Monday, December 13, 2021

 नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 365 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 513 एवढी झाली असून यातील 87 हजार 835 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6 असे एकुण 6 बाधित आढळला आहे.

आज जिल्ह्यातील 1  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात किनवट तालुक्यातर्गत 1 असे एकूण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 अशा एकूण 23 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 86 हजार 36

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 82 हजार 211

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 513

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 835

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींचे सर्व शासकीय वसतिगृहे सुरू झाली आहेत. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी संबंधीत वसतिगृहातील गृहपालाकडे प्रवेश अर्ज करण्यास 20 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. इच्छुक  पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

इच्छुक पात्र विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी इयत्ता 8 वी व 11 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या  पदवी प्रथम वर्षात  पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तसेच जे विद्यार्थी सन 2020-21 मध्ये प्रथम वर्षात प्रवेशीत होते. ते आता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात द्वितीय वर्षात प्रवेशीत आहेत अशा विद्यार्थ्यांचे अर्ज देखील वसतिगृह प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्याचप्रमाणे थेट द्वितीय वर्षांत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील सन 2020-21 मध्ये वसतिगृह प्रवेशाचा संधी  मिळाल्याने अशा विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात प्रवेश घेतलेला आहे, त्यांना देखील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या वसतीगृह प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येईल, असेही समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी कळविले आहे.

0000

 कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- कृषि विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकंडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझान / स्पेसिफीकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 15 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावा. 

या योजनेंतर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही व ज्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येतो अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. 

अटी व शर्तीच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ / कंपनी, केंद्र शासनाची ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे असावा. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील. 

या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालु आर्थिक वर्षात पुर्ण करणे बंधनकारक आहे. अपुर्ण बांधकाम, मंजूर डिझाईन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषि माल साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 अनुदानावर शेतकरी उत्पादक कंपनीसाठी बिज प्रक्रिया संच 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत असून शेतकरी उत्पादक संघ / कंपनीने बँकेकडे प्रस्ताव सादर करावीत. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर शेतकरी उत्पादक संघ / कंपनी (एफपीओ/एफपीसी) अनुदानास पात्र राहतील. तालुका कृषि  अधिकाऱ्याकडे 15 डिसेंबर पर्यत अर्ज सादर करता येतील. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा एकदाच लाभ दिला जाणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गंत स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) साठी बिज प्रक्रिया संचचा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या अधिन राहून शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत प्रमाणित बियाणे उत्पादक करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांना बिज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी यंत्र सामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने कळविले आहे.

00000

 

 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताह साजरा करण्याचे निर्देश 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबर आणि ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व कार्यालयाना दिले आहेत. केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षा व उपाययोजनेच्यादृष्टीने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनाचे पालन करणे आवश्यक राहील. 

ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताह साजरा करतांना ऊर्जा संवर्धनाची प्रतिज्ञा द्यावी. तसेच विविध प्रसिध्दीमाध्यमातून जनजागृती, शालेय स्तरावर ऊर्जा संवर्धन विषयांतर्गत निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करावे. ऊर्जा संवर्धन कायद्यातर्गंत उद्योगक्षेत्रातील पथनिर्देशित ग्राहकांकडून हा आठवडा साजरा करण्यात येणार आहे. तसेच या आठवड्या दरम्यान विविध क्षेत्रासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे उपक्रम राबवून ऊर्जा दिन व सप्ताह साजरा करण्याच्याही सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्या आहेत.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...