Wednesday, June 5, 2024

 वृत्त क्र. 466

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड दि. 5 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 11 जून 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र. 465

दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेचे 11 जूनला वितरण

नांदेड (जिमाका) दि. 5 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला आहे.

मार्च 2024 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना मंगळवार 11 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळामार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचित करण्यात आलेले आहे. याबाबत विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक , विद्यार्थी व पालकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 464

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड (जिमाका) दि. 5 :- नांदेड जिल्ह्यात 6 जूनचे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 6 जुनचे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जून 2024 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...