Sunday, June 2, 2019


राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा दौरा
नांदेड, दि. 2 :-  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 3 जून 2019 रोजी मुंबई येथून शासकीय विमानाने सकाळी 8.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 8.50 वा. नांदेड विमानतळ येथून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 9 वा. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.20 वा. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड येथून मुख्य प्रशासकीय इमारत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. मुख्य प्रशासकीय इमारत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आगमन व राखीव.  सकाळी 9.50 वा. मुख्य प्रशासकीय इमारत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून एनडीआरएफच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे प्रयाण. सकाळी 9.52 वा. एनडीआरएफच्या आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शन येथे आगमन व राखीव, एनडीआरएफ आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शनास भेट. सकाळी 10 वा. एनडीआरएफ आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शन येथून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन संकुलाकडे प्रयाण. सकाळी 10.5 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन संकुल या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.10 वा. श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन संकुल येथून स्वा. रा. ती. म. विद्यापीठाच्या सेंट्रल इंस्ट्रूमेंटेशन सेंटर Central Instrumentation Centre व प्राणी संग्राहलय या नूतन इमारतीकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. विद्यापीठाच्या सेंट्रल इंस्ट्रूमेंटेशन सेंटर Central Instrumentation Centre व प्राणी संग्राहलय या नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.25 वा. स्वा. रा. ती. म. विद्यापिठातील आव्हान-2019 या उद्घाटन कार्यक्रमाकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते सकाळी 11.15 वाजेपर्यंत आव्हान-2019 या उद्घाटन समारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. सकाळी 11.15 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11.40 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.45 वा. शासकीय विमानाने बेगमपेठ हैद्राबादकडे प्रयाण करतील.
000000

  

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...