Friday, March 11, 2022

 नांदेड जिल्ह्यात व्यक्ती कोरोना बाधित

तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 826अहवालापैकी अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 782 एवढी झाली असून यातील 1 लाख 76 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 14 रुग्ण उपचार घेत आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे कंधार 1 , माहूर 1 असे एकुण 2 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11 असे एकुण 14 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 85 हजार 182

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 65 हजार 331

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 782

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 76

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-23

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 महिलांचे आरोग्य हेच कुटुंबांची संपत्ती

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  महिलांचे आरोग्य हेच कुटूंबाची संपत्ती आहे. महिलांना वेळोवेळी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असून महिलांनी यासाठी दक्ष असले पाहिजेअसे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना केले.

 

रेल्वे स्थानक व सार्वजनिक ठिकाणी सफाई काम करणाऱ्या महिलांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केली.  हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन येथील व्हि.आय.पी. हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले. रेल्वे स्थानकावरील कामगार महिला तसेच रेल्वे स्थानकावरील बालके यांच्या सुरक्षितातेची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे महिला बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांनी यावेळी सांगितले.

 

या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयरोटरी क्लबचे पदाधिकारी, वर्ल्ड व्हिजन इंडिया, चाईल्ड लाईन, तथा रेल्वे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सारिका झुंजारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पट्टापू यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांना व मुलांच्या प्रगतीसाठी वर्ल्ड व्हिजन प्रत्येक क्षेत्रात हातभार लावत आहे असे सांगितले. रोटरी क्लबच्या डॉ. शुभांगी पाटील यांनी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच रोटरी क्लबच्या डॉ. श्वेता अवधिया व डॉ. सुचिता भुरे यांनी महिला सुरक्षा व आरोग्य सुविधेवर मार्गदर्शन केले. नांदेड चाईल्ड लाईनचे पि.डी. जोशी पाटोदेकर यांचेही मार्गदर्शन झाले. वर्ल्ड व्हिजनने प्रकाशित केलेल्या बाल संरक्षण पुस्तकांचे लोकार्पण जिल्हा दंडाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमितकुमार गुप्ता,  पोलीस निरीक्ष सुरेशजी उनावणेरोटरी क्लब ऑफ नंदीग्राम च्या अध्यक्षा डॉ. सारिका झुंजारे अध्यक्षा, वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पटापू , रेल्वे सुरक्षा बलाचे अनिल कुमार तिवारी, मुख्य स्वास्थ्य निरीक्षक नवल कुमार , युनिसेफच्या पुजा यादव व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व कर्मचारी, नांदेड चाईल्ड लाईन चे कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

00000




 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. ही लोकअदालत जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय नांदेडचे सचिव आर. एस. रोटे यांनी कळविले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सचिव आर. एस. रोटे यांनी दिली. 

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत आणेकर व न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे. 

000000

 

 शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शनिवार 12 मार्च 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाने सकाळी 8.30 वा. श्री गुरू गोबिंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सकाळी 8.45 वा. श्री गुरू गोबिंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...