Tuesday, July 21, 2020


वृत्त क्र. 671   
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 11.12 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात मंगळवार 21 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 177.89 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 343.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 38.53 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 21 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 7.50 (411.83), मुदखेड- निरंक (255.00), अर्धापूर- निरंक (347.33), भोकर- 4.75 (358.98), उमरी- निरंक (238.63), कंधार- 15.00 (267.50), लोहा- 13.50 (339.49), किनवट- 21.71 (360.81), माहूर- निरंक (316.75), हदगाव- 1.57 (326.29), हिमायतनगर- 9.67 (528.99), देगलूर- 41.17 (345.94), बिलोली- 14.80 (324.40), धर्माबाद- 6.33 (362.32), नायगाव- 10.60 (320.80), मुखेड- 31.29 (389.98). आज अखेर पावसाची सरासरी 343.44 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5495.04) मिलीमीटर आहे.
000000



वृत्त क्र. 670    
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी
शाळांची पोर्टलवर नोंदणी करावी 
-         शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर
नांदेड, (जिमाका) दि. 21 :- धार्मिक अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. प्रधानमंत्री यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार सन 2020-21 साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात येत आहे. त्यासाठी ही योजना राबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांची नोंदणी एन.एस.पी. 2.0 या पोर्टलवर करणे आवश्यक आहे.
सन 2020-21 साठी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एनएसपी २.० (www.scholarships.gov.in) हे पोर्टल केंद्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जेणे करून या पोर्टलवर शाळांना अल्पसंख्याक गरजू विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करता येणार आहे. यासाठी शाळेचे नोंदणी अर्ज मुख्याध्यापक यांनी पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.
मागील वर्षी ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेची नोंदणी केलेली नाही अशा शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत तात्काळ करून घेण्यात यावी. जर एखाद्या शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत मुख्याध्यापकांनी केली नाही तर त्या शाळेला अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी NSP २.० पोर्टल वर अर्ज भरता येतील परंतु त्या अर्जाची पडताळणी शाळांना करता येणार नाही. त्यामुळे हे अर्ज जिल्हास्तरावर पुढील प्रक्रियेसाठी जाणार नाहीत. अशा शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. ज्या शाळांनी गतवर्षी नोंदणी प्रक्रिया केली नाही अशा शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास शेख रुस्तुम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड मो.न. (9689357212) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य./प्राथ.) यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 669   
शासकिय तंत्रनिकेतनमध्ये वेबिनार मालिका संपन्न
नवीन तंत्रज्ञान व सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करावा
-         सहसंचालक महेश शिवणकर
नांदेड, (जिमाका) दि. 21 :- बदलत्या परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोर जातांना नवीन तंत्रज्ञान आणि सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थी व शिक्षकांनी आत्मसात करावा, असे प्रतिपादन विभागीय सहसंचालक महेश शिवणकर यांनी केले.
कोविडच्या पार्श्वभुमीवर शासकिय तंत्रनिकेतन येथील यंत्रअभि‍यांत्रिकी विभागाकडून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी करंट आणि इमर्जिग टेक्नॉलॉजी फंटियर्स या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय वेबिनार मालिकेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी श्री. शिवणकर बोलत होते.
या कार्यक्रमात नागपूरच्या व्ही.एन.आय.टी. राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थेतील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अभय कुथे, पुणे येथील ऑटोमोटीव्ह क्षेत्रातील व उद्योग क्षेत्रातील तज्ञ कन्सल्टंट किरण वैरागकर, सिग्मा इलेक्ट्रिक पुणे या मल्टीनॅशनल कंपनीतील आरोग्य व पर्यावरण विभागाचे प्रमुख राजेश जलतारे आणि तंत्रनिकेतनचे प्रार्चाय डॉ. गोरक्ष गर्जे यांची उपस्थिती होती.
या शिक्षण, उद्योग जगतातील नामवंतानी वेबिनारर्सच्या माध्यमातून तंत्रनिकेतन आणि अभि‍यांत्रिकी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर आधुनिक तंत्रज्ञानातील विविध पैलूसह येत्या काळातील आव्हाने आणि संधी तसेच त्यासाठी सज्जता कशी असावी याबाबत व्याखाने व सादरीकरणाद्वारे माहिती दिली. 
या उपक्रमात महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य गर्जे, समन्वयक व सुत्रसंचालक म्हणून यंत्र अभि‍यांत्रिकी विभागप्रमुख राजीव सकळकळे व सहसमन्वयक आणि इव्हेंट ॲडमिन म्हणून जेष्ठ अभिव्याख्याता डॉ. संतोष चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्र विभागातील अधिव्याख्याते विजय उश्केवार, साईनाथ अन्नमवाड, अनिकेत देशट्टीवार, अनिल कदम आणि प्रशांत चव्हाण यांनी योगदान दिले.
0000


