य टक्का इतका तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीकरीता अर्धा टक्का इतका कमी करण्यात आला आहे. 

शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत 31 मार्च 2021 अखेरपर्यंत असल्याने यासंधीचा लाभ घेण्यासाठी नांदेड येथील एकूण 18 दुय्यम निबंधक कार्यालयात ही सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा उपरोक्त प्रमाणे लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून निष्पादित करून मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 23 अ नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात. कोव्हिड -19 च्या प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च 2021 शेवटी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता उपरोक्त प्रमाणे नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन नांदेडचे मुद्रांक जिल्हाधिकारी विजय प्र. बोराळकर यांनी केले आहे.

00000


 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यात 25 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 8 एप्रिल 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 25 मार्च 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 8 एप्रिल 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

 

संचारबंदी कालावधीत प्रादेशिक परिवहन

कार्यालयाचे कामकाज राहणार बंद

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 25 मार्च ते 4 एप्रिल 2021 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील तसेच शिबिर (कॅम्प) कार्यालयातील सर्व कामकाज संचारबंदी कालावधी बंद राहणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

00000

 

संचारबंदी नियम पाळून प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी

संचारबंदीच्या नियमाचे कठोरपणे पालन करा

-         जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

·         नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 165 व्यक्ती कोरोना बाधित

·         सहा जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व पातळीवर प्रयत्नांची शर्त केली जात असून जनतेनेही तेवढ्याच जबाबदारीने जिल्हा जाहीर केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हा लढा सर्वांच्या मुक्तीचा असून सर्वांनी एकत्रीत आपले कर्तव्य व काळजी घेतली तर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे नियंत्रणात आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

जिल्ह्यात दिनांक 24 मार्च रोजी 1 हजार 165 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 924 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 608 तर अँटिजेन तपासणीद्वारे 557 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 165 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 35 हजार 502 एवढी झाली आहे. 

सोमवार 22 मार्च रोजी साईनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा, हदगाव येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर मंगळवार 23 मार्च रोजी मुखेड तालुक्यातील चावणवाडी येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, साईबाबा मंदिर रोड नांदेड येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर बुधवार 24 मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर माहूर येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 674 एवढी झाली आहे. 

आजच्या 4 हजार 924 अहवालापैकी 3 हजार 642 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 35 हजार 502 एवढी झाली असून यातील 26 हजार 779 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 7 हजार 816 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 62 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 23, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 392, धर्माबाद तालुक्यांतर्गत 5, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 3, किनवट कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 4, देगलूर कोविड रुग्णालय 5, बिलोली तालुक्यांतर्गत 3, खाजगी रुग्णालय 32 असे एकूण 486 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 432, नायगाव तालुक्यात 25, भोकर 13, उमरी 2, तेलंगणा 1, नांदेड ग्रामीण 12, हदगाव 13, बिलोली 13, परभणी 3, लोहा 30, धर्माबाद 19, हिमायतनगर 10, यवतमाळ 4  असे एकूण 608 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 294, बिलोली तालुक्यात 20, कंधार 10, मुखेड 26, मुदखेड 1,  नांदेड ग्रामीण 28, देगलूर 4, किनवट 29, नायगाव 7, परभणी 5, अर्धापूर 27, धर्माबाद 15, लोहा 23, उमरी 3, यवतमाळ 1 असे एकूण 557 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 7 हजार 816 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 234, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 91, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 64, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 107, मुखेड कोविड रुग्णालय 152, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 57, बिलोली कोविड केअर  सेंटर 111, नायगाव कोविड केअर सेंटर 32, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 41, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 76, लोहा कोविड रुग्णालय 149, कंधार कोविड केअर सेंटर 24, महसूल कोविड केअर सेंटर 125, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, धर्माबाद कोविड केअर सेंटर 45, मुदखेड कोविड केअर सेंटर 18, अर्धापूर कोविड केअर सेंटर 30, बारड कोविड केअर सेंटर 8, मांडवी कोविड केअर सेंटर 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 971, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 945, खाजगी रुग्णालय 435, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत. 

बुधवार 24 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 85 हजार 53

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 43 हजार 649

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 35 हजार 502

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 26 हजार 779

एकुण मृत्यू संख्या-674

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-68

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-410

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7 हजार 816

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-62. 

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसार अली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...