Monday, June 15, 2020

वृत्त क्र. 550


वृत्त क्र. 550   
प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेत
शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
-         जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे
नांदेड (जिमाका), दि. 15 :-  प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना हवामानावर आधारित फळपिक विमा मृग बहार आंबिया बहार योजनेत नमूद अंतिम दिनांकापूर्वी जास्तीतजास्त संख्येने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. 
नांदेड जिल्ह्यात सन 2020-21  या  वर्षासाठी प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना अंबिया बहार मृग बहारकरीता शासन निर्णय 5 जून 2020 अन्वये लागु करण्यात आली आहे.
ही योजना कार्यन्वयीत करणारी यंत्रणा / कंपनी ही बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं.लि. बजाज अलायन्झ हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवाडा पुणे-411006 आहे.
मृग बहार विमा हप्ता दर
फळपिक मोसंबी-  विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 4 हजार रुपये. लिंबु विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 70 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 3 हजार रुपये.
आबिंया बहार विमा हप्ता दर
फळपिक केळी- विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 1 लाख 40 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 7 हजार रुपये. फळपिक आंबा- विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 1 लाख 40 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 7 हजार रुपये. फळपिक मोसंबी- विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 4 हजार रुपये. फळपिक द्राक्ष- विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 3 लाख 20 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 16 हजार रुपये.
योजना अंमलबजावणी वेळापत्रक अधिसुचित मंडळांसाठी ही योजना नांदेड जिल्ह्यात पुढे दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल.  
मृग बहार विमा हप्ता दर
अधिसुचित फळपिक मोसंबी पिकासाठी विमा भरण्याची अतिंम मुदत 30 जून 2020 असून  कंधार तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळ बारुळ. धर्माबाद- करखेली, नांदेड- लिंबगाव, विष्णुपुरी. मुखेड- मुखेड, जाहुर. मुदखेड- मुदखेड, बारड. हदगाव- हदगाव, पिंपरखेड. अधिसुचित फळपिक लिंबु पिकासाठी विमाभरण्याची अंतिम मुदत 30 जून 2020 असून  उमरी तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळ उमरी आहे.  
आबिंया बहार विमा हप्ता दर
अधिसुचित फळपिक केळी पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2020 असून  नांदेड तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळे  तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापुर- अर्धापुर, दाभड. मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड. लोहा- शेवडी बा. हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. भोकर- भोकर. देगलुर- मरखेल, हाणेगाव. किनवट- किनवट, इस्लापुर, शिवणी, बोधडी. उमरी- उमरी. नायगाव- बरबडा.
अधिसुचित फळपिक आंबा पिकासाठी विमा भरण्याची अतिंम मुदत 30 सप्टेंबर 2020 असून  अर्धापूर तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळे दाभड, पाळेगाव. कंधार- कंधार. मुखेड- मुक्रामाबाद.
अधिसुचित फळपिक मोसंबी पिकासाठी विमा भरण्याची अतिंम मुदत 31 ऑक्टोंबर 2020 असून  अर्धापूर तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळे मालेगाव. नांदेड- लिंबगाव, विष्णुपुरी. मुदखेड- बारड.
अधिसुचित फळपिक द्राक्ष पिकासाठी विमा भरण्याची अतिंम मुदत 15 ऑक्टोंबर 2020 असून  अर्धापूर तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळे अर्धापूर, दाभड, मालेगाव. लोहा- शेवडी बा., देगलूर- मरखेल, हानेगाव. नांदेड- तरोडा बु, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. भोकर- भोकर. मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड. हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी याप्रमाणे अधिसूचित महसूल मंडळे आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.
000000

वृत्त क्र. 549


सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह 
बाधितांमध्ये 4 पुरुष तर 2 महिलांचा समावेश
नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 6 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील संख्या 262 वर पोहचली आहे.  या सहा बाधितांपैकी 1 पुरुष बरकतपुरा नांदेड वय वर्षे 32 आहे. उर्वरीत 5 बाधित व्यक्ती मुखेड विठ्ठल मंदिर येथील असून बाधितांपैकी 3 पुरुष वय वर्षे अनुक्रमे 47, 52 62 आहेत. दोन महिला 52 55 वर्षाच्या आहेत. आतापर्यंत एकुण 177 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.
सोमवार 15 जून रोजी प्राप्त झालेल्या 56 अहवालांपैकी 41 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत 72 बाधित व्यक्तींवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52  54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात 72 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 7 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवार 15 जून रोजी 346 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण-
 1 लाख 45 हजार 323,
घेतलेले स्वॅब 5 हजार 298,
निगेटिव्ह स्वॅब
 4 हजार 400,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 06,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती
 262,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 200,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83,
मृत्यू संख्या-
 13,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 177,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 72,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 279 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
                                                                         00000  




  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...