वृत्त क्र. 668   
दिव्यांगमित्र ॲपद्वारे नोंदणी सुरु
नांदेड, (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यातील दिव्यांगानी दिव्यांगमित्र ॲप डाऊनलोड करुन स्वत:चे नाव, जात प्रवर्ग, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्र. आधारकार्ड क्रमांक, मतदान ओळखपत्र, धर्म, मतदान यादी भाग क्र. फोटो आदी माहिती 14 ते 31 जुलै 2020 कालावधीत ॲपद्वारे भरुन नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले.   
जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची "दिव्यांगमित्र" म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती ग्रामी पातळीवर लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यदिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन http://divyangmitrananded.in या संकेतस्थळावर, गुगल प्ले स्टोअरवरुन दिव्यांगमित्र ॲप डाऊनलोड करावे. या ॲपवर दिव्यांगानी आपली नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. ॲपद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या अर्जाची छाननी 1 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या 5 टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्या येतो. दिव्यांगाना या निधीतून लाभ देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच 8 जुलै  रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीइटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, मनपा आयक्त सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ॲड. रामराव नाईक तसेच जिल्हा नियोजन अधिकारी  संजय कोलगणे, जिल्हा समाज कल्याण अधिकार  सतेंद्र विरेंद्र आऊलवार यांची उपस्थितहोत.
                                                      000000

वृत्त क्र. 667


नांदेड जिल्ह्यात 32 बाधितांची भर  
कोरोनातून आज 40 व्यक्ती बरे तर दोघांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 21 :-  जिल्ह्यात आज 21  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 32 व्यक्ती बाधित झाले. तर 40 व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 134 अहवालापैकी 98 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 18 एवढी झाली असून यातील 555 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. 411 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 17 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे.
सोमवार 20 जुलै रोजी आंबेडकरनगर येथील 27 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरु असतांना तर मंगळवार 21 जुलै रोजी रहेमतनगर येथील 69 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 44 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 40 बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 1, बिलोली कोविड रुग्णालयातील 3, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 8, हदगाव कोविड केअर सेंटर येथील 1, मुदखेड कोविड केअर सेंटर येथील 5, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 2 तसेच खाजगी रुग्णालयातील 14 बाधितांचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 555 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
आरटीपीसीआर तपसणी प्रक्रियेद्वारे नवीन बाधितांमध्ये वजिराबाद नांदेड येथील 49 वर्षाची 1 महिला, काबरानगर नांदेड येथील 72 वर्षाचा एक पुरुष व 71 वर्षाची 1 महिला, फत्तेबुरुज किल्ला रोड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, आनंदनगर नांदेड येथील 45 व 80 वर्षाचे दोन पुरुष, सोमेश कॉलनी येथील 95 वर्षाची 1 महिला, निजाम कॉलनी नांदेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, वाडी नांदेड येथील 27 वर्षाची 1 महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 71 वर्षाची 1 महिला, स्त्री रुग्णालय नांदेड येथील 29 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 55 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील रावी येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील खैरका येथील 30 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील 39 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील सीईओ निवासस्थान परिसर 44 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर लाईन गल्ली येथील 13,13,20,20,48 वर्षाचे 5 पुरुष, देगलूर मरखेल पोलीस स्टेशन येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील भायेगाव रोड येथील 21 वर्षाची 1 महिला, देगलूर नोगाबा मंदिर येथील 15 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील शेलगाव येथील 23 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील कोत्तेकल्लुर 5, 10, 48 वर्षाचे 3 पुरुष, देगलूर तालुक्यातील भुतन हिप्परगा येथील 35 वर्षाचा 1 पुरुष व परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील 54 वर्षाचा 1 पुरुष आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील 55 वर्षाचा 1 पुरुषांचा यात समावेश आहे. 
जिल्ह्यात 411 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 87, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 141, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 13, जिल्हा रुग्णालय येथे 28, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 10, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 41, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 23, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 3, लोहा कोविड केअर सेंटर येथे 12, कंधार कोविड केअर सेंटर येथे 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालयात 39 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 287
घेतलेले स्वॅब- 10 हजार 662,
निगेटिव्ह स्वॅब- 8 हजार 596,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 32
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 18,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 2,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,
मृत्यू संख्या- 44,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 555,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 411,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 302. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...